पुणे जिल्हा बॅंकेचा ३,८५८ कोटींचा पतआराखडा

पुणे जिल्हा बॅंक
पुणे जिल्हा बॅंक

पुणे  ः यंदा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने एकूण तीन हजार ८५८ कोटी ९३ लाख रुपयांचा पतआराखडा तयार केला आहे. यात शेतीसाठी २ हजार ७३४ कोटी ४४ लाख ४३ हजार रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४५९ कोटी रुपयांनी वाढ केली आहे. 

खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीककर्जासाठी लागणाऱ्या रकमेची कोणतीही अडचणी येणार नसल्याची माहिती जिल्हा बॅंकेच्या सूत्रांनी दिली. गेल्या वर्षी तीन हजार ४०९ कोटी रुपयांचा पतआराखडा मंजूर होता. त्याचे जिल्ह्यातील जवळपास २७५ शाखांमधून कर्ज वाटप केले होते. जिल्ह्यात बॅंकेचे खातेदार संख्या जवळपास दोन लाख ५६ हजार ६९० एवढी आहे. त्यापैकी जवळपास एक लाख ८९ हजार सभासद शेतकरी पीक कर्ज घेतात. 

यंदाही गेल्या वर्षीच्या तुलनेत पीक कर्जाच्या उद्दिष्टात वाढ केली आहे. शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर तीन लाखांच्या पुढे सहा टक्के व्याजदराने कर्ज दिले जाणार आहे. यंदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कर्ज वेळेत उपलब्ध व्हावे म्हणून यंदा १५ शाखा नव्याने सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळणार आहे. 

यंदा पीककर्जासाठी दोन हजार ४२६ कोटी ३२ लाख ५० हजार रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. शेतीपूरक उद्योगासाठी ३०८ कोटी ११ लाख ९२ हजार रुपये, तर बिगरशेती कर्जासाठी एक हजार १२४ कोटी ४८ लाख ५१ हजार रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. उद्दिष्ट ठेवलेल्या पीककर्जातून भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, सोयाबीन, सूर्यफूल कापूस, ऊस, हरभरा, फळबाग, भाजीपाला पिकांना पीककर्जाचा पुरवठा केला जाणार आहे. तर शेतीपूरक कर्जातून ठिबक सिंचन, उपसा पाइपालाइन, ट्रॅक्‍टर, ट्रेलर, जेसीबी, शेतीपूरक औजारे, शेळी, मेढीपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, संरक्षित शेती, बिगर शेतीमध्ये शैक्षणिक, गृहकर्ज, साखर कारखाने व औद्योगिक कर्ज दिले जाते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com