agriculture news in marathi, agro advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon

कृषी सल्ला : ऊस, कांदा, लसून घास, फळझाडे, वेलवर्गीय भाजीपाला
कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

सद्यस्थितीत भाजीपाला पिकातील कीड- रोग नियंत्रण, पाणीव्यवस्थापन या बाबी महत्त्वाच्या आहेत. साठवणुकीच्या धान्याची योग्यपद्धतीने साठवणूक ही बाबही महत्‍वाची आहे.

साठवणीचे धान्य
साठवणीच्या धान्यातील ओलाव्याचे प्रमाण अधिक असल्यास साठवणीमध्ये किडींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी साठवणीपूर्वी धान्य उन्हात चांगले वाळवावे. धान्यातील ओलावा १० टक्क्यांपेक्षा कमी राहील याची काळजी घ्यावी.

सद्यस्थितीत भाजीपाला पिकातील कीड- रोग नियंत्रण, पाणीव्यवस्थापन या बाबी महत्त्वाच्या आहेत. साठवणुकीच्या धान्याची योग्यपद्धतीने साठवणूक ही बाबही महत्‍वाची आहे.

साठवणीचे धान्य
साठवणीच्या धान्यातील ओलाव्याचे प्रमाण अधिक असल्यास साठवणीमध्ये किडींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी साठवणीपूर्वी धान्य उन्हात चांगले वाळवावे. धान्यातील ओलावा १० टक्क्यांपेक्षा कमी राहील याची काळजी घ्यावी.

ऊस
उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता जाणवते. अशा वेळी पिकामध्ये पाचट आच्छादनाचा वापर करावा. पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन पीकपाण्याचा ताण सहन करेल. पाण्याची कमतरता असल्यास, ठिबक सिंचन फायदेशीर ठरते. त्यातही पाणी कमी पडल्यास, पिकाच्या वाढीनुसार एक दिवसाआड दोन तास संच चालवावा. प्रवाही पद्धतीने पाणी देत असल्यास एक सरी आड पाणी द्यावे. ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे, त्यांनी उन्हाळ्यात ८-९ दिवसांच्या अंतराने  ८ सें.मी. खोलीपर्यंत पाणी द्यावे.

कांदा

 • कांदा पिकावर सध्याच्या वातावरणामुळे फुलकिडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी फवारणी प्रतिलिटर पाणी कार्बोसल्फान १ मि.लि. किंवा फिप्रोनील १.५ मि.लि. अधिक स्टिकर १ मिली
 • करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत असल्यास, त्याच्या नियंत्रणासाठी फवारणी करावी. प्रमाण प्रतिलिटर पाणी मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनील २५ ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १ मि.लि.  
 • वरील कीटकनाशकांत मिसळून फवारणी करता येते.
 • कीड व रोगाच्या प्रादुर्भावानुसार पुढील फवारणी कीडनाशक बदलून १० ते १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.
 • कांदा काढणीआधी १५ दिवस पिकावर कार्बेन्डाझिम १.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

पानवेल
मुळांवर गाठी करणाऱ्या सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी ८०० किलो निंबोळी पेंड प्रतिएकरी जमिनीत मिसळून हलके पाणी द्यावे. त्यानंतर एक महिन्याने ८ किलो ट्रायकोडर्मा प्लस प्रतिएकरी १०० किलो शेणखतातून झाडाभोवती मातीत मिसळून हलके पाणी द्यावे.

लसून घास
हिरवी अळीच्या व्यवस्थापनासाठी, फवारणी
एसएलएनपीव्ही १ मि.लि. अधिक बिव्हेरिया बॅसिअाना ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी.

फळझाडे

 • फळझाडांना पाण्याची कमतरता असल्यास सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा. उदा. ज्वारीची धसकटे, तुरकाड्या, वाळलेले गवत, गव्हाचा भुसा/काड्या, उसाचे पाचट, कपाशीच्या पऱ्हाट्या, वाळलेली पाने इत्यादी.
 • पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे फळपिकाच्या वाढीनुसार पाणी द्यावे. अगदीच कमतरता असल्यास फळझाडे किमान जिवंत राहण्यासाठी एक तास तरी संच चालवावा. एक दिवसाआड पाणी ठिबक सिंचनातून द्यावे.

लिंबूवर्गीय पिके
सिट्रस सायला या रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रतिलिटर पाणी क्विनाॅलफाॅस (२५ टक्के प्रवाही) १ मि.लि. किंवा नोव्हॅलुराॅन (१० टक्के प्रवाही) ०.५५ मि.लि.  

पशुधन व्यवस्थापन

 • कोंबड्यांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेडच्या बाजूने बारदान लावावे; तसेच छतावर वाळलेले गवत किंवा गव्हाच्या काड्यांचे आच्छादन करावे.
 • मेंढ्यांचे देवी रोगापासून संरक्षण करण्यासाठी लसीकरण करावे.
 • वाढत्या तापमानामुळे गाभण जनावरे बाहेर चरावयास नेऊ नये. विशेषतः उष्ण भागात गाई म्हशींच्या अंगावर गोणपाट टाकून पाणी टाकावे.
 • सहा महिन्यांखालील जनावरांना युरिया प्रक्रिया केलेला चारा देऊ नये, अन्यथा विषबाधा होण्याची शक्यता असते.

वेलवर्गीय भाजीपाला

 • भाजीपाला पिकास पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचाच (उदा. ठिबक सिंचन, तुषार सिंचन) वापर करावा. पिकांना पाणी देत असताना शक्यतो सकाळी, सायंकाळी किंवा रात्री पाणी द्यावे.
 • वेलवर्गीय भाजीपाला पिकांच्या बगलफुटी काढून टाकाव्यात.
 • फुले येण्याच्या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नये.

करपा

 • पिके : काकडी, कारली, दोडका, घोसाळी, दुधी भोपळा, तांबडा भोपळा या वेलवर्गीय पिकांवर केवडा रोग येतो.  
 • रोगकारक बुरशी : सुडोपेरोनोस्पोरा कुबेन्सीस.
 • लक्षणे : सुरवातीला पानाच्या वरच्या बाजूला फिक्कट हिरवे पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात. ढगाळ हवामानात या ठिपक्यांच्या खालच्या बाजूला जांभळट रंगाची बुरशीची वाढ झालेली दिसते. नंतर हेच जांभळट डाग पांढरे काळे किंवा राखाडी झालेले दिसतात.
 • उपाययोजना : रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत.
 • प्रतिबंधक फवारणी : बियाण्यांची उगवण झाल्यानंतर २० दिवसांपासून ८ ते १० दिवसांच्या अंतराने, क्लोरोथॅलोनील २.५ ग्रॅम किंवा मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा काॅपर आॅक्झिक्लोराईड २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी
 • उपचारात्मक फवारणी : रोगाचा प्रादुर्भाव दिसताच, मेटॅलॅक्झिल एम. अधिक मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी.

भुरी  

 • पिके : जवळ-जवळ सर्वच वेलवर्गीय पिकांमध्ये प्रादुर्भाव.
 • रोगकारक बुरशी : ईरीसीफी सीकोरेसीआरम.
 • लक्षणे : रोगाची सुरवातच प्रथम जुन्या पानांपासून होते. पानाच्या दोन्ही पृष्ठभागावर पिठासारखी पांढरी बुरशी वाढते.
 • उपाययोजना :  भुरी रोगाची लक्षणे दिसताच फवारणी प्रतिलिटर पाणी डिनोकॅप १ मि.लि. किंवा पेनकोनॅझोल १ मि.लि. किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम

सूर्यफूल
केसाळ अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
नियंत्रण :

 • लहान अळ्यांचे पुंजके वेचून राॅकेलमिश्रित पाण्यात टाकून नाश करावा.
 • क्विनॉलफॉस (१.५ टक्के) १० किलो किंवा कार्बारील (१० टक्के भुकटी) १० किलो प्रतिएकर याप्रमाणात सकाळी वारा शांत असताना धुरळावी.
   

संपर्क :  ०२४२६- २४३२३९
(कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

इतर तेलबिया पिके
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
उन्हाळी भुईमुगावरील रसशोषक किडींचे...उन्हाळी भुईमुगामध्ये पीक कालावधीत सुरवातीच्या...
लागवड उन्हाळी तिळाचीउन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
गादीवाफ्यावर करा भुईमूग लागवडभुईमुगाची गादीवाफ्यावर पेरणी एक मीटर रुंदीचे...
लागवड उन्हाळी भुईमुगाची...उन्हाळी हंगामातील लागवडीसाठी टीएजी २४ आणि एसबी ११...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...
मोहरी, जवस लागवड व्यवस्थापनरब्बी हंगामात तेलबिया पिके अत्यंत महत्त्वाची असून...
तंत्र करडई लागवडीचेकरडर्ई अधिक हरभरा (३:१) अशी आंतरपिकाची लागवड...
आरोग्यासाठी जवस फायदेशीरयंत्र सुव्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी वंगण किंवा...
सोयाबीनवरील किडींचे व्यवस्थापनएकात्मिक कीड व्यवस्थापन पिकाच्या...
सोयाबीनवर दिसतोय खोडमाशीचा प्रादुर्भावराज्यामध्ये सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळत...
रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीनची पेरणीसोयाबीनच्या ३ किंवा ४ ओळी आणि वरंब्याच्या दोन्ही...
सोयाबीन उत्पादनवाढीची सप्तसूत्रेसोयाबीन पिकामध्ये योग्य वाणाची निवड, पेरणीची...
पीक सल्ला : बागायती कापूस, उन्हाळी...बागायती कापूस शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव...
करडईची अधिक उत्पादनक्षम नवीन जात विकसितभारतीय तेलबिया संशोधन संस्थेच्या वतीने डी.एस.एच...
कृषी सल्ला : सूर्यफूल, उन्हाळी भुईमूग,...सूर्यफूल पिकास पाण्याच्या पाळ्या ७ ते ८...
कृषी सल्ला : ऊस, कांदा, लसून घास,...सद्यस्थितीत भाजीपाला पिकातील कीड- रोग नियंत्रण,...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...