agriculture news in Marathi, agrowon, About 60% posts of livestock development officers in Sangli district are vacant | Agrowon

सांगली जिल्ह्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची ६० टक्के पदे रिक्त
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

सांगली  ः जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडे जिल्ह्यात १०२ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्यातील ७६ दवाखाने श्रेणी-१ चे आहेत. मात्र पशुसंवर्धन विभागाला डॉक्‍टरांच्या (पशुधन विकास अधिकारी) रिक्त पदांचा प्रश्‍न गेली दहा-बारा वर्षे सतावत असून, पशुवैद्यकीय विभागातील डॉक्‍टरांची जवळपास ६० टक्के पदे रिक्त आहेत. पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कारभार पशुधन विकास अधिकाऱ्यांऐवजी पशुधन पर्यवेक्षकांच्या प्रभारी कार्यभारावर सुरू आहे. नवीन नियुक्तीत अवघे २ डॉक्‍टर पशुसंवर्धनला मिळाले आहेत.

सांगली  ः जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडे जिल्ह्यात १०२ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्यातील ७६ दवाखाने श्रेणी-१ चे आहेत. मात्र पशुसंवर्धन विभागाला डॉक्‍टरांच्या (पशुधन विकास अधिकारी) रिक्त पदांचा प्रश्‍न गेली दहा-बारा वर्षे सतावत असून, पशुवैद्यकीय विभागातील डॉक्‍टरांची जवळपास ६० टक्के पदे रिक्त आहेत. पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कारभार पशुधन विकास अधिकाऱ्यांऐवजी पशुधन पर्यवेक्षकांच्या प्रभारी कार्यभारावर सुरू आहे. नवीन नियुक्तीत अवघे २ डॉक्‍टर पशुसंवर्धनला मिळाले आहेत.

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामध्ये अनेक वर्षांपासून रिक्त पदे भरण्यासाठी कोणत्याही हालचाली शासनाने केलेल्या दिसत नाहीत. रिक्त पदे तातडीने भरावीत, यासाठी जिल्हा परिषदेने अनेक ठरावदेखील केले आहेत. मात्र, ते केवळ कागदावरच राहिले आहेत. सांगली जिल्हा परिषदेकडे २ आणि जिल्ह्यात स्टेट पशुसंवर्धनच्या दवाखान्यांकडे २ पशुधन विकास अधिकारी नियुक्त केले आहेत. नवीन नियुक्तीद्वारे जिल्हा परिषदेच्या कडेगाव, शासनाकडील दूधगाव पशुवैद्यकीय दवाखान्याकडे आणि तासगाव पशुचिकित्सालयाला नवीन डॉक्‍टरांनी नेमणूक झाली आहे. मात्र, या ठिकाणी डॉक्‍टर हजर झाले नाहीत. त्यामुळे प्रभारी डॉक्‍टर काम पाहात आहेत. मात्र, काही ठिकाणी पशुधन पर्यवेक्षकांमार्फत प्रभारी कामकाज सुरू असल्याने पशुपालकांना योग्य सेवा मिळत नसल्याचे चित्र आहे.

कडेगाव, शिराळा, कवठेमहांकाळ, जत तालुका रिक्त
जत तालुक्‍यात श्रेणी-१चे १५, श्रेणी-२चे ९ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. पशुधन विकास अधिकाऱ्यांची १५ पदे मंजूर आहेत़ पण केवळ ४ पदे कार्यरत होती. दोन दिवसांपूर्वी नवीन नियुक्तीतील डॉ. देशमुख उमदीला रुजू झाल्याने कार्यरत पदांची संख्या  ५ झाली असून, रिक्त पदे १० आहेत. कडेगाव, शिराळा, कवठेमहांकाळ, जत या तालुक्‍यांत पशुधन विकास अधिकाऱ्यांची रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर आहेत. 
पशुधन विकास अधिकाऱ्यांची तालुकानिहाय कार्यरत पदे (कंसात रिक्त पदे) : कडेगाव- ० (८), कवठेमहांकाळ- १ (५), जत- ५ (१०), शिराळा- ४ (११), मिरज- ७ (२), खानापूर- ४ (५), आटपाडी- ५ (२), तासगाव- ३ (१), पलूस- २ (२), वाळवा- ६ (३). जिल्हा परिषद मुख्यालयासाठी पशुधन विकास अधिकाऱ्यांचे एक पद मंजूर असून ते कार्यरत आहे.

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...