agriculture news in Marathi, agrowon, 2147 crore turnover in Latur's market commity | Agrowon

लातूरच्या अडत बाजारात २१४७ कोटींची उलाढाल
हरी तुगावकर
रविवार, 27 मे 2018

लातूर : जिल्ह्यात सतत दोन वर्ष पडलेला पाऊस, शेतकऱ्यांनी घेतलेली मेहनत, निसर्गाने दिलेली साथ, यातून वाढलेल्या शेतीच्या उत्पादनामुळे लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात वर्षभरात वेगवेगळ्या शेतीमालाची ६३ लाख ३१ हजार क्विंटल आवक झाली आहे. या शेतमालाच्या विक्रीतून २१४७ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. दुष्काळी असलेल्या लातूरमध्ये गेल्या काही वर्षातील सर्वात मोठी उलाढाल आहे. मराठवाड्यात एवढी मोठी उलाढाल असणारी ही एकमेव आडत बाजारपेठ आहे. त्यात किमान हमीभाव या शेतमालाला मिळाला असता तर ही उलाढाल चार हजार कोटींच्या घरात गेली असती. 

लातूर : जिल्ह्यात सतत दोन वर्ष पडलेला पाऊस, शेतकऱ्यांनी घेतलेली मेहनत, निसर्गाने दिलेली साथ, यातून वाढलेल्या शेतीच्या उत्पादनामुळे लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात वर्षभरात वेगवेगळ्या शेतीमालाची ६३ लाख ३१ हजार क्विंटल आवक झाली आहे. या शेतमालाच्या विक्रीतून २१४७ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. दुष्काळी असलेल्या लातूरमध्ये गेल्या काही वर्षातील सर्वात मोठी उलाढाल आहे. मराठवाड्यात एवढी मोठी उलाढाल असणारी ही एकमेव आडत बाजारपेठ आहे. त्यात किमान हमीभाव या शेतमालाला मिळाला असता तर ही उलाढाल चार हजार कोटींच्या घरात गेली असती. 

मराठवाड्यातच नव्हे तर देशात लातूरचा आडत बाजार प्रसिद्ध आहे. लातूरच्या तुरीच्या भावाकडे तर देशातील इतर बाजारपेठांचे लक्ष असते. येथून देशभर तूर, सोयाबीन, हरभरा पाठवला जातो. सतत तीन वर्षाच्या दुष्काळानंतर गेली दोन वर्ष जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. खरीप व रब्बीच्या हंगामातील पिकांना पूरक असा पाऊस झाला आहे. त्याचा परिणाम शेतीतील पिकांचे उत्पादन वाढीस मदत झाली आहे. हे दीड ते दुपटीने हे उत्पादन वाढले आहे.

बाजारात समितीचे आर्थिक वर्ष मार्च २०१८ संपले. या वर्षात गुळ, गहू, भात, ज्वारी संकरीत, ज्वारी रब्बी, बाजरी, मका, हरभरा, तूर, मूग, उडीद, तीळ, करडी, मोहरी, एरंडी, सोयाबीन, धने, चिंच, अंबाडी, जवस, भूईमूग शेंगा, कारळ अशा २३ शेतमालाची ६३ लाख ३१ हजार ६१४ क्विंटल आवक राहिली आहे. याची उलाढाल २१४७ कोटी ८६ लाख ९८ हजार ५६१ रुपयांची राहिली आहे. यात सर्वाधिक सोयाबीनची ३९ लाख ३८ हजार ९७७ क्विंटल आवक होती. यातून ११६३ कोटी १२ लाख ६१ हजार ७६१ रुपयांचा व्यवहार राहिला. त्या पाठोपाठ हरभऱ्याची नऊ लाख ९० हजार ६१५ क्विंटल आवक होती. यातून ४८५ कोटी ८४ लाख ३३ हजार ८९० रुपयांची यात उलाढाल झाली.

त्यानंतर तुरीची आवक सहा लाख ७३ हजार ३३९ क्विंटलची होती. तर याची उलाढाल २७७ कोटी सहा लाख ४१ हजार ३८० रुपयांची राहिली आहे. या बाजारात सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त भाव मिळाला, पण हरभरा, तूर हमीभावापेक्षा एक हजार ते बाराशे रुपये कमी दराने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. या शेतमालाला किमान हमीभाव मिळाला असता तर ही उलाढाल चार हजार कोटीच्या घरात गेली असती.

प्रमुख शेतमालाच्या विक्रीतून झालेला व्यवहार पुढीलप्रमाणे आहे.
सोयाबीनच्या माध्यमातून      ११६३ कोटी १२ लाख ६१ हजार ७६१ रुपये
हरभऱ्याच्या माध्यमातून        ४८४ कोटी ८४ लाख ३३ हजार ८९० रुपये
तुरीच्या माध्यमातून             २७७ कोटी सहा लाख ४१ हजार ८६० रुपये
उडदाच्या माध्यमातून           ७६ कोटी ४० लाख ७० हजार ३२५ रुपये
मुगाच्या माध्यमातून            ५२ कोटी एक लाख ४१ हजार ३८० रुपये

 

लातूरच्या अडत बाजारावर शेतकऱ्यांचा विश्वास आहे. दररोज ५० हजार क्विंटल माल आला तरी त्याची खरेदी केली जाते. त्याचे तोलमाप करून रात्रीपर्यंत त्याचे पेमेंट केले जाते, हे या बाजारपेठेचे वैशिष्ट्य आहे. गेल्या चार पाच वर्षांतील सर्वांत मोठी आवक या वर्षी राहिली आहे. तूर, हरभऱ्याला हमीभाव मिळाला असता तर ही उलाढाल आणखी मोठी राहिली असती.
- ललितभाई शहा, सभापती, लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न
 बाजार समिती.

लातूर बाजार समितीच्या अडत बाजारात वर्षभरात आलेली शेतमालाची 
आवक, एकूण उलाढाल, प्रमुख शेतमालाची आवक पुढीलप्रमाणे आहे.

एकूण आवक ६३ लाख ३१ हजार क्विंटल
एकूण उलाढाल २१४७ कोटी ८६ लाख
सोयाबीनची आवक ३९ लाख ३८ हजार क्विंटल
तुरीची आवक ६ लाख ७३ हजार क्विंटल
हरभरा आवक ९ लाख ९० हजार क्विंटल

 

इतर अॅग्रो विशेष
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...