Agriculture news in Marathi, Agrowon | Agrowon

नाशिकला शुक्रवारपासून द्राक्ष-डाळिंब प्रदर्शन
टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

पुणे : द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना नवनवीन संशाेधन, तंत्रज्ञान एकाच ठिकाणी उपलब्ध हाेऊन, आपली शेती संपन्नतेकडे नेण्यासाठी, ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या वतीने नाशिक येथे १ ते ३ सप्टेंबरदरम्यान ‘द्राक्ष-डाळिंब प्रदर्शन २०१७’चे आयाेजन करण्यात आले आहे.

पुणे : द्राक्ष आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना नवनवीन संशाेधन, तंत्रज्ञान एकाच ठिकाणी उपलब्ध हाेऊन, आपली शेती संपन्नतेकडे नेण्यासाठी, ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या वतीने नाशिक येथे १ ते ३ सप्टेंबरदरम्यान ‘द्राक्ष-डाळिंब प्रदर्शन २०१७’चे आयाेजन करण्यात आले आहे.

कृषी, तंत्रज्ञान उद्याेजकांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून, प्रदर्शनात आपल्या दर्जेदर उत्पादनांसाठी हमखास आणि हक्काचा ग्राहक उपलब्ध हाेणार अाहे. शेतकरी आणि व्यावसायिकांच्या संपन्नतेच्या प्रवासाला बळ मिळणार आहे.
प्रदर्शनाच्या निमित्ताने उद्याेगांना राज्यातील द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत आपली उत्पादने व सेवा सादर करण्याची संधी मिळणार आहे. तर शेतकऱ्यांना आपली द्राक्ष, डाळिंब शेती संपन्नतेकडे नेण्याची संधी मिळणार आहे. तसेच द्राक्ष-डाळिंबाच्या लागवडीपासून ते काढणी, विपणन, निर्यात आणि प्रक्रियेवर विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. 

सर्वकाही येथे उपलब्ध
प्रदर्शनामध्ये द्राक्ष-डाळिंबसाठी लागणारी पायाभूत सामग्री, ऊतीसंवर्धन (टिश्‍यू कल्चर) राेपे, सूक्ष्म सिंचन, ट्रॅक्टर, यांत्रिकीकरणाची अवजारे, खते, किडनाशके, जैविक खते, मल्चिंग पेपर, वनस्पती वाढ नियंत्रके, मोबाईल टेक्नॉलॉजी आदी क्षेत्रांतील उद्याेग सहभागी हाेणार आहेत.

ठिकाण
नाशिक ः राम सीता लाॅन्स, आैरंगाबाद राेड, नांदुर नाका, नाशिक
वेळ ः सकाळी १० ते सायंकाळी ७

प्रदर्शनातील चर्चासत्रांविषयी माहिती

१ सप्टेंबर  
वेळ : दु. २ ते ४
विषय : दर्जेदार द्राक्ष शेतीसाठी फळ छाटणीनंतरचे नियोजन    
वक्ते : श्री. वासुदेव काठे, द्राक्ष तज्ज्ञ.

२ सप्टेंबर    
वेळ : १२ ते २    
विषय : रासायनिक अंशमुक्त द्राक्ष बागेचे व्यवस्थापन    
वक्ते : श्री. तुषार उगले, सहायक प्राध्यापक, के. के. वाघ महाविद्यालय.
वेळ : ३ ते ५  
विषय : डाळिंब शेतीतील समस्या व उपाय    
वक्ते : श्री. खंडू शेवाळे, प्रयोगशील शेतकरी.

३ सप्टेंबर
वेळ : १२ ते २    
विषय : दर्जेदार डाळिंब उत्पादन सुधारित तंत्र व तेलकट रोगाचे नियंत्रण    
वक्ते :  डॉ. विनय सुपे, असोसिएट डायरेक्टर आॅफ रिसर्च एनएआरपी, गणेशखिंड पुणे.

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत व्याज माफ;...बारामती, पुणे ः "छत्रपती शिवाजी महाराज...
अवजारांची गुणवत्ता हाच बनलाय ब्रॅंडगिरणारे (जि. नाशिक) गावातील पिंकी सुधाकर पवार...
‘तेर` करतेय पर्यावरण, शिक्षण अन्‌ सौर...पुणे येथील ‘तेर पॉलिसी सेंटर` या स्वयंसेवी...
'कृषी उद्योग'मधील वादग्रस्त सूर्यगण...पुणे : महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळातील...
‘फॉस्फोनिक ॲसिड’च्या आढळाने ‘सॅंपल फेल’...पुणे : डाळिंब पिकात केवळ सातच लेबल क्लेम...
बोंड अळी, धान नुकसानग्रस्तांना मदतीसाठी...पुणे : बाेंड अळीच्या प्रादुर्भावाने नुकसान...
बेदाण्याचे यंदा तीस टक्केच उत्पादनसांगली : राज्यात दरवर्षी सुमारे २ लाख टन...
हमीभावाच्या मुद्द्यावरून गैरसमज पसरवले...नवी दिल्ली : उत्पादन खर्चावर ५० टक्के हमीभाव...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक...पुणे : राज्यावर अवकाळीचे ढग असल्याने पावसाचे सावट...
आसामी रेडकाचा ‘क्लोन’ यशस्वीहिस्सार, हरियाणा : येथील केंद्रीय म्हैस संशोधन...
राज्यात १५ लाख टन साखर उत्पादन वाढलेकोल्हापूर : राज्यात सुरू हंगामात यंदा अंदाजपेक्षा...
प्लॅस्टिक, थर्माकोलच्या उत्पादनांवर बंदीमुंबई : राज्यात प्लॅस्टिक; तसेच थर्माकोलपासून...
जिवाशी खेळ थांबवाराज्यातील भेसळयुक्त दूधविक्रीचा प्रश्न चालू...
अवकाशाला गवसणी घालणारा शास्त्रज्ञस्टीफन हॉकिंग २००१च्या नवीन वर्षाच्या ...
कृषिपंपांच्या वीजबिलाबाबतचे 'महावितरण'...मुंबई : कृषिपंपांसाठी येणाऱ्या वीजबिलाने...
ढगाळ हवामानासह काही ठिकाणी पावसाची शक्‍...महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल तर अरबी...
भारतातील दहा कोटी जनता पितेय दूषित पाणीनवी दिल्ली : रंग, गंधहिन द्रव्य म्हणजेच पाणी...
ढगाळ हवामान, आजही पावसाची शक्यतापुणे : राज्यात सध्या सर्वदूर ढगाळ हवामानासह तुरळक...
पाडव्याच्या वायद्यात शेतमालाच्या भावाचा...लातूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने...
निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी अवघे...पुणे : सातत्याने होणारे हवामान बदल, वाढता कीड-...