agriculture news in marathi, AGRO AGENDA, milk rate issue in state | Agrowon

उत्पादकता, गुणवत्ता सुधारणे आवश्‍यक
कोजेन्सिस वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

पुणे : भारत दूध उत्पादनात जगात आघाडीवर असला तरी उत्पादकता आणि दुधाच्या गुणवत्तेत पिछाडीवर आहे. उत्पादकता आणि गुणवत्ता सुधारल्याशिवाय दूध उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार नाही आणि हा धंदा किफायतशीर ठरणार नाही, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि जाणकारांनी व्यक्त केले. पायाभूत सुविधा, पशुखाद्याचा स्वस्त दरात पुरवठा, जनावरांच्या जनुकीय शुद्धतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकरीकेंद्रित धोरणे ही चतुःसूत्री त्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे : भारत दूध उत्पादनात जगात आघाडीवर असला तरी उत्पादकता आणि दुधाच्या गुणवत्तेत पिछाडीवर आहे. उत्पादकता आणि गुणवत्ता सुधारल्याशिवाय दूध उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार नाही आणि हा धंदा किफायतशीर ठरणार नाही, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि जाणकारांनी व्यक्त केले. पायाभूत सुविधा, पशुखाद्याचा स्वस्त दरात पुरवठा, जनावरांच्या जनुकीय शुद्धतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकरीकेंद्रित धोरणे ही चतुःसूत्री त्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारताला दुधाच्या बाबतीत जगाच्या बाजारपेठेत स्पर्धा करावी लागत असली तरी परदेशातील दूध व्यवसायाचे स्वरूप आणि देशातील स्थिती यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. परदेशात द्रव स्वरूपातील दूध केवळ १०-१५ टक्के विकले जाते. तेथे प्रक्रियायुक्त पदार्थांचीच बाजारपेठ मोठी आहे. भारतात मात्र पिशवीबंद दुधाचा बाजारपेठेतील वाटा ४५ टक्के आहे. देशात साठवणुकीच्या पायाभूत सुविधांचा (कोल्ड स्टोरेज, चिलिंग प्लॅन्ट्स, बल्क कुलर्स, रेफ्रिजरेटेड व्हॅन्स, इन्सुलेटेड टॅंकर्स इ.) अभाव असल्यामुळे २० टक्क्यांहून कमी दुधावर प्रक्रिया होते. तसेच दुधाला उत्पादन खर्च भरून निघेल इतकाही दर मिळत नसल्यामुळे उत्पादकता कमालीची घटली आहे.

त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी तोट्याच्या दुष्टचक्रात अडकला आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता जागतिक मानांकनाच्या तुलनेत कमी असल्याने; तसेच ते महाग पडत असल्याने जागतिक बाजारपेठेत त्यांना फारशी मागणी नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भांडवल पुरवठा,  शुद्ध वंशाची जनावरे होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, अनुत्पादक जनावरांचे नियंत्रण आदी उपाय गरजेचे आहेत, असे तज्ज्ञांनी सांगितले. 
शेतकऱ्यांनी दुधाच्या धंद्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा व बाजारपेठेतील मागणी व पुरवठ्याचे तंत्र लक्षात घेऊन नियोजन करावे, असेही तज्ज्ञांनी सूचवले आहे. 

राज्यात `अमूल`च्या धर्तीवर सर्व सहकारी संघांचा दुधाचा एकच ब्रॅंड तयार करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे या क्षेत्रातील सहभागी घटकांचे (स्टेकहोल्डर्स) मत आहे. राज्यातील दुधाचा एकच ब्रॅंड झाल्यास दुधाच्या मार्केटिंग, कमिशनवरचा वारेमाप खर्च कमी होईल, दुधाला मोठी बाजारपेठ मिळेल, मार्केटिंग चॅनेलचा विस्तार होईल आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच सहकारी दूध संघांच्या व्यवस्थापन खर्चात कपात, कार्यक्षम कारभार, व्यावसायिक दृष्टिकोनाचा अंगीकार आदी सुधारणा आवश्यक आहेत. सहकारी दूध संघांतील अनिष्ट राजकीय स्पर्धेला लगाम घालण्यासाठी एका गावात एकच सोसायटी, तालुका किंवा जिल्हा स्तरावर एकच संघ आणि राज्य पातळीवर एक शिखर संस्था हे मॉडेल स्वीकारण्याची गरज असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

दुधाला दर नसल्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची गोवंशहत्याबंदी कायद्यामुळे आणखीनच परवड झाली आहे. जुनी जनावरे विकून नवीन जनावरे विकत घेण्याचे चक्र थंडावले आहे. भाकड आणि अनुत्पादक जनावरे सांभाळण्याचा भुर्दंड शेतकऱ्यांच्या माथी मारला गेला. जनावरे विकता येत नसल्यामुळे ती जादा काळ सांभाळावी लागत आहेत. त्यामुळे सुरवातीच्या काळात एकूण दूध उत्पादन वाढल्याचे दिसत असले तरी या जनावरांची उत्पादकता कमी असल्यामुळे हे वाढीव उत्पादन खर्चिक ठरते. उत्पादन खर्च प्रचंड वाढत असल्याने तोटा वाढतो. हा बोजा डेअरी उद्योगाला नव्हे तर शेतकऱ्यांना सहन करावा लागतो.  

   दूध व्यवसायाच्या भल्यासाठी...

  • दुधाची उत्पादकता आणि गुणवत्ता सुधारण्याची गरज.
  • उत्पादन खर्चात कपात आवश्यक. पशुखाद्याचा स्वस्त दरात पुरवठा गरजेचा.
  • जनावरांच्या जनुकीय शुद्धतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर.
  • दुधाच्या मागणी आणि पुरवठ्याचे गणित लक्षात घेऊन नियोजन आवश्यक.
  • राज्यात दुधाचा एकच ब्रॅंड असावा.
  • सहकारी दूध क्षेत्रातील अनिष्ट राजकीय स्पर्धेला लगाम हवा.
  • गोवंशहत्याबंदी कायद्यामुळे दूध उत्पादक शेतकरी तोट्याच्या गर्तेत.
  • शेतकरीस्नेही धोरणांसाठी आग्रह हवा.

इतर अॅग्रो विशेष
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक थांबणार कधी?नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मुख्य अर्थकारण...
यवतमाळच्या अनिकेतने तयार केला फवारणीचा...यवतमाळ ः फवारणीमुळे होणाऱ्या विषबाधा सर्वदूर...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर...पणजी : गेल्या एक वर्षापासून अधिक काळ...