सांगली जिल्ह्यात द्राक्षाच्या क्षेत्रात वाढ

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली : जिल्ह्यात यंदा द्राक्षाच्या शेती क्षेत्रात वाढ होत आहे. शेतकरी वीस वर्षे जुन्या झालेल्या द्राक्ष बागा काढून त्या ठिकाणी नवीन द्राक्ष बागेची लागवड करत आहेत. तर नवीन जाती असणाऱ्या द्राक्ष लागवडीचे प्रमाणदेखील वाढले असून, नवीन वाणांचे पाच टक्के क्षेत्र वाढल्याचा अंदाज द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातील द्राक्षाच्या क्षेत्रातील वाढ आणि जुन्या व नव्या बागांची नोंदणी लवकर केली जाणार आहे. पलूस, वाळवा, तासगाव, मिरज कवठेमहांकाळ सह जत तालुक्‍याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात द्राक्ष शेती आहे. जिल्ह्यात एक लाख एकरवर द्राक्षाचे क्षेत्र आहे. गेल्या वर्षभरात द्राक्ष बागेचे क्षेत्र वाढले आहे.

पलूस तालुक्‍यात यावर्षी १ हजार ७०० एकराने द्राक्ष बागायत क्षेत्रात वाढून ते १२ हजार एकराच्या घरात पोहोचले आहे. तरुण शेतकरी आता ऊस शेतीला फाटा देऊन द्राक्ष शेतीकडे वळल्याचे चित्र आहे. प्रामुख्याने तास ए गणेश, सोनाक्‍का, माणिक चमण, सुपर सोनाक्‍का, कृष्णा व ज्योती आदी जातीच्या द्राक्षबागांचे क्षेत्र तालुक्‍यात आहे.

द्राक्षाची शेती अभ्यासपूर्ण पद्धतीने केली तर बऱ्यापैकी उत्पन्न मिळू शकते याचा अनुभव द्राक्ष बागायतदारांना आला आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांना वीस वर्षांपूर्वी लागवड केलेल्या जुन्या बागा काढून नवीन बागा लागवडीचे काम हाती घेतले आहे.

पूर्वी दोन एकर द्राक्षाचे क्षेत्र असेल तर त्यात आणखी दोन एकर क्षेत्राची वाढ शेतकरी करू लागले आहेत. तसेच निर्यात आणि टेबल ग्रेप्स याचे उत्पादन कसे घेता येईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

जिल्ह्यात द्राक्षाच्या जुन्या बागा काढून नवीन लागवड होते आहे. एकूण किती द्राक्षाच्या क्षेत्रात वाढ झाली, याची माहिती घेण्यासाठी लवकरच नोंदणी सुरू केली जाणार आहे.   - सुभाष आर्वे, अध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ

देशातील द्राक्षाच्या उत्पन्नाच्या ९० टक्‍के उत्पन्न महाराष्ट्रात घेतले जाते. देशात एकूण बेदाण्याचे उत्पन्न ७ लाख टन व खाण्यासाठी २५ लाख टन द्राक्षाचे उत्पन्न होते. ९० लाख टन द्राक्षाची गरजे असून यापुढेही द्राक्षाला मागणी असणार आहे.

 - मारुती चव्हाण,  द्राक्ष उत्पादक शेतकरी, पलूस, जि. सांगली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com