agriculture news in Marathi, agrowon, 14 crores of rupees worth of green gram | Agrowon

हरभऱ्याचे १४ कोटी रुपयांचे चुकारे अडकले
टीम अॅग्रोवन
सोमवार, 7 मे 2018

परभणी : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १ हजार ९९८ शेतकऱ्यांचा ३१ हजार ४७१ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. परंतु साठविण्यासाठी गोदाम नसल्यामुळे हजारो क्विंटल हरभरा केंद्रांवर पडून आहे. काही केंद्रांवरील हरभरा वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्यात आला आहे. परंतु शेतकऱ्यांना अद्याप चुकारे मिळालेले नाहीत. या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे १३ कोटी ८४ लाख ७२ हजार ४०० रुपये एवढ्या रकमचे चुकारे अडकलेलेच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

परभणी : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १ हजार ९९८ शेतकऱ्यांचा ३१ हजार ४७१ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. परंतु साठविण्यासाठी गोदाम नसल्यामुळे हजारो क्विंटल हरभरा केंद्रांवर पडून आहे. काही केंद्रांवरील हरभरा वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्यात आला आहे. परंतु शेतकऱ्यांना अद्याप चुकारे मिळालेले नाहीत. या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे १३ कोटी ८४ लाख ७२ हजार ४०० रुपये एवढ्या रकमचे चुकारे अडकलेलेच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

दरम्यान, नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांत शनिवार (ता. ५)पर्यंत २२ हजार ५०७ शेतकऱ्यांची २ लाख ५५ हजार ९२४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील २३ केंद्रांवर तूर आणि हरभरा खरेदी सुरू आहे. परंतु वखार महामंडळाकडे खरेदी केलेला शेतमाल साठविण्यासाठी गोदामे नाहीत. भाडेतत्त्वावर घेण्यात आलेली गोदामेदेखील कमी पडत आहेत. त्यामुळे हरभरा आणि तूर खरेदी केंद्रांवरच पडून आहे.

शनिवार (ता. ५)पर्यंत नांदेड जिल्ह्यात १,४५२ शेतकऱ्यांचा २३ हजार ३७४ .५० क्विंटल, परभणी जिल्ह्यांत ३९३ शेतकऱ्यांचा ५,९९१ क्विंटल, हिंगोली जिल्ह्यात १५३ शेतकऱ्यांचा २,१०६ क्विंटल असा तीन जिल्ह्यांत एकूण १,९९८ शेतकऱ्यांचा ३१ हजार ४७१ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.

नांदेड जिल्ह्यातील अनेक केंद्रावर हरभरा पडून आहे. परभणी, हिंगोली जिल्ह्यातील काही केंद्रांवरील हरभरा वखार महामंडळाच्या गोदामात जमा करण्यात आला आहे. परंतु अद्याप शेतकऱ्यांना चुकारे मिळालेले नाहीत. तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे १३ कोटी ७४ लाख ७२ हजार ४०० रुपयांचे चुकारे थकले आहेत. या तीन जिल्ह्यांत एकूण १३ हजार २५५ शेतकऱ्यांनी हरभऱ्यासाठी नोंदणी केली आहे. चाळण्या आणि वजनकाट्याची संख्या कमी असल्यामुळे तूर खरेदी संथगतीने सुरू आहे.

अडीच लाख क्विंटल तूर खरेदी
शनिवार (ता. ५) पर्यंत या तीन जिल्ह्यांत २२ हजार ५०७ शेतकऱ्यांची २ लाख ५५ हजार ९२४ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. तूर खरेदीसाठी १५ मे पर्यंतची मुदत आहे. अद्याप तीन तीन जिल्ह्यांत मिळून एकूण ४० हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी शिल्लक आहे. 

इतर अॅग्रो विशेष
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...
दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...
शेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...
कसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष? अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...