agriculture news in Marathi, agrowon, 11 crore Corruption in 56 years | Agrowon

ग्रामनिधीत ५६ वर्षांत ११ कोटींचा अपहार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 मार्च 2018

नाशिक  : ग्रामपंचायतीचा कारभार करताना सरपंच, ग्रामसेवकाने ग्रामनिधीच्या माध्यमातून गेल्या ५६ वर्षांपासून गावांना कसे लुटले हे नुकतेच समोर आले आहे. वेळोवेळी लेखापरीक्षणात ताशेरे ओढूनही ग्रामनिधीत ११ कोटींहून अधिक रुपयांचा अपहार झाला आहे. लुटीचा प्रकार आजही राजरोस सुरू आहे. अपहार प्रकरणात ६८० ग्रामसेवक, तर १२९ सरपंच दोषी आढळले आहेत, तर या प्रकरणातील ४६ ग्रामसेवक मृत झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या अपहार रकमेची वसुली कशी होणार, हा प्रश्‍न आहे.

नाशिक  : ग्रामपंचायतीचा कारभार करताना सरपंच, ग्रामसेवकाने ग्रामनिधीच्या माध्यमातून गेल्या ५६ वर्षांपासून गावांना कसे लुटले हे नुकतेच समोर आले आहे. वेळोवेळी लेखापरीक्षणात ताशेरे ओढूनही ग्रामनिधीत ११ कोटींहून अधिक रुपयांचा अपहार झाला आहे. लुटीचा प्रकार आजही राजरोस सुरू आहे. अपहार प्रकरणात ६८० ग्रामसेवक, तर १२९ सरपंच दोषी आढळले आहेत, तर या प्रकरणातील ४६ ग्रामसेवक मृत झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या अपहार रकमेची वसुली कशी होणार, हा प्रश्‍न आहे.

नाशिक जिल्ह्यात स्थानिक लेखा निधी शाखेने वेळोवेळी लेखापरीक्षण करून आक्षेप नोंदविलेले असताना त्याकडे दुर्लक्ष करून कोट्यवधी रुपयांच्या ग्रामनिधीचा अपहार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी केल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त विभाग आणि विभागीय महसूल आयुक्‍त कार्यालयाकडून निदर्शनास आले आहे. हा प्रकार १९६२ पासून सुरू असल्याचे व यामध्ये सुमारे ६८० ग्रामसेवक १२९ सरपंच दोषी असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर कारवाई केल्याचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे. 

या प्रकरणी आमदार अनिल कदम यांनी प्रश्‍न विचारला होता. त्या वेळी मंत्री मुंडे यांनी सभागृहात उत्तर दिले. निफाडचे आमदार अनिल कदम यांनी सभागृहात आठ कोटी ७३ लाख रुपयांचा ग्रामनिधी अपहाराबाबत प्रश्‍न विचारला होता.

त्यावर उत्तर देताना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामनिधी अपहाराची रक्‍कम ११ कोटींहून अधिक असल्याचे आणि  ग्रामनिधीच्या अपहाराची ४४६ प्रकरणे आढळली असल्याचे सभागृहात निवेदन केले. जुनी प्रकरणे असल्याने ग्रामसेवक व संबंधित मृत असल्याने वसुली रखडल्याची कबुलीही मुंडे यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातील ग्रामनिधीच्या अपहाराच्या प्रकरणात ६८० ग्रामसेवक व १२९ सरपंच दोषी आढळून आले असल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाई केली असल्याचेही उत्तरामध्ये नमूद केले आहे. 

जानेवारी २०१८ च्या अखेर ग्रामनिधीच्या एकूण ४४६ प्रकरणांपैकी २०० प्रकरणांतील दीड कोटीच्या आसपासची रक्‍कम संबंधितांकडून वसूल केली. ३५ प्रकरणांत पाऊण कोटी रकमेचे फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले, तर २० प्रकरणांमध्ये सुमारे ३७ लाख रुपये रकमेचा बोजा संबंधितांच्या मिळकतीवर चढवण्यात आला आहे.

इतर ताज्या घडामोडी
संत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर  ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...
सूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद   : औरंगाबाद येथे आयोजित...
‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे  ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...
आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे  : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...
रोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...
लोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...
थंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...
पहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...
पाणंद रस्त्यांची निविदा प्रक्रिया सुरू अकोला : शासनाच्या पाणंद रस्ते योजनेतून...
`साखर उद्योगातील संघटित गुन्हेगारी...मुंबई : गेल्या वर्षीच्या हंगामातील ७०-३०...
शासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळतीअकोला : येथील मूर्तिजापूर मार्गावर असलेल्या...
कृषी योजनेतील विहिरींनाही दुष्काळाचा...धुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशात विहिरींनी...
नागपुरात `जलयुक्‍त`चा निधी आटलानागपूर : फडणवीस सरकारची महत्त्वाकांशी योजना...
मराठवाड्याची ७६२ कोटींची अतिरिक्‍त...औरंगाबाद ः शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेच्या...
नत्राच्या कार्यक्षम वापरासाठी सेन्सरचा...कृषी क्षेत्रातून होणाऱ्या नत्रांच्या प्रदूषणाची...
कृषिक प्रदर्शनातील प्रात्यक्षिके पाहून...बारामती, जि. पुणे ः कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या...
जाती-धर्माच्या भिंती तोडणे हीच स्व....इस्लामपूर, जि. सांगली : लोकनेते राजारामबापू पाटील...
पशुधन संख्येनुसार चारा उपलब्ध करून द्यापरभणी ः परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पशुधन...
ज्वारी, हरभरा, करडईच्या पेरणी...परभणी ः जिल्ह्यात यंदा ज्वारी, हरभरा, करडई या तीन...