agriculture news in Marathi, agrowon, after work of 'Jalyukt' Marathwada remains thirsty | Agrowon

'जलयुक्त'ची १६ हजारांवर कामे होऊनही मराठवाडा तहानलेलाच
टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 एप्रिल 2018

मुंबई  : जलयुक्त शिवार योजनेमुळे ग्रामीण भागातील पाण्याची पातळी वाढल्याचा दावा सरकार करत असले तरी प्रत्यक्षात मराठवाडा अजूनही तहानलेलाच आहे. विभागातील औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांमध्ये सुमारे १६ हजार २६९ कामे होऊनसुद्धा १९० गावे व १३ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जालना व नांदेड या जिल्ह्यांमध्ये ७४ टँकर पाणीपुरवठा करत आहेत. 

मुंबई  : जलयुक्त शिवार योजनेमुळे ग्रामीण भागातील पाण्याची पातळी वाढल्याचा दावा सरकार करत असले तरी प्रत्यक्षात मराठवाडा अजूनही तहानलेलाच आहे. विभागातील औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांमध्ये सुमारे १६ हजार २६९ कामे होऊनसुद्धा १९० गावे व १३ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जालना व नांदेड या जिल्ह्यांमध्ये ७४ टँकर पाणीपुरवठा करत आहेत. 

औरंगाबादमध्ये २०१५-१६ मध्ये ८ हजार ८९८, २०१६-१७ मध्ये ५ हजार ८७७ तर २०१७-१८ मध्ये १ हजार ४९५ जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामे करण्यात आली आहेत. अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या तीन वर्षांत ९ हजार ९७७ कामे झाली असताना तेथे ५५ टँकर धावत आहेत. राज्यात जलयुक्तची १६ हजार ५१२ गावांमध्ये ४ लाख ४० हजार ६० कामे झाली असताना सुमारे ५०२ गावे आणि ९० वाड्या तहानल्या आहेत. सुमारे ५०८ टँकर तेथे फेऱ्या मारत आहेत.

जलसंधारण विभागाचा जलयुक्तच्या कामांमुळे पाण्याची पातळी उंचावेल, असा दावा फोल ठरला आहे. मागील वर्षी याच दिवशी २९० गावे व ६२० वाड्यांना ३१४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला होता. विशेष म्हणजे मराठवाड्याप्रमाणे अमरावती विभागाचीसुद्धा टँकरवरच भिस्त असल्यामुळे जलयुक्त शिवार अभियानावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. जलयुक्त शिवार अभियान राबवूनही शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हवालदिल असून पिण्याच्या पाण्याअभावी ग्रामीण जनता त्रस्त आहे. 

अमरावती, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे व मराठवाड्यातील मोठे, मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पाण्याचा साठा गेल्या वर्षीपेक्षा यंदा जादा आहे. तरीसुद्धा ग्रामीण भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असताना या धरणांमधील पाण्याला पिण्यासाठी प्राधान्य दिले जात नाही. इतर विभागांच्या तुलनेने मराठवाड्यामध्ये सर्वाधिक ३१६ टँकर सुरू आहेत. औरंगाबादमध्ये २३१ तर जालना ४४, परभणी ९, हिंगोली २ आणि नांदेडमध्ये ३० टँकर सुरू आहेत. बीड, उस्मानाबाद आणि लातूरकर यंदा सुःखी आहेत. या जिल्ह्यांमध्ये सध्या तरी टँकर सुरू नाहीत.

विदर्भातील अकोला, वाशीम, बुलडाणा व यवतमाळमध्ये १०२, उत्तर महाराष्ट्र ५९, तर कोकणामध्ये ३० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामधील १ गाव व १ वाडीला टँकरसेवा सुरू आहे. 
 

असे राबविले जलयुक्त अभियान  २०१५-१६   २०१६-१७ २०१७-१८ एकूण
निवडलेल्या गावांची संख्या ६२०२  ५२९० ५०२० १६५१२
एकूण कामे  २५४९९४ १७७०२१ ४४९३५ ४७६९५०
पूर्ण कामे      २५४२५९ १६३६४४   २२५५७  ४४०४६०
एकूण निधी (कोटी रुपये)  २००० २१७५  २५०  ४४२५
खर्च  १८५१  १४०२   ५१.२६   ३३०५

                         
                                                  
                                              
                                        
                                                           
 

 

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...