| Agrowon

एच. टी. बियाण्यांविरोधात कृषी विभागाचे व्यापक धोरण
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 एप्रिल 2018

नागपूर  : येत्या हंगामात एच. टी. बियाण्यांचा प्रसार होऊ नये, याकरिता कृषी विभागाकडून व्यापक अभियान हाती घेण्यात आले आहे. एच. टी. बियाणे असलेल्या ठिकाणची माहिती मिळताच थेट पोलिसांना घेऊन छापेमारी करण्यासोबतच भिंतीपत्रकाच्या माध्यमातून, असे अवैध व पर्यावरणविरोधी बियाणे न वापरण्यासंदर्भाने जागृतीही केली जात आहे. 

नागपूर  : येत्या हंगामात एच. टी. बियाण्यांचा प्रसार होऊ नये, याकरिता कृषी विभागाकडून व्यापक अभियान हाती घेण्यात आले आहे. एच. टी. बियाणे असलेल्या ठिकाणची माहिती मिळताच थेट पोलिसांना घेऊन छापेमारी करण्यासोबतच भिंतीपत्रकाच्या माध्यमातून, असे अवैध व पर्यावरणविरोधी बियाणे न वापरण्यासंदर्भाने जागृतीही केली जात आहे. 

गेल्यावर्षीच्या हंगामात यवतमाळसह राज्यात मोठ्या प्रमाणावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामागील कारणांचा वेध घेतेवेळी एच. टी. बियाण्यांची अवैधरीत्या मोठ्या क्षेत्रावर लागवड झाल्याची बाब समोर आली होती. आंध्र प्रदेश, तेलंगाणा तसेच गुजरात राज्यातून या बियाण्यांचा पुरवठा झाल्याचेही उघडकीस आले होते. या हंगामात एच. टी. बियाणे अवैधरीत्या शेतकऱ्यांपर्यंत पोचणार नाही, याकरिता कृषी विभाग सावध पावले उचलत आहे. भिंतीपत्रक, घडीपत्रिका अशा साहित्याच्या माध्यमातून गावोगावात जागृती अभियान राबविले जात आहे. कृषी विभागाच्या गावपातळीवरील कर्मचाऱ्यांची या कामी मदत घेतली जात आहे. 

छापेमारीचा प्रयत्न फसला
बिटी बियाण्यांचा साठा असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी छापेमारी करण्यावर कृषी विभागाच्या गुणनियंत्रण शाखेकडून भर दिला गेला आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्‍यातील एका गावात एच. टी. बियाणे असल्याचे समजल्यानंतर छापेमारी करण्यात आली. गुणनियंत्रण विभागाच्या दोन पथकाकडून पोलिसांच्या मदतीने ही छापेमारीक झाली. परंतु यात काहीच हाती लागले नसल्याची माहिती आहे. छापेमारीत काहीच हाती लागले नसले तरी गावातील नागरिकांची बैठक घेत त्यांचे एच. टी. बियाण्यांबाबत प्रबोधन करण्यात आले. 

अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांना फोन
अकोला जिल्ह्याच्या अकोट व बार्शीटाकळी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना फोनव्दारे एच. टी. बियाणे बुकींगबाबत विचारणा केली जात असल्याची  माहिती आहे. १९०० रुपयांत हे बिटी पाकीट असून हे खरेदी केल्यास त्यावर कीडरोग आणि तण येणार नाही, असा दावा संबंधीत व्यक्‍ती करीत असल्याचे सांगितले जाते. कृषी व्यवसायिकानेच याबाबत माहिती दिली. त्यानंतर कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागाकडून या प्रकारातील सत्यता पडताळण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...
गोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया   ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...
साताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...
नगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर  ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...
वाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम  ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...
खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा  : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...