agriculture news in marathi, Agrowon, Adhar card issue for loan waiver for farmers | Agrowon

‘आधार’मधील चुकांचा कर्जमाफीसाठी अडथळा
शशिकांत जामगडे
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

श्रीरामपूर, जि. यवतमाळ :  कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरताना ‘थम्ब’ आधारशी जुळत नसल्यामुळे आपलं सरकार सेवा केंद्रातून अनेक शेतकऱ्यांना आल्या पावली परत जावे लागत आहे. आधारमधील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी त्यांची गर्दी आता आधार केंद्रावर उसळली असून, आधार अपडेट १५ सप्टेंबरपर्यंत न झाल्यास ३० टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची भीती वर्तविली जात आहे. त्यामुळे कर्जमाफीचा अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.

श्रीरामपूर, जि. यवतमाळ :  कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरताना ‘थम्ब’ आधारशी जुळत नसल्यामुळे आपलं सरकार सेवा केंद्रातून अनेक शेतकऱ्यांना आल्या पावली परत जावे लागत आहे. आधारमधील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी त्यांची गर्दी आता आधार केंद्रावर उसळली असून, आधार अपडेट १५ सप्टेंबरपर्यंत न झाल्यास ३० टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची भीती वर्तविली जात आहे. त्यामुळे कर्जमाफीचा अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरणे अनिवार्य केले. मात्र कर्जमाफीचा अर्ज भरताना अनेकांचे थम्ब मॅच होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले आधार अपडेट करण्याच्या सूचना सेवा केंद्रचालकांनी दिल्या आहेत.

आधारशिवाय शेतकऱ्यांना ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड यांच्या मदतीनेसुद्धा कर्जमाफी अर्ज भरता येऊ शकतो. परंतु योग्य त्या गतीने सर्व्हर चालत नसल्याने सेवा केंद्र चालविणाऱ्यांनी आधारची सक्ती केली असल्याची माहिती मिळाली आहे.

आधार काढताना अंगठ्याचे ठसे व डोळ्याच्या बुबुळाचे स्कॅनिंग व्यवस्थित झाले नसल्यामुळे असे होत असावे असा अंदाज आहे. आता आधारमधील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्यांना ३० ते ३५ किमी अंतरावरून पायपीट करत शहरात यावे लागत आहे.

पुसद येथे  वडगाव, ब्राह्मणगाव, कुंभारी, सेलू, मुंगशी, मांजरजवळा, मांडवा, बेलोरा, निंबी, पार्डी तसेच महागाव तालुक्‍यातील काळी इ. गावांचे शेतकरी आधार केंद्रांवर ताटकळत बसून होते. आतापर्यंत जवळपास ५००० शेतकऱ्यांनी आधार केंद्रांवर अपडेट करण्यासाठीची चौकशी केली असल्याची माहिती माउली सर्व्हिसेसचे संचालक निखिल गादेवार यांनी दिली.

आधारच्या एका केंद्रावरून केवळ ४० ते ५० जणांचेच आधार अपडेटला पाठविले जात आहेत. हजारो शेतकऱ्यांचे आधार कार्ड आठ दिवसांत अपडेट करणे व नवीन आधार काढणे, शक्‍य होईल का, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत लांबणीवर पडलेली...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
हिंगोली जिल्ह्यात ९४ हजार हेक्टरवर पेरणीहिंगोलीः जिल्ह्यात बुधवार (ता. २०) पर्यंत ९४ हजार...
नगर जिल्ह्यात चांगल्या पावसाची ४२...नगर ः नगर जिल्ह्यामधील बहुतांश भागात शनिवारी (ता...
खत व्यवस्थापनासाठी शासनाच्या विविध योजनापीक उत्पादनवाढीसाठी जमिनीची सुपीकता महत्त्वाची...
धुळे जिल्ह्यात डाळिंब पिकासाठी विमा...देऊर, जि. धुळे : हवामानवर आधारित फळपीक योजना २०१७...
राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या पीककर्जाबाबत...कोल्हापूर : संपन्न असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातही...
गूळ उद्योजकांना एकत्र करण्यासाठी शाहू...कोल्हापूर : राज्यातील गूळ उद्योजकांना एकत्र करून...
पीककर्ज : महसूल संघटनेचा ‘एसबीआय’ला...यवतमाळ : स्टेट बॅंक आँफ इंडियामधून महसूल कर्मचारी...
सर्वच शेतमाल नियंत्रणमुक्त करण्याची गरज...पुणे ः फळे भाजीपाला नियमनमुक्त केल्यामुळे शेतमाल...
स्वयंचलित हवामान केंद्राचे बोरी बुद्रुक...आळेफाटा, जि. पुणे : अॅग्रोवन स्मार्ट प्रकल्पात...
फडणवीस सरकार करणार ५० सामाजिक सेवा करारमुंबई : निवडणुकांना काही महिन्यांचा अवधी उरला...
शिक्षक, पदवीधरसाठी आज मतदानमुंबई : सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेची प्रतिष्ठा...
...तर विद्यार्थ्यांना निम्मे शुल्क...मुंबई : कृषीसह वैद्यकीय व इतर व्यावसायिक...
एकात्मिक खत व्यवस्थापनावर भरशेतकरी ः योगेश रामदास घुले गाव ः गिरणारे (ता. जि...
व्यंग्यचित्रकार लहू काळे यांची ‘इंडिया...पुणे : शेतकऱ्यांच्या जीवनावर सर्वाधिक...
युरोपीय महासंघाने तयार केला...युरोपीय महासंघाच्या संयुक्त संशोधन केंद्राच्या...
उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली...औरंगाबाद : मराठवाड्यातील बहुतांश भागात शनिवारी (...
शाश्वत विकासासाठी ग्राम सामाजिक...औरंगाबाद ः ग्रामीण भागात मूलभूत सोयी सुविधांच्या...
पीककर्जासाठी टाळाटाळ केल्यास कारवाई :...कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात पीककर्ज वाटपात...
`विश्वास`चे सात लाख टनांपेक्षा जास्त...शिराळा, जि. सांगली : विश्वास साखर कारखाना २०१८-...