agriculture news in Marathi, agrowon, After break the fast of Anna Hazare's villagers Excited | Agrowon

अण्णा हजारे यांचे उपोषण सुटल्यानंतर राळेगणसिद्धीत जल्लोष
टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 मार्च 2018

नगर  ः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली येथे आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण गुरुवारी (ता. २९) सातव्या दिवशी सुटल्याचे समजताच सात दिवसांपासून चिंतेत असलेल्या त्यांच्या राळेगणसिद्धी गावांतील गावकऱ्यांनी सायंकाळी जल्लोष केला. गुलाल उधळत साखर वाटून आनंद व्यक्त केला. 

नगर  ः ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्ली येथे आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण गुरुवारी (ता. २९) सातव्या दिवशी सुटल्याचे समजताच सात दिवसांपासून चिंतेत असलेल्या त्यांच्या राळेगणसिद्धी गावांतील गावकऱ्यांनी सायंकाळी जल्लोष केला. गुलाल उधळत साखर वाटून आनंद व्यक्त केला. 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या मालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट बाजारभाव मिळावा, वयोवृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन मिळावी व लोकपाल लोकायुक्तांची नेमणूक करावी, तसेच निवडणूक कायद्यात सुधारणा कराव्यात या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यांच्या अंदोलनाला पाठिंबा म्हणून राळेगणसिद्धी ग्रामस्थांसह पारनेर तालुक्‍यातील गावगावांतही आंदोलने केली जात होती. 

सात दिवस होऊनही उपोषण सुटत नसल्याने चिंता व्यक्त केली जात होती. त्यामुळे सरकारचा निषेध करत ग्रामस्थांनी आत्मदहनाची संपूर्ण तयारीदेखील केली होती. मात्र, गुरुवारी सकाळपासूनच उपोषण सुटण्याची शक्‍यता वाढली होती. त्यामुळे गावकऱ्यांचे लक्ष दिल्लीकडे लागले होते. दिवसभर महिलांसह मोठा जनसमुदाय यादवबाबा मंदिरासमोर बसून होता. 

उपोषण सुटल्याचे कळताच गुलाल उधळत, राष्ट्रीय गीतांच्या ठेक्‍यावर व वाद्यांच्या गजरात उपस्थितांनी आनंदोत्सव साजरा केला. महिलांनीही या आनंदात फुगडी खेळून, गाणे म्हणत उत्साहात भाग घेतला. 

या वेळी उपसरपंच लाभेश औटी, माजी सरपंच जयसिंग मापारी, नीलेश लंके, राहुल शिंदे, सबाजी गायकवाड, संजय वाघमारे, शंकर नगरे, संतोष खोडदे, रोहिदास पठारे, सुभाष पठारे, संजय पठाडे आदींसह मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. ‘‘अण्णांनी केलेल्या मागण्या सरकारने मान्य केल्या. मात्र, त्यासाठी सरकारने आमच्या दैवतास सात दिवस त्रास दिला. त्यामुळे मी या सरकारचा निषेध करतो. आम्हाला मागण्यापेक्षा अण्णांच्या जिवाची जास्त काळजी होती, असे राळेगणसिद्धीचे उपसरपंच लाभेश औटी यांनी  सांगितले. 
 

इतर ताज्या घडामोडी
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...
अकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला   ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...
अमरावती जिल्ह्यात रब्बीची २८ टक्के पेरणीअमरावती  ः खरीप हंगाम हातून गेला आहे. शेतकरी...
वन्यप्राणी संरक्षण कायदा रद्द करा ः...यवतमाळ  ः वन्यप्राण्यांचा जिव्हाळा...
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...