agriculture news in marathi, Agro Input dealers associations national session in kopargaon, ahmednagar | Agrowon

अॅग्रो इनपूट डीलर्स असोसिएशनचे आजपासून राष्ट्रीय महाअधिवेशन
वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

कोपरगाव, जि. नगर :  नवी दिल्लीस्थित अॅग्रो इनपुट डीलर्स असोसिएशनच्या राष्ट्रीय महाअधिवेशनास आज (ता. ७)पासून येथे प्रारंभ होत आहे. केंद्रीय रसायन व खतमंत्री अनंत कुमार, राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला, केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, केंद्रीय जल राज्यमंत्री अर्जुन राम मेघावत प्रमुख उपस्थित असणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या (ता. ८) होणार आहे. 

कोपरगाव, जि. नगर :  नवी दिल्लीस्थित अॅग्रो इनपुट डीलर्स असोसिएशनच्या राष्ट्रीय महाअधिवेशनास आज (ता. ७)पासून येथे प्रारंभ होत आहे. केंद्रीय रसायन व खतमंत्री अनंत कुमार, राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला, केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, केंद्रीय जल राज्यमंत्री अर्जुन राम मेघावत प्रमुख उपस्थित असणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनाचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या (ता. ८) होणार आहे. 

अॅग्रो इनपुट डीलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री, उपाध्यक्ष पुरुषाेत्तम खंडेलवाल, खजिनदार आबासाहेब भोकरे व राaज्य शाखेचे अध्यक्ष प्रकाष कवडे यांनी ही माहिती दिली. या महाअधिवेषनाचे उद्‍घाटन सकाळी साडेदहा वाजता कोपरगावजवळील नगर मनमाड महामार्गावरील साईसृष्टी निसर्ग लॉन्स येथे होत आहे. यास राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, रासी सीडसचे अध्यक्ष एम. रामास्वामी, एनएसएल ग्रुपचे अध्यक्ष एम. प्रभाकर राव, साउथ आशिया एफएमसीचे व्यवसाय संचालक एस. एन श्रीनिवास, खासदार रामचरण बोहरा, खासदार चंद्रकांत खैरे, खासदार संजयकाका पाटील, खासदार सदाशिव लोखंडे खासदार दिलीप गांधी, खासदार राजीव सातव, आमदार मोहनलाल गुप्ता (जयपूर), आमदार स्नेहलता कोल्हे, शिर्डी नगरपंचायतीच्या अध्यक्षा योगिता शेळके आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

महाअधिवेशन समारोपास (ता. ८) सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थितीत आहेत. अधिवेशनाचा १ वाजता समारोप हाईल. याप्रसंगी शेतकरी व कृषी व्यावसायिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...