agriculture news in marathi, agro products shop will start in housing socitys, pune, maharashtra | Agrowon

गृहनिर्माण संस्थांमध्ये सुरू होणार शेतीमाल विक्री दालन
टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

‘कॉप - शॉप’च्या माध्यमातून विकास साेसायटी, खरेदी विक्री संघ, महिला बचत गट, शेतकरी गट, उत्पादक कंपन्यांद्वारे फळे भाजीपाल्यासह प्रक्रिया केलेला शेतमालाची विक्री करता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ आणि ग्राहकांना रास्त दरात शेतमाल उपलब्ध हाेणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात पहिल्या टप्प्यात ५० शॉप सुरू करण्याचे प्रयत्न आहे.
- आनंद कटके, जिल्हा उपनिबंधक.
 

पुणे   ः थेट ग्राहकांना शेतीमाल उपलब्ध व्हावा तसेच शेतकऱ्यांना शेतीमालाचा योग्य मोबदला मिळावा या उद्देशाने गृहनिर्माण संस्थांमध्ये शेतीमाल विक्री करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. अटल महापणन विकास अभियानाअंतर्गत गृहनिर्माण संस्थांना शेतीमाल विक्री दालन सुरू करता येणार आहे. या विक्री दालनाचे (कॉप-शॉप) शेतकरी गट, महिला बचत गट, शेतकरी कंपन्या कराराद्वारे संचलन करू शकणार आहेत. या निर्णयामुळे गृहनिर्माण संस्थांमधील सदस्यांना घरपाेच शेतीमाल रास्त दरात उपलब्ध हाेणार आहे.

शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री व्यवस्था बळकटीकरणासाठी सहकार, पणन विभागाच्या वतीने विविध उपाययाेजना केल्या जात आहेत. यासाठी गृहनिर्माण संस्थांमधून शेतीमाल विक्री करण्यास मान्यता देण्यात आली हाेती.

मात्र या व्यवस्थेमध्ये सातत्य राहत नसल्याने याेजनेचा हेतू सफल हाेत नव्हता. म्हणून आता गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या आवारात १०० चाैरस फुटांचे विक्री दालन उभारण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. हे दालन शेतकरी गट, कंपनी, बचत गट, खरेदी विक्री संघ, विकास साेसायट्याद्वारे चालविण्यात येणार आहे. यासाठी संबंधित गृहनिर्माण संस्था आणि शेतमाल विक्री करणारी संस्था यांच्यात करार करावा लागणार आहे. तसेच माेबाईल शाॅपदेखील संबंधित संस्था चालवू शकणार आहे.

याेजनेची कार्यपद्धती

  • सदर शॉप संस्थेच्या आवारात चालवायचे आहे.
  • आवारामध्ये १०० चाैरस फूट जागा आवश्यक.
  • शॉप उभारणीचा खर्च संस्थेने स्वतः करावयाचा आहे.
  • संस्थेतील सदस्यांच्या मागणीनुसार शेतीमाल आणि डेअरी उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध हाेणार.
  • शॉप चालविण्यासाठीचा करार करावा लागणार.

इतर अॅग्रो विशेष
रानडुकरांचे पर्यावरणस्नेही व्यवस्थापनवनविभाग किंवा जंगलाच्या आसपास असलेल्या...
मराठवाड्यात भीषण जलसंकटऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८२४ लघू मध्यम...
पशुपालन, प्रक्रिया उद्योगात नेदरलॅंडची...शास्त्रीय पद्धतीने पशुपालन, दुग्धोत्पादन आणि...
आदिवासी पाड्यावर रुजली कृषी उद्योजकताकोणे (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथील आदिवासी...
मंडळ स्तरावरील अचूक हवामान अंदाजासाठी...परभणी ः महावेध प्रकल्पांतर्गत मंडळ स्तरावरील...
विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. यातच दोन...
राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प...नाशिक: कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, या...
मॉन्सून मंगळवारपर्यंत उत्तर...पुणे: नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता. १८...
राज्याचे स्वतंत्र निर्यात धोरण ठरणारनागपूर ः शेतीमालाची निर्यात दुपटीने वाढविण्याचे...
राज्यात कापूस बियाणे विक्री २५ मेपासूनजळगाव ः राज्यातील पूर्वहंगामी कापूस लागवड...
दुष्काळात परवडीने ओलांडली सीमा (video...औरंगाबाद : वीस वर्षांचा होतो तवापासून शेतीत राबतो...
Breaking : मॉन्सून अंदमानात दाखलपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (ता. १८)...
बिगर नोंदणीकृत जैविक उत्पादनात खत...पुणे : शेतकऱ्यांना पुरविल्या जाणाऱ्या बिगर...
अर्थकारण उंचावणारी उन्हाळी मुगाची शेती वाशिम जिल्ह्यातील पांगरी नवघरे येथील दिलीप नवघरे...
दोनशे देशी गायींच्या संगोपनासह ...सुमारे दोनशे देशी गायींचे संगोपन-संवर्धन यासह...
सांगली : दुष्काळी भागात मंत्र्यांच्या...सांगली ः जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील...
‘रोहयो’च्या प्रस्तावांना तीन दिवसांत...मुंबई  ः रोजगार हमी योजनेखाली कामांच्या...
बनावट खतनिर्मिती कारखान्यावर गुणवत्ता...नाशिक : केवळ सेंद्रिय खतांच्या उत्पादनाचा परवाना...
सचिव, आयुक्तांना झुगारून ‘को-मार्केटिंग...पुणे : शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कावळ्याच्या...
साखर निर्यातीकडील दुर्लक्ष कारखान्यांना...कोल्हापूर : केंद्र सरकारने साखर निर्यातीचे दिलेले...