मानकांनुसार मराठवाड्यात दुधाची तूट

मानकांनुसार मराठवाड्यात दुधाची तूट
मानकांनुसार मराठवाड्यात दुधाची तूट

औरंगाबाद  : प्रतिदिन प्रतिमानसी दुधाची नेमकी गरज किती याची मानकं ठरलेली आहेत. त्यासाठी लोकसंख्या, दुभत्या जनावरांची संख्या व प्रत्यक्ष होणारे दूध उत्पादन याच्या आधाराची आकडेवारी पाहता मराठवाड्यात प्रतिमानसी प्रतिदिन ८५ मिली दुधाची तूट असल्याचे या विषयीच्या गोळाबेरजेचे आकडे सांगतात.

मराठवाड्याची लोकसंख्या १ कोटी ८७ लाख ३२ हजार आहे. लोकसंख्येच्या तुलनेत मराठवाड्यात दुभत्या जनावरांची संख्या २०१२ पशुगणनेनुसार ९ लाख ८७ हजार इतकी आहे. यामध्ये दुभत्या गायींसह म्हशीचा समावेश आहे. लोकसंख्येनुसार प्रतिमानसी प्रतिदिन ०.२५ लिटरप्रमाणे दुधाची आवश्‍यकता लक्षात घेता मराठवाड्यात ४६ लाख ८३ हजार लिटर दुधाची प्रतिदिन गरज आहे. प्रत्यक्षात दुभत्या जनावरांनुसार दुधाचे उप्त्पादन ३० लाख ९६ हजार लिटर आहे. शिवाय प्रतिमानसी प्रतिदिन दुधाची उपलब्धता सरासरी १६५ मिली आहे. त्यामुळे दुधाच्या गरजेसाठी निर्धारीत केलेल्या मानकानुसार मराठवाड्यात प्रतिमानसी प्रतिदिन सरासरी ८५ मिली दुधाची तूट जाणवत असल्याचे आकडे सांगतात. 

जिल्हानिहाय जाणवत असलेल्या या तुटीत परभणी जिल्ह्याची आघाडी आहे. परभणी जिल्ह्यात उपलब्ध होणाऱ्या दुधानुसार प्रतिदिन प्रतिमानसी १३५ मिली तूट जाणवते. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात ११९ मिली, हिंगोली जिल्ह्यात १११ मिली, औरंगाबाद जिल्ह्यात १०४ मिली, नांदेड जिल्ह्यात ९९ मिली, लातूर जिल्ह्यात ८६ मिली तर बीड जिल्ह्यात प्रतिदिन प्रतिमानसी २८ मिली दुधाची तूट जाणवत असल्याचे आकडे सांगतात. 

प्रतिदिन प्रतिमानसी उपलब्धतेनुसार औरंगाबाद जिल्ह्यात १४६ मिली, जालना जिल्ह्यात १३१ मिली, बीड २२२ मिली, लातूर १६४ मिली, उस्मानाबाद २९१ मिली, नांदेड १५१ मिली, परभणी ११५ मिली तर हिंगोली जिल्ह्यात प्रतिदिन प्रतिमानसी १३९ मिली दुधाची उपलब्धता होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आकडेवारी तूट सांगत असली तरी मानकानुसार प्रत्येक व्यक्‍ती निर्धारित दूध पितो का यावरही याचं गणित अवलंबून असल्याने आकडे व प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगवेगळी असल्याचा अनुभव येत असल्याचे जाणकार सांगतात. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com