agriculture news in Marathi, agrowon, 14 new varieties will be available to farmers in the state | Agrowon

राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार १४ नवे वाण
टीम अॅग्रोवन
रविवार, 27 मे 2018

दापोली, जि. रत्नागिरी  : राज्याचे कृषी; तसेच फलोत्पादन वाढविण्यासाठी विविध पिकांच्या नवीन वाण संशोधनावर अॅग्रेस्कोमध्ये दिवसभर चर्चा झाली. अॅग्रेस्कोमध्ये या वाणांना मान्यता मिळाल्याने पपई, केळी, चिंचेसह १४ नवे वाण शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग खुला झाला.   

दापोली, जि. रत्नागिरी  : राज्याचे कृषी; तसेच फलोत्पादन वाढविण्यासाठी विविध पिकांच्या नवीन वाण संशोधनावर अॅग्रेस्कोमध्ये दिवसभर चर्चा झाली. अॅग्रेस्कोमध्ये या वाणांना मान्यता मिळाल्याने पपई, केळी, चिंचेसह १४ नवे वाण शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग खुला झाला.   

राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विविध पिकांची उत्पादकता वाढविणाऱ्या शिफारशी व नवीन वाणांची उपलब्धता विद्यापीठांकडून केली जावी, असा मुद्दा कृषी विभागाकडून मांडला गेला. या मुद्दावर शास्त्रज्ञांच्या विविध गटांमध्ये चर्चा झाली. अॅग्रेस्कोत मंजूर केल्या जाणाऱ्या शिफारशींचे अंतिम उद्दिष्ट उत्पन्नवाढ असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले. 

दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठात सुरू असलेल्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत शास्त्रज्ञांचे नियोजनबद्ध गट करून तपशीलवार चर्चा करण्यात आली. या गटांचे नेतृत्व कोकण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी केले. 

कृषी परिषदेचे संचालक रवींद्र जगताप, संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, राहुरी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख व डॉ. किरण कोकाटे, एनआरसीजीचे संचालक डॉ. एस. डी. सावंत, परभणी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी देखील शास्त्रज्ञ गटाचे नेतृत्व केले. या गटांनी विविध वाण, शिफारशींचा आढावा घेतला. या शिफारशींचे रात्री उशिरापर्यंत संपादन करून अंतिम मान्यतेसाठी अॅग्रेस्कोसमोर ठेवल्या होत्या. 

यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना फुले प्राईड हे नवे वाण मिळू शकेल. स्कॅव्हेन्डिश गटातील निवड पद्धतीने फुले प्राईड तयार करण्यात आली असून त्यासाठी गेली पाच वर्षे संशोधन सुरू होते. हेक्टरी ९७ टन उत्पादन आणि गराचे ५७ टक्के प्रमाण असलेली फुले प्राईड बुटकी, लवकर काढणीस येणारी, वादळ वाऱ्यात खोड न मोडणारी आणि विशेष म्हणजे सिगाटोकाला सहनशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आंबा पिकाच्या फळधारणा, उत्पादन वाढविण्यासाठी तसेच साक्याचे प्रमाण कमी करण्यासाठी एलसिस्टिन १० टक्के आणि फॉलिक अॅसीड ०.२० टक्के घटकाची फवारणी करण्याबाबत अभ्यासपूर्ण शिफारस करण्यात आली आहे. 

फुले जयश्री टोमॅटो, पीडीकेव्ही गोल्ड ग्लॅडिओस, कोकण कॅशिया तसेच कोकण संयुक्ता जायफळ या फळपिकांचे वाण मंजूर करण्यात आले. तसेच, धानाचा ट्रॉम्बे कर्जत कोलम व पीडीकेव्ही तिलक, पीडीकेव्ही यलो गोल्ड सोयाबीन, फुले विक्रांत हरभरा, व्हीएसआय १२१२१ ऊस, फुले चेतना कापूस, पीए ७४० देशी कापूस, परभणी शक्ती ज्वारी अशा वाणांना मंजुरी मिळाली आहे.

पपईचे फुले पपया वाण सर्व चाचण्यांत सरस
पपईचे फुले पपया हे नवे वाण सर्व चाचण्यांमधून सरस ठरलेले आहे. हे रिंग स्पॉट विषाणूजन्य रोगाला प्रतिकारक आहे. सरासरी १.३३ किलोग्रॅम वजनाच्या या पपईत ७८ टक्के गर आहे. याशिवाय शिवाई नावाचे चिंचेचे नवे वाणदेखील तयार करण्यात आलेले आहे. यात चिंचेची लांबी २०.४३ सेंटिमीटर असून, सरासरी वजन ३५.३३ ग्रॅम आणि फळाचे उत्पादन प्रतिझाड ८४३ किलो आहे. यात गर प्रतिकिलो ४७९ ग्रॅम मिळेल, असे शास्त्रज्ञांच्या वतीने सांगण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...