सोलापूर जिल्हा बॅंकेच्या १८ शाखा बंद होणार
सुदर्शन सुतार
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या २५ शाखा गेल्या पाच वर्षांपासून तोट्यात आहेत. या शाखा बंद अथवा स्थलांतरित करण्याची सूचना नाबार्डच्या वतीने करण्यात आली आहे. पण त्यापैकी १८ शाखा दिवाळीनंतर तातडीने बंद करण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने घेतला आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या २५ शाखा गेल्या पाच वर्षांपासून तोट्यात आहेत. या शाखा बंद अथवा स्थलांतरित करण्याची सूचना नाबार्डच्या वतीने करण्यात आली आहे. पण त्यापैकी १८ शाखा दिवाळीनंतर तातडीने बंद करण्याचा निर्णय जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने घेतला आहे.

आर्थिकदृष्ट्या तोट्यात असलेल्या या २५ शाखांमुळे सुमारे ४० कोटींचा तोटा बॅंकेला झाला आहे. हा तोटा पाहून नाबार्डने या शाखा बंद करण्याचा अथवा त्या अन्य ठिकाणी स्थलांतरित कराव्यात, अशी सूचना केली आहे. त्यानुसार बॅंकेने संतनाथ साखर कारखाना शाखा, राळेरास व सिद्धापूर शाखा बंद केल्या आहेत. देगाव येथील शाखेचे स्थलांतर केले आहे.

जिल्हा परिषद शाखा, एम. जी. रोड शाखा व वडवळ शाखा नाबार्डच्या नियामानुसार तोट्यात दिसत असल्या तरीही या शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात ठेवी आहेत. या शाखांच्या माध्यमातून परिसरातील ग्राहकांना चांगल्या पद्धतीने सेवा दिली जात आहे. त्यामुळे या शाखा बंद करण्यात येणार नाहीत. पण उर्वरित १८ शाखा बंद करण्याचा निर्णय दिवाळीनंतर घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

या १८ शाखा बंद होणार
बीबी दारफळ, औराद, आहेरवाडी, चळे, एकशिव, चाकोरे, बोरगाव, पांगरी, गौडगाव, पाथरी, नारी, खामगाव, काटेगाव, सुभाषनगर, मालवंडी, म्हैसगाव, चुंगी, सलगर (अ) या १८ शाखा बंद करण्यात येणार आहेत. पण त्यासाठी आणखी दोन महिन्यांची मुदत आहे. या कालावधीत काही सुधारणा झाल्यास फेरविचार होऊ शकतो, पण बॅंकेचा आर्थिक तोटा वाढत चालल्यास दोन महिन्यांनंतर शाखा बंद करण्यात येणार आहेत.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांना...नगर  : राज्यात कर्जमाफी मिळणारे सर्वाधिक...
राज्य सरकारचे धोरण शेतकरी हिताचे ः जानकरउस्मानाबाद  : राज्य सरकारचे धोरण...
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा...नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत...
सणाच्या दिवशी शेतकऱ्यांचे ठेचा भाकर...बुलडाणा : एेन सण काळात स्वाभिमानी शेतकरी...
शेतीपूरक व्यवसायाच्या आराखड्याचे काम...पुणे : शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असली तरी,...
औरंगाबाद येथे कर्जमाफी प्रमाणपत्राचे... औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्हाधिकारी...
देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी ः... सातारा  : शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस...
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी... हिंगोली : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा...
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड ः... नांदेड : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
शासन शेतीमाल प्रक्रिया उद्योगांवर भर... जळगाव  ः शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी...
असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे...मुंबई : सरकारने कर्जमाफीसाठी ज्या अटी- शर्ती लागू...
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...