गर्दीने फुलले ॲग्रोवनचे कृषी प्रदर्शन

सांगली : ॲग्रोवनच्या वतीने आयोजित कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी पश्‍चिम महाराष्ट्राबरोबरच उत्तर कर्नाटतील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली (छायाचित्र - उल्हास देवळेकर, सांगली)
सांगली : ॲग्रोवनच्या वतीने आयोजित कृषी प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी पश्‍चिम महाराष्ट्राबरोबरच उत्तर कर्नाटतील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली (छायाचित्र - उल्हास देवळेकर, सांगली)

सांगली : कृषी क्षेत्रात नवनवीन सुधारणेचा मंत्र घेऊन आलेल्या ॲग्रोवन कृषी प्रदर्शनास शनिवारी (ता. ६) शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाचा आज (रविवार) अंतिम दिवस आहे.

शेतकऱ्यांचे अनेक कुतूहलपूर्ण प्रश्‍न आणि स्टॉलधारकांकडून करण्यात येणारे त्यांचे शंका समाधान या वातावरणात संवादाचा एक नवा पूूल बांधला जात असल्याचे दृष्य प्रदर्शनस्थळी होते. नेचर केअर फर्टिलायझर्स प्रस्तुत ॲग्रोवन" कृषी प्रदर्शनाचा आजचा दुसरा दिवस होता. सांगलीसह, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, बेळगाव जिल्ह्यातून हजारो शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला हजेरी लावली. याच बरोबर ऊसविषयक व्याख्यानाला उच्चांकी गर्दी करत शेतकऱ्यांनी तज्ज्ञांकडून माहिती मिळविली.

येथील नेमिनाथनगर मैदानावरील प्रदर्शन स्थळ दिवसभर शेतकऱ्यांच्या उपस्थितीने भरून गेले. केवळ शेती व शेतीपूरक व्यवसायासाठीचे हे प्रदर्शन शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. प्रदर्शनात अनेक लहान मोठी अवजारे, यंत्रे आदींचा समावेश आहे.

जगभरात जास्त दूध उत्पादन देणाऱ्या उत्कृष्ट प्रतिच्या वीर्याच्या उत्पादनाचे जागतिक दर्जाचे केंद्र व वीर्य बॅंकेची संकल्पना बी. जी. चितळे डेअरीने आणली आहे. उत्कृष्ट जनावरांच्या संगोपनासाठी असलेली ही बॅंक शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत होती. याचबरोबर नेचर केअरच्या वतीने पिकांना दिलेले पाणी जमिनीत टिकवण्यसाठीची विविध उत्पादनेही शेतकऱ्यांची उत्सुकता वाढविणारी ठरत होती. दुपारच्या सत्रात कृषी विषयांची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी शेतकऱ्यांना व्याख्यानाद्वारे दिली.  

महिला शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती प्रदर्शन महिला शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत आङे. दुग्धोत्पादनासंदर्भाचे स्टॉल, प्रक्रिया उद्यागाबाबतचे स्टॉल आदींची चौकशी महिला शेतकऱ्यांकडून प्राधान्याने करण्यात येत होती. घरच्या घरी काही कृषीपूरक उद्योग करता येईल का, याबाबतची चाचपणीही काही महिला शेतकऱ्यांनी या वेळी प्रदर्शनात स्टॉलधारकांशी बोलताना केली.

आज रविवार (ता. ७) होणारे व्याख्यान  व्याख्याते ः एन. बी. म्हेत्रे (द्राक्षतज्ज्ञ तासगाव)  विषय ः द्राक्ष बागेसाठी जमिनीचे व्यवस्थापन  वेळ ः दुपारी १२ ते २  व्याख्याते ः डॉ. राहुल गुप्ता,     (सरव्यवस्थापक, चितळे जिनस एबीएस इंडिया)  विषय ः दुधाळ जनावरांच्या प्रजाती व     आदर्श गोठा व्यवस्थापन  वेळ ः दुपारी ३ ते ५

नावीन्यपूर्ण संकल्पनेकडे ओढा

विविध भाजीपाल्याची वाढ चांगली होण्यासाठी व त्याच्या आच्छादनसाठी असणाऱ्या ग्रो कव्हरची नवी संकल्पना प्रदर्शनातून मांडण्यात आली आहे. याच बरोबर विविध प्रकारची मशागतीची यंत्रे, द्राक्षांच्या अवस्था दाखविणारे पोस्टर प्रदर्शन, पिकांच्या संरक्षणासाठीच्या कुंपणाच्या तारा, विविध भू सुधारके आदीसह विविध प्रकारचे स्टॉलही शेतकऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com