परदेशातून मागणी असताना भारतीय कापूस बाजारात मंदी का?

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : अमेरिकेच्या रुई बाजारात कापसाच्या दरात तेजी आहे. चीन, बांग्लादेश, पाकिस्तानमधून भारतीय कापसाची मागणी वाढत आहे, असे असताना भारतीय कापूस बाजारात मंदी का? असा सवाल शेतकरी प्रश्‍नांचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी केला आहे. 

जावंधिया म्हणाले, अमेरिकेच्या कापूस (रुई) बाजारात २०१७ साली १ किलो रुईचा दर १ डाॅलर ७० सेंटच्या आसपास होता. परंतु आपल्या देशातील कापूस बाजारात शेतकऱ्यांना मिळालेला कापसाचा भाव ५००० ते ५५०० प्रतिक्विंटल होता. आज अमेरिकेत रुईचा भाव १ डाॅलर ९५ सेंट प्रति पाऊंड आहे. म्हणजे रुई बाजारात तेजी आहे. तरी भारतात शेतकऱ्यांना मिळणारे कापसाचे भाव ४७०० ते ५५०० रुपये प्रतिक्विंटल आहे.

२०१७ मध्ये सरकीच्या भावात विक्रमी तेजी होती. सरकीचे भाव २५०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वाढले होते. खाद्य तेलाच्या भावात मंदी असूनही सरकीचे भाव तेजीत होते. सरकी ढेपीच्या भावातही तेजी असल्याने भाव २३०० रुपये प्रतिक्विंटल होते. देशातील रुई बाजारात प्रतिखंडी रुईचे भाव ३९०० ते ४००० रुपये हाेते. म्हणूनच कापसाचे भाव ५५०० च्या आसपास होते. आज रुईचे भाव ४००० ते ४२०० रुपये खंडी आहे. सरकीचा भाव १६०० ते १७०० रुपये क्विंटलचाच आहे. कारण सरकी ढेपीचा भाव १५०० ते १५५० रुपयांच्या अासपास आहे. 

एक क्विंटल कापसापासून ३४ किलो रुई आणि ६५ किलो सरकी मिळते. १ खंडी रुई म्हणजे १७० किलो रुईच्या दोन गाठी, म्हणजेच १० क्विंटल कापसापासून १ खंडी रुई (४००० रुपये) आणि ६.५ क्विंटल सरकी (१५०० च्या भावाने १००० रुपये) असे कापसाला एकूण ४८०० ते ५००० रुपये भाव बाजारात मिळत आहेत. कापसाच्या हमी भावापेक्षा (४३२० रुपये) जास्त असल्यामुळे कापूस आयातीकडे आपले लक्ष नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com