agriculture news in Marathi, agrowon, After hail in Latur Compensation to farmers in the month | Agrowon

लातूरमध्ये गारपिटीनंतर महिन्यातच शेतकऱ्यांना भरपाई
विकास गाढवे
मंगळवार, 27 मार्च 2018

लातूर : जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या गारपिटीत शेतकऱ्यांच्या पीक व फळाचे नुकसान झाले. गारपिटीनंतर जिल्हा प्रशासनाने वेगाने नुकसानीचे पंचनामे करून सरकारला अहवाल देऊन नुकसानभरपाईसाठी निधीची मागणी केली. प्रशासनाने मागणी केलेला सर्व निधी सरकारने मंजूर केला अन् गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना पंधरा दिवसांत भरपाईच्या रकमेचे वाटपही झाले. गारपिटीनंतर महिन्यातच भरपाईची रक्कम हाती आल्याने शेतकरी सुखावले असून, शेतकऱ्यांना पहिल्यांदाच सरकारच्या गतिमान प्रशासनाचा प्रत्यय आला आहे.

लातूर : जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या गारपिटीत शेतकऱ्यांच्या पीक व फळाचे नुकसान झाले. गारपिटीनंतर जिल्हा प्रशासनाने वेगाने नुकसानीचे पंचनामे करून सरकारला अहवाल देऊन नुकसानभरपाईसाठी निधीची मागणी केली. प्रशासनाने मागणी केलेला सर्व निधी सरकारने मंजूर केला अन् गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना पंधरा दिवसांत भरपाईच्या रकमेचे वाटपही झाले. गारपिटीनंतर महिन्यातच भरपाईची रक्कम हाती आल्याने शेतकरी सुखावले असून, शेतकऱ्यांना पहिल्यांदाच सरकारच्या गतिमान प्रशासनाचा प्रत्यय आला आहे.

जिल्ह्यातील दहापैकी सात तालुक्यांत ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान गारपीट झाली होती. यात खरिपातील काही पिकांसोबत रब्बी पिकांना फटका बसला होता. उसासह आंबा व अन्य फळ पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील ५१ हजार २७० शेतकऱ्यांच्या वीस हजार ५४४ हेक्टवरील पिके तसेच फळपिकांना बाधा पोहाेचली होती. गारपिटीनंतर सरकारने लागलीच नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देऊन दोन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीची भरपाई देण्याची तयारी दाखवली. त्यानुसार प्रशासनातील गाव पातळीवरील कर्मचाऱ्यांनी नुकसानीचे वेगाने पंचनामे करून अहवाल दिला होता.

जिल्हा पातळीवर अहवालाची माहिती एकत्र केल्यानंतर जिल्ह्यात १७ हजार १४६ हेक्टर जिरायत जमिनीवरील व दोन हजार ९७० हेक्टर बागायत जमिनीवरील पिकांचे तर ४२८ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाल्याचे पुढे आले.

सरकारने जिरायत जमिनीवरील पिकांसाठी सहा हजार आठशे रुपये प्रतिहेक्टर, बागायत जमिनीवरील पिकांसाठी १३ हजार पाचशे रुपये प्रतिहेक्टर तर फळपिकांसाठी अठरा हजार रुपये प्रतिहेक्टर भरपाई मंजूर केली होती. त्यानुसार जिरायती पिकांच्या भरपाईसाठी ११ कोटी ६५ लाख ९१ हजार २३६ रुपये, बागायती पिकांसाठी चार कोटी ९८ हजार ९१५ तर फळबागांच्या भरपाईसाठी ७७ लाख तीन हजार शंभर रुपये अशी एकूण १६ कोटी ४३ लाख ९३ हजार रुपये निधीची मागणी प्रशासनाने सरकारकडे केली. ही मागणी सरकारने केवळ पंधरा दिवसांत मंजूर करून प्रशासनाला १५ मार्च रोजी निधीही उपलब्ध करून दिला. त्यानंतर प्रशासनाने तातडीने हा निधी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केला व बॅंकांनीही त्याचे वाटप सुरू केले.  

गारपिटीनंतर आदेश येताच नुकसानीचे पंचनामे करून सरकारकडे भरपाईसाठी निधीची मागणी केली. पंधरा दिवसांतच निधी मंजूर होऊन उपलब्धही झाला. निधीचे तालुकानिहाय वाटप करून संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर भरपाईची रक्कम जमा केली. सद्यःस्थितीत भरपाईच्या बहुतांश रकमेचे वाटप शेतकऱ्यांना झाले आहे. यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली गाव पातळीपासून ते जिल्हा पातळीवरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून योगदान दिले. सरकारकडूनही तेवढ्याच तत्परतेने प्रतिसाद मिळाल्याने गारपिटीनंतर केवळ एक महिन्यात शेतकऱ्यांच्या हाती भरपाईची रक्कम देता आली.
- डॉ. अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी, लातूर.

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...