agriculture news in Marathi, agrowon, 500 crores program for Horticulture Mission | Agrowon

फलोत्पादन अभियानासाठी पाचशे कोटींचा कार्यक्रम
टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 एप्रिल 2018

औरंगाबाद  : चालू आर्थिक वर्षात राज्यातील फलोत्पादन अभियानासाठी सुमारे पाचशे कोटींच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. राज्याचे फलोत्पादन संचालक पी. एन. पोकळे यांनी खरीप पूर्वतयारीसंदर्भातील औरंगाबादेत शनिवारी (ता. ७) पार पडलेल्या आढावा बैठकीत या संदर्भातील तपशीलवार माहितीचे सादरीकरण केले.  

औरंगाबाद  : चालू आर्थिक वर्षात राज्यातील फलोत्पादन अभियानासाठी सुमारे पाचशे कोटींच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. राज्याचे फलोत्पादन संचालक पी. एन. पोकळे यांनी खरीप पूर्वतयारीसंदर्भातील औरंगाबादेत शनिवारी (ता. ७) पार पडलेल्या आढावा बैठकीत या संदर्भातील तपशीलवार माहितीचे सादरीकरण केले.  

यंदाच्या फलोत्पादन अभियानात कांदा चाळ, नियंत्रित शेती, सामूहिक शेततळे व अस्तरीकरण, कृषी प्रक्रिया, निर्यातदार शेतकरी, आदींविषयीच्या निधीचे नियोजन असणार आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत २६३ कोटी, आरकेव्हीवायमधून २०० कोटी व मार्चच्या शेवटच्या दिवशी मिळालेल्या ४५ कोटींच्या कार्यक्रमाचा या संपूर्ण नियोजनात समावेश असणार असल्याचे श्री. पोकळे यांनी स्पष्ट केले. 

या आढावा बैठकीत नवतंत्रज्ञानाच्या विस्तारासोबतच यंदा कपाशीवर मोठ्या प्रमाणात आलेल्या गुलाबी बोंड अळीच्या संकटावर विशेष चिंतन करण्यात आले. बैठकीला राज्याचे अप्पर कृषी सचिव विजयकुमार, कृषी आयुक्‍त सच्चिंद्रप्रतापसिंह, ‘पोकरा’चे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी, फलोत्पादन संचालक पी. एन. पोकळे, मृद व संधारण संचालक कैलास मोते आदींची विशेष उपस्थिती होती. या बैठकीत मराठवाडा व विदर्भातील पंधरा जिल्ह्यांतील अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, आत्माचे प्रकल्प संचालक, कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ आदींचा सहभाग होता. 

बैठकीत शेती क्षेत्रावर आलेली संकटे, त्या संकटाचा सामना करण्यासाठीची व्यवस्था, त्याचे फलित, येत्या खरीप हंगामात घ्यावयाची काळजी, याविषयी विविध जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांचे अनुभव व मते याविषयीची माहिती जाणून घेण्यात आली. राज्यातील कपाशीवर यंदा गुलाबी बोंड अळीचे आलेले संकट, त्यामागील कारणे याविषयी बैठकीत विशेष चिंतन झाले. 

नागपूरच्या कापूस संशोधन केंद्रासह वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे डॉ. पी. आर. झंवर यांनी गुलाबी बोंड अळीचे आक्रमण होण्याची कारणे, येणारा खरीप सुरक्षित व्हावा म्हणून त्यावरील उपाय याविषयी सविस्तर माहिती देणारे सादरीकरण केले. ‘वनामकृवि’कडून या बोंड अळीच्या संकटांचा सामना करण्यासाठी आंतरपीकपद्धतीवर भर देण्यासह रेफ्युजीचा वापर, सापळ्यांचा वापर वाढविणे व त्याविषयीचे निरीक्षण नोंदविणे आवश्‍यक असल्याची सूचना केली. इक्रिसॅटच्यावतीनेही सुरवातीला सादरीकरण केले. कृषी सचिवांनी व आयुक्‍तांनी प्रत्येक सादरीकरणादरम्यान अधिकाऱ्यांना प्रश्नोत्तरे करून भविष्यातील कृषी विभागाच्या वाटचालीविषयी सूचना केल्या. एक जबाबदार विभाग म्हणून कृषी विभागाचं नाव घेतलं जावं असं काम करण्याची अपेक्षा कृषी आयुक्‍तांनी व्यक्‍त केली. 

येत्या २२ एप्रिलला केंद्रीय कृषिमंत्री खरिपाच्या पूर्वतयारीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर पुन्हा २६ एप्रिललाही आढावा घेतला जाणार आहे. या आढाव्याच्या अनुषंगाने सादरीकरणातून आलेल्या संकटावर नेमके उपाय काय असतील, पीकपद्धतीत नेमका कोणता बदल अपेक्षित आहे, कोणत्या नवतंत्रज्ञानाची गरज आहे, त्याविषयी प्रत्येक जिल्हास्तरावर काय पावले उचलली गेली याविषयी सखोल माहिती संकलित करण्याच्या सूचना कृषी सचिव विजयकुमार यांनी केल्या. या प्रश्नोत्तरात परभणी, लातूर, नांदेड, जालना आदी ठिकाणचे अधीक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा, अकोला जिल्ह्यांतील उपविभागीय कृषी अधिकारी, नांदेडच्या कापूस संशोधन केंद्राचे तज्ज्ञ आदींनी सहभाग नोंदविला. संचालन उपविभागीय कृषी अधिकारी पी. आर. देशमुख यांनी केले.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...