agriculture news in marathi, Agrotech agricultural demonstration in 'Pandekravi' | Agrowon

अकोल्यात अाजपासून ‘पंदेकृवि’चे ॲग्रोटेक कृषी प्रदर्शन
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 डिसेंबर 2017

अकोला : कृषिक्रांतीचे प्रणेते, स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ११९व्या जयंतीनिमित्त बुधवार (ता.२७) ते शुक्रवार (ता.२९) या काळात कृषी प्रदर्शन अायोजित करण्यात अाले. बुधवारी राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन होईल, अशी माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे कुलगुरु डाॅ. विलास भाले यांनी पत्रकारांना दिली.

अकोला : कृषिक्रांतीचे प्रणेते, स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ११९व्या जयंतीनिमित्त बुधवार (ता.२७) ते शुक्रवार (ता.२९) या काळात कृषी प्रदर्शन अायोजित करण्यात अाले. बुधवारी राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन होईल, अशी माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे कुलगुरु डाॅ. विलास भाले यांनी पत्रकारांना दिली.

यावर्षीचे हे प्रदर्शन ‘कीड संरक्षण व सेंद्रिय शेतीवर भर’ या थीमवर अाधारलेले असून शेतकऱ्यांना काळानुरूप माहिती देणारे ठरले, असा विश्वास डॉ. भाले यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला विद्यापिठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. एम. मानकर, रजिष्टार डॉ. कडू उपस्थित होते. या वेळी डॉ. भाले यांनी विद्यापीठाच्या कार्याचा सविस्तर अाढावा सादर केला.

विद्यापिठाच्या क्रीडांगणावर होत असलेल्या या प्रदर्शनामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले विविध पिक वाण, तांत्रिक शिफारशी, पीकनिहाय तंत्रज्ञान, लागवडीपासून तर बाजारपेठेपर्यंत लागणारे शेती अवजारे, यंत्र पाहण्यास उपलब्ध राहणार अाहेत. या वर्षी २० प्रयोगशील शेतकऱ्यांना स्वतःची माहिती देण्याची संधी देण्यात अाली अाहे.

सकाळी ११ वाजता कृषिमंत्री फुंडकर यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या या कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहील. तर कुलगुरू डॉ. विलास भाले अध्यक्ष असतील.

मोबाईल ॲपचे होणार उदघाटन
शेतकऱ्यांना विविध पिकात तणनियंत्रण करावे लागते. या बाबत माहिती देण्यासाठी एक मोबाईल ॲप बनविण्यात अाले असून, त्याचे बुधवारी कृषिमंत्री फुंडकर यांच्या हस्ते उदघाटन केले जाणार अाहे.

इतर अॅग्रो विशेष
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...