राज्यातील १८० कारखाने गाळप करण्याची शक्यता
मनोज कापडे
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

चांगला पाऊस आणि उसाची उपलब्धता बघता राज्यात अजून दहा कारखाने गाळपासाठी उतरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे साखर कारखाना उद्योगातील उलाढाल देखील वाढेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 

पुणे : राज्यात यंदा उसाची उपलब्धता वाढणार असल्यामुळे शासनाच्या आधीच्या अंदाजाप्रमाणे गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांच्या संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. गाळप परवाना ऑनलाइन मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या कारखान्यांची संख्या १७४ पर्यंत पोचली आहे. ही संख्या १८० कारखान्यांच्या आसपास राहू शकेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

मंत्री समितीसमोर मांडलेल्या पहिल्या अंदाजाप्रमाणे राज्यात यंदा १७० साखर कारखाने गाळपासाठी उतरतील असे सांगण्यात आले होते. तथापि, आता स्थिती झपाट्याने बदलत आहे. चांगला पाऊस आणि उसाची उपलब्धता बघता राज्यात अजून दहा कारखाने गाळपासाठी उतरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे साखर कारखाना उद्योगातील उलाढाल देखील वाढेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 

धुराडी पेटवण्याची तयारी केलेल्या कारखान्यांमध्ये आतापर्यंत ९१ सहकारी साखर कारखाने असून ८३ खासगी कारखाने आहेत. गाळपासाठी नव्याने अर्ज करीत असलेल्या साखर कारखान्यांच्या कागदपत्रांची छाननी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडून सुरू आहे. 

दुसऱ्या हप्त्याकडे लक्ष
ऊसदर नियंत्रण मंडळाची बैठक याच आठवड्यात राज्याचे मुख्य सचिव घेत आहेत. मंडळाकडून शेतकऱ्यांच्या उसाला दुसरा हप्ता किती जाहीर होतो याकडे साखर कारखाना उद्योगाचे लक्ष लागून आहे.

इतर अॅग्रो विशेष
खुल्या शेतीतील गुलाब लागवड तंत्रज्ञान गुलाबाच्या फुलांचा उपयोग...
ज्ञानाचा प्रकाशदिवाळी... प्रकाशाचा, उत्साहाचा सण! सारी दुखं...
साडेआठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ४...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...जळगाव ः जिभाऊ... बापू तुमले दिवाईन्या सुभेच्छा...
पोषक तत्त्वांनीयुक्त खजूर, अक्रोड, काजूपोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीने अक्रोड अाणि...
रब्बी हंगामासाठी कांदा जाती अन्‌...महाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या...
बाजरी चारा पीक लगवड तंत्रज्ञान बाजरी हे पीक पालेदार, रसाळ, गोड व मऊ असते....
जळगाव जिल्ह्यात दादर ज्वारी तरारली जळगाव  ः खानदेशात यंदा परतीच्या पावसामुळे...
कांद्यावर डिसेंबरपर्यंत 'स्टॉक लिमिट'नवी दिल्ली : नफेखोरपणा, साठेबाजी, वाढते दर आणि...
सांगली जिल्ह्यात भाजपच्या वारुला ब्रेकसांगली ः लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत...
कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची...मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या...
वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म...भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी...
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...