agriculture news in Marathi, agrowon, action against against the broker Tribute to Dharma Patil says Vikhe Patil | Agrowon

दलालांविरुद्ध कारवाईच धर्मा पाटील यांना श्रद्धांजली ः विखे पाटील
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 मार्च 2018

मुंबई : धुळे जिल्ह्यातील ८४ वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचा मृत्यू आत्महत्या नसून, सरकारी दिरंगाईमुळे झालेली हत्या असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी (ता. ६) केली. धर्मा पाटील यांना खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल, तर तेथील भूसंपादनात दलाली करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही विखे पाटील यांनी केली.

मुंबई : धुळे जिल्ह्यातील ८४ वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांचा मृत्यू आत्महत्या नसून, सरकारी दिरंगाईमुळे झालेली हत्या असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी (ता. ६) केली. धर्मा पाटील यांना खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल, तर तेथील भूसंपादनात दलाली करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही विखे पाटील यांनी केली.

विखे पाटील यांनी नियम २९३ अंतर्गत विरोधी पक्षांच्या आठवडा प्रस्तावाच्या भाषणाच्या सुरवातीलाच धर्मा पाटील यांच्या आत्महत्येच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, की महाराष्ट्राच्या मंत्रालयाच्या इतिहासातील ही दुर्दैवी घटना असावी.

आत्महत्येच्या एक महिन्यापूर्वी धर्मा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. तत्पूर्वी त्यांनी महसूल मंत्री व धुळ्याच्या पालकमंत्र्यांनाही निवेदन दिले होते. परंतु, सरकारने वेळीच दखल न घेतल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.

धर्मा पाटील दोन वर्षांपासून जमिनीच्या फेरमूल्यांकनाच्या मागणीसाठी वणवण भटकत होते; पण ते जिवंत असेपर्यंत सरकारने त्यांना दाद दिली नाही. त्यांच्या मृत्युनंतर मात्र काही तासांतच सरकारने फेरमूल्यांकनाचा निर्णय घेतला. याचाच अर्थ या सरकारने जाणूनबुजून धर्मा पाटील यांना आत्महत्येस प्रवृत्त केले आणि त्यामुळे त्यांच्याविरुद्ध ३०२ चा गुन्हा का दाखल होऊ नये, असा प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.
 

इतर बातम्या
जळगावच्या पालकमंत्र्यांचा दौरा पुन्हा...जळगाव : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा...
खानदेशातील पाणीटंचाई गंभीरजळगाव : खानदेशात पाणीटंचाई दिवसेंदिवस बिकट होत...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
खानदेशात अनियमित वीजपुरवठाजळगाव : खानदेशात जलपातळी सातत्याने घटत आहे....
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
नाशिक येथे साकारणार 'देवराई' नाशिक : दुर्मीळ देशी प्रजातींच्या वृक्षांचे...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...