agriculture news in Marathi, agrowon, 281 crore crop loan allocation in Amravati division | Agrowon

अमरावती विभागात २८१ कोटींचे पीककर्ज वाटप
टीम अॅग्रोवन
सोमवार, 7 मे 2018

अकोला  ः अागामी खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपाला शासनाच्या लेखी सुरवात झाली असून, अमरावती विभागात अातापर्यंत केवळ ३.२० टक्के वाटप झाले अाहे. विभागाला ८७७४ कोटीं रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट असून त्या तुलनेत पाचपैकी चार जिल्ह्यांत केवळ २८१ कोटी वाटप झाले. यात अकोला जिल्हा अाघाडीवर अाहे. विशेष म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांनी एकही रुपयांचे पीककर्ज अातापर्यंत वितरित केले नसल्याची माहिती शनिवारी (ता. ५) मुंबईत झालेल्या खरीप अाढावा बैठकीच्या निमित्ताने समोर अाली अाहे.    

अकोला  ः अागामी खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपाला शासनाच्या लेखी सुरवात झाली असून, अमरावती विभागात अातापर्यंत केवळ ३.२० टक्के वाटप झाले अाहे. विभागाला ८७७४ कोटीं रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट असून त्या तुलनेत पाचपैकी चार जिल्ह्यांत केवळ २८१ कोटी वाटप झाले. यात अकोला जिल्हा अाघाडीवर अाहे. विशेष म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांनी एकही रुपयांचे पीककर्ज अातापर्यंत वितरित केले नसल्याची माहिती शनिवारी (ता. ५) मुंबईत झालेल्या खरीप अाढावा बैठकीच्या निमित्ताने समोर अाली अाहे.    

खरीप २०१८-१९ या हंगामासाठी अमरावती विभागात ८७७४ कोटींचे पीककर्ज वाटपचे पाचही जिल्ह्यांना उद्दिष्ट दिले अाहे. हे पीककर्ज जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकांच्या माध्यमातून वाटप केले जाणार अाहे. पीककर्ज वाटपात अकोला जिल्ह्याने अाघाडी घेत १३७० कोटींच्या उद्दिष्टापैकी ९७ कोटी रुपये म्हणजेच ७.११ टक्के पीककर्ज वाटप केले. हे सर्व कर्ज अकोला जिल्हा बँकेने वितरित केले.

दुसऱ्या क्रमांकावर वाशीम जिल्हा अाहे. या जिल्ह्यात १४९४ कोटींचे पीककर्ज वाटप होणार असून, अातापर्यंत ७८ कोटी ५० लाखांचे वाटप जिल्हा बँकेने केले अाहे. एकूण कर्जाच्या तुलनेत ५.२५ टक्के वाटप झाले अाहे. यवतमाळ जिल्ह्यात २१२६ कोटी रुपये वाटपाचा लक्षांक जिल्ह्याने घेतला असताना अाजवर ७० कोटी म्हणजेच ३.३२ कोटी वाटप केले. अमरावतीत १९०६ कोटी वाटप करण्यात येणार असून, तेथे अातापर्यंत ३४ कोटी ३४ लाख वितरित झाले. बुलडाणा जिल्ह्यात अद्याप वाटपाची सुरवातच झालेली नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या खरीप अाढावा बैठकीच्या निमित्ताने देण्यात अाली अाहे.

बुलडाण्यात शून्य टक्के वाटप
बुलडाणा जिल्ह्यात १८७७ कोटी रुपये वाटपाचा लक्ष्यांक असताना अद्याप या जिल्ह्यात पीककर्ज वाटप सुरू झालेले नाही. बैठकीच्या अनुषंगाने सादर अहवालात या जिल्ह्यातील पीककर्ज वाटप शून्य दर्शविण्यात अाले अाहे. बुलडाणा जिल्हा बँकेला ५० कोटी अाणि राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकेला १८२७ कोटी वाटपाचे लक्ष्य अाहे. यापैकी एकाही बँकेने पीककर्ज वाटप सुरू केले नसल्याचे अहवालातून स्पष्ट होते.   

राष्ट्रीयीकृत बँकांचा मुहूर्तही नाही 
एप्रिलपासून पीककर्ज वाटपाची सुरवात झाली. अद्यापपर्यंत केवळ जिल्हा बँकांनी अमरावती विभागात पीककर्ज वाटपाला सुरवात केली. राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्ज वाटपाचा मुहूर्तही केला नसल्याचे अहवालातून दिसून येते. विभागातील पाचही जिल्ह्यांत या बँकांनी कर्जवाटप केलेले नाही.

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...