agriculture news in Marathi, agrowon, 23 thousand Gram panchayat have toilets | Agrowon

साडे सत्तावीस हजार ग्रामपंचायती हागणदारीमुक्त
सूर्यकांत नेटके
सोमवार, 9 एप्रिल 2018

नगर ः स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राज्यात आतापर्यंत सुमारे २७ हजार ६१६ ग्रामपंचायती आणि तेहतीस जिल्ह्यांमधील ३४४ तालुके हागणदारीमुक्त झाले आहेत. गडचिरोली जिल्हा वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये शौचालयांची शंभर टक्के कामे पूर्ण झाली असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचा अहवाल सांगतो आहे. 

सात वर्षांपूर्वी शौचालये बांधकाम व वापराबाबत झालेल्या सर्व्हेनुसार (बेसलाइन) हागणदारीमुक्तीची टक्केवारी जाहीर केली असल्याचे सांगण्यात येत आहे. नगर जिल्ह्यामधील सर्वच्या सर्व चौदा तालुके आणि १३११ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. 

नगर ः स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राज्यात आतापर्यंत सुमारे २७ हजार ६१६ ग्रामपंचायती आणि तेहतीस जिल्ह्यांमधील ३४४ तालुके हागणदारीमुक्त झाले आहेत. गडचिरोली जिल्हा वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये शौचालयांची शंभर टक्के कामे पूर्ण झाली असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचा अहवाल सांगतो आहे. 

सात वर्षांपूर्वी शौचालये बांधकाम व वापराबाबत झालेल्या सर्व्हेनुसार (बेसलाइन) हागणदारीमुक्तीची टक्केवारी जाहीर केली असल्याचे सांगण्यात येत आहे. नगर जिल्ह्यामधील सर्वच्या सर्व चौदा तालुके आणि १३११ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. 

सामान्य कुटुंबाने वैयक्तिक शौचालय बांधावे, यासाठी त्यांना बारा हजारांचे अनुदान दिले जात आहे. याबाबत प्रबोधन करण्यासाठी गावपातळीवर सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था, महिला बचत गटांची मदत घेतली जात आहे. पाणीयोजनांसह गावपातळीवर विविध योजनांसाठी शौचालयांची कामे बंधनकारक केली आहेत. त्यामुळेही या कामांची संख्या वाढत आहे. गेल्या दोन वर्षांपासून गावे हागणदारीमुक्त करण्यावर भर दिला असून, गाव हागणदारीमुक्त नसेल, तर सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्यात गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी ‘स्वच्छ भारत अभियान’ जोरात राबवले. आता राज्य हागणदारीमुक्त होण्यासाठी फक्त ५२ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त होणे शिल्लक आहे. 

बेसलाइनमध्ये नावे नसलेल्यांचे काय ?
केंद्र सरकारने सात वर्षांपूर्वी शौचालयाबाबत बेसलाइन सर्वेक्षण केले होते. त्यानुसार ज्यांच्याकडे शौचालये नाहीत अशा कुटुंबांची यादी तयार केली. त्यानुसारच बारा हजारांचे अनुदान शौचालय बांधणीसाठी दिले. त्या यादीनुसारच हागणदारीमुक्ती जाहीर केली. त्यामुळे ग्रामीण भागात अनेक कुटुंबांकडे शौचालये नसूनही शंभर टक्के हागणदारीमुक्ती जाहीर केली जात आहे. मात्र, ज्याची नावे बेसलाइन सर्व्हेत नाहीत आणि शौचालयेही नाहीत त्यांचे काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. एकट्या नगर जिल्ह्यामध्ये पंधरा ते वीस हजार कुटुंबांची नावे यादीत नाहीत आणि शौचालयेही नाहीत. अजूनही राज्यात शौचालये नसलेल्या कुटुंबांचा आकडा लाखाच्या वर आहे.

अशी आहे स्थिती 
    हागणदारीमुक्त जिल्हे ः ३३ 
    तालुके ः ३४४ 
    राज्यातील ग्रामपंचायती ः २७ हजार ६६८ 
    हागणदारीमुक्त ग्रामपंचायती ः २७ हजार ६१६ 
    एकूण कुटुंबे ः १ कोटी १० लाख ६८ हजार ४७० 
    शौचालये असलेली कुटुंबे ः १ कोटी १० लाख ६७ हजार ८७०

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
जळगावात डाळिंब प्रतिक्विंटल २००० ते...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
सोलापूर जिल्ह्यातील ‘दुष्काळ`...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून...
निवडणूक अायोगाच्या बोधचिन्हाची मानवी...बुलडाणा : येथील जिजामाता प्रेक्षागारात पाच हजार...
ऊसदर नियामक मंडळाची ‘आरएसएफ’प्रश्नी...पुणे : राज्यातील काही साखर कारखान्यांकडून महसुली...
राज्यात उन्हाचा चटका कायमपुणे   : कोरड्या व निरभ्र हवामानामुळे...
खानदेशात सूतगिरण्यांची वानवाजळगाव  ः खानदेशात कापूस हे प्रमुख पीक आहे....
दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्त कशाला...औरंगाबाद  ः मराठवाड्यातील ७६ पैकी ५६ तालुक्‍...
सिंचन परिषदेतील विचार मंथनाची दिशा...सोयगाव, जि. औरंगाबाद   : केवळ चर्चा, प्रबोधन...
स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा...फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे...