पंधरा दिवसांत १६ हजार क्‍विंटल हरभरा खरेदीचे आव्हान

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अमरावती  ः तुरीसोबतच हरभरा खरेदीचादेखील जिल्ह्यात खेळखंडोबा सुरू असल्याचे चित्र आहे. हरभऱ्याची २९ मे पर्यंत खरेदी होणार असून, उरलेल्या १५ दिवसांत १६ हजार ५४४ शेतकऱ्यांच्या हरभरा खरेदीचे आव्हान प्रशासनासमोर आहे. 

केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीच्या धोरणानुसार जिल्ह्यात १५ ते २४ मार्च या कालावधीत हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर हरभरा खरेदीकरिता १२ केंद्रेही उघडण्यात आली. या केंद्रांंवर आतापर्यंत २३ हजार ७२५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्या माध्यमातून ७,१८१ शेतकऱ्यांची एक लाख १८ हजार ३०६ क्‍विंटल हरभऱ्याची खरेदी झाली. ही केंद्र आता २९ मे रोजी बंद होणार आहेत. त्यामुळे उरलेल्या १५ दिवसांत १६ हजारांवर शेतकऱ्यांचा शिल्लक हरभरा खरेदीचे दिव्य यंत्रणांना पार पाडावे लागणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com