मूलभूत अन् शाश्वतही
विजय सुकळकर
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

मूलभूत विज्ञानाच्या अभ्यास, संशोधनातून नवीन संकल्पना, मूलतत्त्वे, सिद्धांत निर्माण होतात. नवसंकल्पना, सिद्धांतच नसतील तर आधुनिक तंत्र-यंत्र विकसित होणारच नाहीत. 
 

तंत्रज्ञानाचे मूळ हे मूलभूत विज्ञानात असते. त्यामुळे कोणत्याही वैज्ञानिक मोहिमेपेक्षा मूलभूत विज्ञानावर जास्त खर्च झाला पाहिजे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी नुकतेच व्यक्त केले. सुमारे चार वर्षांपूर्वी भारतरत्न डॉ. सी. एन. आर. राव यांनीसुद्धा मूलभूत विज्ञानाचा (बेसिक सायन्स) अभ्यास न करता आधुनिक उपयोजित विज्ञानास (अप्लाईड सायन्स) महत्त्व देणाऱ्यांना खडे बोल सुनावले होते.

आज मातीत पाय रोवण्यापासून ते आकाशात झेप घेण्यापर्यंत विविध क्षेत्रांतील समस्यांना मूलभूत विज्ञानाकडे आपले होत असलेले दुर्लक्ष जबाबदार आहे. विद्यार्थी, संशोधन संस्था, संशोधक आणि शासन हे सर्व केवळ उपयोजित विज्ञानाला महत्त्व देत आहेत. त्यामुळेच देशातील ज्येष्ठ शास्त्रज्ञांना वारंवार मूलभूत विज्ञानाकडे लक्ष द्या, असे सांगावे लागत आहे.

मूलभूत विज्ञानाच्या अभ्यास, संशोधनातून नवीन संकल्पना, मूलतत्त्वे, सिद्धांत निर्माण होतात. नवसंकल्पना, सिद्धांतच नसतील तर आधुनिक तंत्र-यंत्र विकसित होणारच नाहीत. म्हणून तर मूलभूत विज्ञानास उपयोजित विज्ञानाचे पूर्वप्रवर्तक मानले जाते. अर्थात कोणत्याही विकसित आधुनिक तंत्रज्ञानाच्या, यंत्रनिर्मितीच्या अग्रगामी मूलभूत विज्ञान असते. मूलभूत विज्ञानाचे मूळ काम समस्यांवर उपाय शोधणे हे आहे. तर शोधलेल्या उपायाचे रूपांतर लोकोपयोगी करणे, हे काम उपयोजित विज्ञान करते.

तसे पाहिले तर मूलभूत विज्ञानाचे फायदे हे दीर्घकालीन अन् शाश्वत असतात. याउलट उपयोजित विज्ञानातून तत्काळ लाभ मिळत असल्यामुळे बहुतांश लोकांचा कल याकडेच वाढतो आहे. संगणकाचा उपयोग आज प्रत्येक क्षेत्रात आढळून येतो. एका शतकापूर्वी गणित आणि इलेक्ट्रॉनिक या क्षेत्रांत मूलभूत संशोधन झाले नसते, तर आज आपल्याला संगणक दिसले नसते, हेही खरे आहे. 

शेतीमध्येसुद्धा मूलभूत विज्ञानाकडे पाठ फिरविली गेल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. जमिनीची खालावत चाललेली सुपीकता, पिकांचे अयोग्य पोषण, पिकांवर होणारा रोग-किडींचा उद्रेक आणि त्यांचे हाताबाहेर होत चाललेले नियंत्रण, घटती उत्पादकता हे सर्व दुष्परिणाम मूलभूत विज्ञानाकडे दुर्लक्ष करून केवळ आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या मागे लागल्याचे आहेत.

पिकांची मूळसंस्था, जमिनीतील जैवविविधता व त्यांच्यापासून पिकाला उपलब्ध होणारी अन्नद्रव्ये, जमिनीतील ह्युमस, पिकांचे शरीरक्रियाशास्त्र, पीकवाढीसाठीची परिस्थितीकी यांचा अभ्यास हे मूलभूत विज्ञान आहे. शाश्वत शेतीच्या अनुषंगाने आज यावर कितपत संशोधन होते, हाच खरा संशोधनाचा विषय ठरेल.

आजच्या हवामान बदलाच्या काळात पिकांची उत्पादकता घटत चालली आहे. लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. अशा वेळी वाढत्या लोकसंख्येची भूक भागविण्यासाठी शेतीमध्ये मूलभूत आणि उपयोजित विज्ञान यांचा संगम घडवून आणावा लागेल. शेतात ठिबकचा वापर जरूर व्हायला हवा; परंतु त्याअगोदर माती, पाणी आणि त्यात घेतल्या जाणाऱ्या पिकांचा अभ्यास व्हायला हवा.

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे देण्याअगोदर जमीन,  वातावरण, पीकपद्धती यातील मूलभूत विज्ञानाची ओळखही करून द्यावी लागेल. रासायनिक खतांच्या वापराबरोबर जैविक-सेंद्रिय खतांद्वारे जमिनीचे उत्तम पोषण कसे होते, हेही शिकवावे लागेल. पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव झल्याबरोबर फवारणीसाठी पंप उचलणाऱ्या शेतकऱ्यांना मशागतीय, जैविक, यांत्रिक नियंत्रण पद्धतीद्वारे कमी खर्चात प्रभावी नियंत्रण होते, हेही सांगावे लागेल.

भौतिक, रसायन आणि जीवशास्त्र हे मूलभूत विज्ञानात मोडत असून, यांच्या सखोल अभ्यासाशिवाय शाश्वत विकास शक्य नाही. मूलभूत विज्ञानाच्या दुर्लक्षाचे भविष्यातील दुष्परिणाम समोर येण्याअगोदर संशोधन संस्थांनी याचे गांभीर्य लक्षात घ्यायला हवे. मूलभूत विज्ञानातील संशोधनासाठी निधीची कमतरता भासणार नाही, ही काळजी शासनाला घ्यावी लागेल.

इतर संपादकीय
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
मुहूर्तालाच खोडाकर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यासाठीचा...
आधुनिक बळी जागा झालायदीपावली हा सण भारत वर्षात वेगवेगळ्या रूपात साजरा...
कीटकनाशकांचा वापर हवा नियंत्रितचदोनवर्षांपूर्वी पंजाबमधील ‘तरनतारन’ जिल्ह्यामध्ये...
भुकेचे भय संपणार कधी?देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपण अन्नधान्यात...
सामूहिक प्रयत्न हीच संस्कृतीनक्षलप्रवण गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामस्थांनी...
व्यावसायिकांच्या मूलभूत स्वातंत्र्यावरच...वर्ष २०१० च्या शासनाच्या आदेशाविरुद्ध स्टे ऑर्डर...
जिरायती भागात यंदा चांगला मॉन्सूनयावर्षीच्या मॉन्सूनचे वैशिष्ट्य म्हणजे जिरायती...
गाभ्रीचा पाऊसयावर्षी पावसाबाबत आलेल्या हवामान विभागाच्या...
बिगर नोंदणीकृत उत्पादनांवर अन्यायआपल्या देशात कृषी निविष्ठा उत्पादन, साठवण व...
माझे गुरू : प्रा. रिचर्ड थॅलरवर्तनवादी वित्त विषयातील योगदानाबद्दल प्रा....
न्यायाच्या प्रतीक्षेत समन्यायी पाणीवाटपमागील एका दशकापासून अनिश्चित आणि असमान   ...
आता सत्याग्रह हाच पर्याय!महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांतील शेतकरी...
फिटो अंधाराचे जाळेऑक्टोबर हीटने राज्य पोळून निघत असताना शहरी आणि...
शेतीपूरक व्यवसायातून साधेल आर्थिक...सध्या महाराष्ट्रातील शेतकरी सर्व बाजूने संकटात...
वर्ल्ड फूड इंडिया ः प्रक्रिया...तंत्रज्ञान व विपणनाबाबत उद्योन्मुख मार्केट...
बफर स्टॉक विक्री ठरेल आगीत तेल‘बफर स्टॉक’मधील (राखीव साठा) सात लाख टन...
अन्नप्रक्रिया उद्योगासाठीचे वैश्‍विक...‘वर्ल्ड फूड इंडिया’ (डब्लूएफआय) या कार्यक्रमाचे...
एकत्र या, प्रगती साधाद्राक्षे, डाळिंब, संत्रा, आंबा, केळी बरोबर कांदा...