agriculture news in Marathi, agrowon, 7.9 million tonnes of sugarcane crushing in Sangli district | Agrowon

सांगली जिल्ह्यात ७९ लाख टन उसाचे गाळप
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

सांगली : जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात ७९ लाख टन उसाचे गाळप करून ९६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. दहा साखर कारखान्यांनी गळीत हंगाम बंद केले असून पाच कारखान्यांचे गळीत हंगाम येत्या आठ दिवसात बंद होणार आहेत. मागील दहा वर्षांतील हे विक्रमी गाळप आहे. या वर्षी प्रथमच जिल्ह्यात एक कोटी क्विंटल साखर उत्पादन होण्याची शक्‍यता असल्याची माहिती साखर कारखान्याच्या सूत्रांनी दिली.

सांगली : जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात ७९ लाख टन उसाचे गाळप करून ९६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. दहा साखर कारखान्यांनी गळीत हंगाम बंद केले असून पाच कारखान्यांचे गळीत हंगाम येत्या आठ दिवसात बंद होणार आहेत. मागील दहा वर्षांतील हे विक्रमी गाळप आहे. या वर्षी प्रथमच जिल्ह्यात एक कोटी क्विंटल साखर उत्पादन होण्याची शक्‍यता असल्याची माहिती साखर कारखान्याच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात एकूण १८ साखर कारखाने असले तरी, यशवंत, डफळे आणि तासगाव या कारखान्यांचे गळीत हंगाम दोन वर्षांपासून बंदच आहेत. उर्वरित १५ साखर कारखान्यांनी नोव्हेंबर २०१७ च्या पहिल्या आठवड्यात गळीत हंगामाला सुरवात केली. चार महिने अखंडित गळीत हंगाम घेऊन ७९ लाख टन उसाचे गाळप केले आहे. या कारखान्यांनी आतापर्यंत ९६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. 

सध्या हुतात्मा (वाळवा), माणगंगा (आटपाडी), क्रांती (कुंडल, ता. पलूस), सोनहिरा (वांगी, ता. कडेगाव) आणि केन ॲग्रो (डोंगराई, ता. कडेगाव) या पाच कारखान्यांचे गळीत हंगाम आठवडाभर चालू राहणार आहेत. या कारखान्यांमध्ये जवळपास तीन ते चार लाख टन उसाचे गाळप होऊन पाच ते सहा लाख क्विंटल साखरेचे उत्पादन होणार आहे. म्हणजेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा एक कोटी क्विंटल साखरेचा आकडा पार होण्याची शक्‍यता आहे. 

या वर्षी दहा वर्षातील विक्रमी गाळप होणार असल्याचेही कारखानदारांचे मत आहे. राजारामबापू साखराळे युनिटने जिल्ह्यातील सर्वाधिक गाळप करुन जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सर्वात कमी गाळप माणगंगा साखर कारखान्याचे असून तेथे केवळ ८३ हजार २२४ टन उसाचे गाळप करुन ६९ हजार ९२५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

गाळप बंद झालेले कारखाने
वसंतदादा (सांगली), राजारामबापू पाटील (साखराळे, ता. वाळवा), विश्वास (चिखली, ता. शिराळा), महांकाली (कवठेमहांकाळ), राजारामबापू (वाटेगाव, ता. वाळवा), राजारामबापू (सर्वोदय युनिट, कारंदवाडी, ता. वाळवा), मोहनराव शिंदे (आरग, ता. मिरज), निनाईदेवी (दालमिया, कोकरूड, ता. शिराळा), उदगिरी शुगर अँड पॉवर (बामणी-पारे, ता. खानापूर), सदगुरू श्री श्री शुगर (राजेवाडी, ता. आटपाडी) या दहा साखर कारखान्यांचे गळीत हंगाम बंद झाले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
धनगर समाजाचा उद्या औरंगाबादमध्ये धडक...औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती)...
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव...मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,...
केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत...बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण...
ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’...सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची...
दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला...अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच...
ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोकोसातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने...
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे...कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या...
ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा...परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस...
सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने...