फळबाग लागवडीसाठी पावणेदोन लाख रोपे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः खरीप हंगामात कृषी विभागामार्फत मोठ्या प्रमाणात फळबाग लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील शासकीय फळबाग रोपवाटिकेत सुमारे एक लाख ७० हजार ३२७ रोपे उपलब्ध करण्यात आली आहेत. ज्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या फळबाग लागवडीच्या योजनेतून लाभ घ्यावयाचा आहे, अशा शेतकऱ्यांना विनामूल्य रोपे दिली जाणार आहे. तर किरकोळ लागवड करणाऱ्यांना शासकीय दराप्रमाणे रोपांची विक्री केली जाणार आहे.  

पुणे जिल्ह्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा कार्यक्रम देण्यात आला आहे. यंदा जिल्ह्यात फळबाग लागवडीचा सहा हजार १५० हेक्टरचा लक्ष्यांक देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही रोपे घेऊन या योजनेतून विविध फळझाडांची लागवड करता येणार आहे. गेल्या वर्षी २०१७-१८ मध्ये ८३२ हेक्टरवर लागवड झाली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना आंबा, डाळिंब, द्राक्षे, लिंबू, मोसंबी, चिंकू, सीताफळ, बोर अशा विविध फळझाडाची लागवड करता येणार आहे. 

सध्या जिल्ह्यात कृषी विभागाच्या सहा फळरोपटिका आहेत. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती फळरोपवाटिका ही खेडमध्ये आहे. तर तालुकास्तरीय फळरोपटिका या जुन्नर, शिरूर, भुकूम (मुळशी), सदुंबरे, बारामती येथे आहेत. येथे दरवर्षी आंबा, पेरू, चिकू, सीताफळ, चिंच, डाळिंब, जांभूळ, फणस, लिंबू, आवळा, नारळ अशी विविध रोपे तयार केली जातात. ही कलमे, रोपे तयार झाल्यानंतर त्यांची दुसऱ्या वर्षी लागवडीसाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जातात. 

यंदाही जूनपासून फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना या रोपवाटिकेतून रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय खासगी रोपवाटिकाही उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बांधावर, शेतावर अशा कोणत्याही ठिकाणी फळझाडाची लागवड करता येणार आहे.

फळपीक कलमे संख्या रोपे संख्या 
आंबा ३६०६ ४०,८७१ 
पेरू ८६ -
चिकू १६६३ -
चिंच ७६३२
डाळिंब ६४,६३९ -
सीताफळ - १६,२२२
आवळा - ४५४१
लिंबू - १४,९८२ 
फणस - ५१२ 
जांभूळ - ३२९५ 
फणस - १२२७२
एकूण ७०,००० १,००३२७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com