वर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर शुभेच्छांचा वर्षाव !

वर्धापन दिनानिमित्ताने  ‘अॅग्रोवन’वर शुभेच्छांचा वर्षाव !
वर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर शुभेच्छांचा वर्षाव !

पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ बनलेल्या ॲग्रोवनला राज्यभरातून शेतकऱ्यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह वाचकांनी तेराव्या वर्धापन दिनासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. वर्धापन दिनानिमित्ताने प्रसिद्ध केलेल्या अॅग्रोवनच्या जमीन सुपीकता विशेषांकाचेही जोरदार स्वागत वाचकांनी केले.  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रगतीच्या नाना वाटा दाखवित व शेतशिवारातील सुखदुःखाच्या वळणावर सतत साथ देत अॅग्रोवनने शुक्रवारी (ता. २०) चौदाव्या वर्षात पदार्पण केले. बळिराजाचा सच्चा सोबती अशी प्रतिमा तयार झालेल्या अॅग्रोवनला यानिमित्ताने शेतकरी, शास्त्रज्ञ, शासकीय अधिकारी, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच कृषी उद्योगातील प्रतिनिधींकडून शुभेच्छा मिळत होत्या.  ॲग्रोवनच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने तीन स्वतंत्र विशेषांकांचा नजराणा सादर होत असून, त्यातील पहिला विशेषांक ''जमीन सुपीकता'' या विषयावर प्रसिद्ध करण्यात आला. आहे. अभ्यासपूर्ण माहिती असलेल्या या अंकाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले. केवळ शेती या विषयाला वाहिलेले देशातील एकमेव दैनिक म्हणून माध्यम क्षेत्रात परिचित झालेल्या अॅग्रोवनला शेतकऱ्यांनी आपला सच्चा सोबती म्हणून केव्हाच मान्यता दिली आहे. त्यामुळेच वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्याच्या विविध भागांतील शेतकरी अॅग्रोवनला शुभेच्छा देत होते.  सोशल मीडियावरदेखील अॅग्रोवनवर शुभेच्छांचा वर्षावर झाला. "शेतीच्या विस्तार कार्याचे खरेखुरे काम करणाऱ्या अॅग्रोवनच्या रोजच्या आगमनाकडे आमचे रोज सकाळी लक्ष लागून असते, शेतीमधील आमच्या सुखदुःखाला अॅग्रोवनमधून कायम स्थान मिळते, अॅग्रोवनने देशव्यापी स्वरूप घ्यावे, अशा विविधांगी शुभेच्छा अॅग्रोवनला मिळत होत्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com