जळगावमधून परदेश अभ्यास दौऱ्यासाठी ९३ शेतकऱ्यांचे अर्ज
चंद्रकांत जाधव
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

जळगाव : राज्य शासनाच्या कृषी विभागार्फे राबविण्यात येत असलेल्या परदेश शेती अभ्यास दौऱ्यासाठी एकूण ९३ अर्ज प्राप्त झाले आहेत. छाननी अद्याप सुरू झालेली नाही. परंतु एवढ्या शेतकऱ्यांचा समावेश या अभ्यास दौऱ्यासाठी करून घेणे शक्‍य नाही. दौऱ्यासाठी शेतकऱ्यांच्या निवडीचा अंतिम निर्णय वरिष्ठ कार्यालयातर्फे घेतला जाईल, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली आहे.

जळगाव : राज्य शासनाच्या कृषी विभागार्फे राबविण्यात येत असलेल्या परदेश शेती अभ्यास दौऱ्यासाठी एकूण ९३ अर्ज प्राप्त झाले आहेत. छाननी अद्याप सुरू झालेली नाही. परंतु एवढ्या शेतकऱ्यांचा समावेश या अभ्यास दौऱ्यासाठी करून घेणे शक्‍य नाही. दौऱ्यासाठी शेतकऱ्यांच्या निवडीचा अंतिम निर्णय वरिष्ठ कार्यालयातर्फे घेतला जाईल, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली आहे.

कृषी विभागातर्फे शेती, जोडधंडे व शेती प्रक्रिया उद्योगांबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी, त्यांना मार्गदर्शन  मिळावे यासाठी कृषी आयुक्‍तालयाच्या सूचनेनुसार शेती परदेश अभ्यास दौरा आयोजित येणार आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते.

शेतकऱ्यांना इस्त्राईल, जर्मनी, नेदरलॅण्ड आणि ऑस्ट्रेलिया येथे दुग्ध, फळ, भाजीपाला शेती, प्रक्रिया उद्योग यासंबंधीची माहिती मिळावी यासाठी पाठविले जाणार आहे. दौरा कधी निघेल याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. तत्पूर्वी प्राप्त अर्जांची छाननी होईल. ही प्रक्रिया कृषी विभागामध्येच पार पाडली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

परदेश अभ्यास दौऱ्यात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना निम्मा खर्च करावा लागेल. इस्त्राईल दौऱ्यासाठी प्रतिव्यक्ती एक लाख दोन हजार ९९८ रुपये एकूण खर्च अपेक्षित आहे.

जर्मनी व नेदर्लंड दौऱ्यासाठी एक लाख २७ हजार ६१९ रुपये एकूण खर्च लागेल. तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी दोन लाख ४३ हजार १६७ रुपये खर्च अपेक्षित आहे. यातील निम्मा खर्च शेतकऱ्यांना करायचा आहे.

दौऱ्यासाठी 'फिल्डिंग'ची चर्चा
दौऱ्यात आपल्याला सहभागी करून घेतले जावे यासाठी अनेक शेतकरी राजकीय व्यक्तींचा आधार घेऊन फिल्डिंग लावत आहेत. परंतु निकषानुसार किमान २५ व कमाल ६० वर्षे वय असलेल्या पासपोर्टधारक शेतकऱ्यालाच दौऱ्यात सहभागाची संधी मिळेल. तसेच शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थेत कार्यरत व्यक्तीला दौऱ्यात सहभागी होता येणार नाही, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

इतर ताज्या घडामोडी
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...
परभणीत प्रतिक्विंटल टोमॅटो १२०० ते १८००...परभणी ः येथील कृषी उत्पन्न बाजार...
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
वाटाणा लागवड कधी करावी?वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगल्या...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारलेकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
जळगावात उडदाची आवक घटलीजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात...
नाशिकला टोमॅटोची आवक निम्म्याने घटलीनाशिक : नाशिक जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...
समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार...घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
तापमान पुन्हा वाढू लागलेपुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी...
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पाटण, जि. सातारा ः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात...
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...