agriculture news in Marathi, agrowon, 70% vacancies in agriculture department in Vidarbha | Agrowon

विदर्भात कृषी खात्यात ७० टक्‍के रिक्‍त पदे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 मे 2018

नागपूर (प्रतिनिधी) ः या वर्षीच्या बदल्यांसाठी समुपदेशनाचा पॅटर्न कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. विदर्भात सद्यःस्थितीत ७० टक्‍के पदे रिक्‍त असून, बदली प्रक्रियेत ही पदे भरण्यासाठी विदर्भाला झुकते माप देण्याची गरज वरिष्ठ अधिकारी स्तरावरून व्यक्‍त होत आहे. 

नागपूर (प्रतिनिधी) ः या वर्षीच्या बदल्यांसाठी समुपदेशनाचा पॅटर्न कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. विदर्भात सद्यःस्थितीत ७० टक्‍के पदे रिक्‍त असून, बदली प्रक्रियेत ही पदे भरण्यासाठी विदर्भाला झुकते माप देण्याची गरज वरिष्ठ अधिकारी स्तरावरून व्यक्‍त होत आहे. 

अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यात तालुका कृषी अधिकाऱ्यांची १६ पैकी १२ पदे रिक्‍त आहेत. कृषी विकास अधिकारी आणि त्यासोबतच गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्याचे पदही येथे रिक्‍त आहे. अमरावती जिल्ह्यात तालुका कृषी अधिकाऱ्याची १४ पैकी ११ पदे रिक्‍त आहेत. त्यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या महत्त्वाच्या पदाचादेखील समावेश आहे. धारणी आणि चिखलदरा हे आदिवासी बहुल आणि दुर्गम तालुके आहेत. या भागात कुपोषणाची समस्या आहे. या ठिकाणची तालुका कृषी अधिकारी पदे गेल्या अनेक वर्षांत भरली गेली नाही. 

अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा, बाळापूर येथील पदे रिक्‍त आहेत. कृषी विकास अधिकाऱ्यांची वाशीम, बुलडाणा, यवतमाळ येथील पदे रिक्‍त आहेत. अधीक्षक कृषी अधिकारी (सामान्य) यातील पाचपैकी ३ पदे रिक्‍त आहेत. त्यासोबतच अधीक्षक कृषी अधिकारी (विशेष घटक योजना) याची पाचपैकी तीन पदे रिक्‍त आहेत.

गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्याची पाचही जिल्ह्यांत पदे रिक्‍त असून, कृषी अधिकाऱ्याची २४३ पैकी १०९ पदे रिक्‍त असल्याचे सूत्रांनी सांगितले. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांची १३ पैकी पाच पदे रिक्‍त आहेत. तंत्र अधिकाऱ्यांची ३८ पैकी १७ पदे रिक्‍त आहेत. नागपूर विभागातदेखील एकूण मंजूर पदाच्या ५५ टक्‍के पदे रिक्‍त असल्याचे सूत्र सांगतात. 

मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यांत अनुशेष
विदर्भाच्या अनुशेषामागे या भागातील नेतृत्वाला संधी न मिळाल्याचे कारण पुढे केले जात होते. या वेळी मात्र मुख्यमंत्री, कृषिमंत्री, अर्थ, ऊर्जामंत्री अशी सारी महत्त्वाची पदे विदर्भाकडे असताना पदांचा अनुशेष दूर होऊ शकला नाही. त्यावरूनच या भागातील नेतृत्वच रिक्‍त पदांचा अनुशेष दूर करण्याबाबत उदासीन असल्याची चर्चा रंगली आहे. 

संवेदनशील यवतमाळातही रिक्त पदे
यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या, फवारणीदरम्यान विषबाधेमुळे शेतकरी मृत्यूचेे प्रकार घडले. त्यामुळे या भागातील रिक्‍त पदे भरण्याची गरज होती. परंतु या जिल्ह्यात १६ पैकी १२ तालुका कृषी अधिकाऱ्यांची पदे रिक्‍त आहेत. कृषी विकास अधिकारी, गुणवत्ता नियंत्रण अधिकारीसुद्धा या जिल्ह्यात नाही. 

राज्याच्या तुलनेत निश्‍चितच विदर्भात रिक्‍त पदे अधिक आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर येत्या बदल्याच्या प्रक्रियेत विदर्भातील रिक्‍त पदे भरण्याला प्राधान्य दिले जाणार आहे.
- पांडुरंग फुंडकर, कृषिमंत्री, महाराष्ट्र राज्य.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...