agriculture news in Marathi, agrowon, 25 species of birds extinction due to uncontrolled use of pesticides | Agrowon

कीडनाशकांच्या अनियंत्रित वापरामुळे पक्ष्यांच्या २५ प्रजाती नामशेष
सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

नागपूर  ः शेतीतील पिकांवर फवारण्यात येणाऱ्या रासायनिक कीडनाशकांचा अनियंत्रित वापर पक्ष्यांच्या जीवावर उठला आहे. यामुळे अलीकडच्या दशकात अंदाजे २५ पक्षी प्रजाती नामशेष झाल्या आहेत. हा आलेख वेगाने चढतो आहे. लुप्तप्राय होण्याच्या दिशेने सरकणाऱ्या पक्षी प्रजाती आता अतिशय धोकादायक श्रेणीत गेल्या आहेत. यामध्ये रेड बिल्ड कुरासो क्रॅक्‍स, गुलाबी कबूतर नेसोनस मायेरी, ब्लॅक फेस स्पूनबिल प्लॅटेलिया मायनर या प्रमुख पक्ष्यांचा समावेश आहे. 

नागपूर  ः शेतीतील पिकांवर फवारण्यात येणाऱ्या रासायनिक कीडनाशकांचा अनियंत्रित वापर पक्ष्यांच्या जीवावर उठला आहे. यामुळे अलीकडच्या दशकात अंदाजे २५ पक्षी प्रजाती नामशेष झाल्या आहेत. हा आलेख वेगाने चढतो आहे. लुप्तप्राय होण्याच्या दिशेने सरकणाऱ्या पक्षी प्रजाती आता अतिशय धोकादायक श्रेणीत गेल्या आहेत. यामध्ये रेड बिल्ड कुरासो क्रॅक्‍स, गुलाबी कबूतर नेसोनस मायेरी, ब्लॅक फेस स्पूनबिल प्लॅटेलिया मायनर या प्रमुख पक्ष्यांचा समावेश आहे. 

जगभरातील पक्ष्यांच्या आरोग्याचा अभ्यास करणाऱ्या बर्ड लाइफ इंटरनॅशनलच्या नवीन अहवालाने पक्षिप्रेमींसोबतच संशोधकांचीही झोप उडवून टाकली आहे. याला कारणही तसेच आहे. जगभरातील ११ हजार पक्षी प्रजातींपैकी ४० टक्के प्रजाती वेगाने नष्ट होत आहे.
आठ पक्षी प्रजातींपैकी एक जागतिक पातळीवर नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. ही आकडेवारी धोक्‍याची पातळी दर्शवणारी आहे. 

‘स्टेट्‌स ऑफ द वर्ल्डस बर्डस’ या अहवालात जगभरातील प्रसिद्ध पक्षी प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. यात बर्फाच्छादित घुबड बुबो स्कॅंडिकस, युरोपियन टर्टल डव्ह स्ट्रेप्टोपेलिया टर्टूर हे पक्षी जागतिक स्तरावर नष्ट झाल्याचे नमूद केले आहे. पृथ्वीच्या एकूण वातावरणाचा विचार करून जगभरातील पक्ष्यांच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यात आले. पक्षी प्रजातीच्या आरोग्यावरून पर्यावरणीय आरोग्याचा अंदाज येतो. शेतीचा विस्तार आणि त्या विस्ताराच्या तीव्रतेचा सुमारे ७० टक्के परिणाम जागतिक पातळीवर धोक्‍यात असलेल्या पक्ष्यांवर पडतो. 

इतर अॅग्रो विशेष
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...