अमरावती विभागात सात-बारामध्ये सव्वा तीन लाख त्रुटी

अमरावती विभागात अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम व यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. या पाचही जिल्ह्यांत सातबारामध्ये सव्वातीन लाख त्रुटी आढळून आल्या. ३१ जुलैपर्यंत या त्रुटी दूर करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर १ ऑगस्टपासून डिजिटल स्वाक्षरीचे काम होत ऑनलाइन सातबाऱ्याची उपलब्धता केली जाईल. या कामासाठी २७ जुलैला पाचही जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांची एक बैठक बोलावण्यात आली आहे. - पीयूष सिंग, विभागीय आयुक्‍त, अमरावती.
अॅग्रो अजेंडा
अॅग्रो अजेंडा

अमरावती  ः सात - बारा उताऱ्याची डिजिटलकरणाची प्रक्रिया सुरू असून, या प्रक्रियेदरम्यान अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत सुमारे तीन लाखांपेक्षा अधिक त्रुटी आढळल्या आहेत. हा प्रकार पीककर्ज वितरणात अडसर ठरू नये याकरिता हस्तलिखित सातबारा वितरणाची प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यात आली आहे.

राज्यात एक ऑगस्टपासून डिजिटल स्वाक्षरी असलेल्या सातबाऱ्याचे वितरण होईल, अशी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. अमरावती विभागातदेखील त्यानुसार सात -बारा डिजिटल करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली.

चावड्यांवर सातबारा वाचनातून अनेक हरकती, आक्षेप नोंदविण्यात आले. त्यानुसार काही ठिकाणी सुधारणाही करण्यात आल्या. त्यानंतर परत सातबारा वाचन झाले; त्या वेळी पुन्हा काही आक्षेप, सूचना व हरकती मिळाल्या. ही सारी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना सव्वातीन लाख त्रुटी पाच जिल्ह्यांत समोर आल्या आहेत.

या त्रुटीचे निराकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्रुटी दूर करून सातबारा शासनाने सुचविलेल्या सर्व्हरवर अपलोड केल्या जात आहे. पेरेपत्रकाचेदेखील अशा प्रकारचे नियोजन आहे. दरम्यान, खरीप हंगाम असल्याने शेतकरी पीककर्ज काढतात. या कामात त्यांना सातबाऱ्याचा अडसर भासू नये, याकरिता हस्तलिखीत सात-बारा वितरित केले जात आहेत. सातबारा उपलब्धतेबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी नाहीत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com