agriculture news in Marathi, agrowon, Agreement in Panjabrao Deshmukh agriculture University and Hungarian University | Agrowon

पंदेकृवि आणि हंगेरीच्या विद्यापीठामध्ये करार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 मार्च 2018

अकोला : हंगेरीतील युनिवर्सिटी ऑफ डेब्रीसीन या विद्यापीठासोबत डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणावर आधारित आदान प्रदान करार करण्यात आला. या कराराअंतर्गत भारतीय विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षणासोबतच व्यावसायिक संधी उपलब्ध होणार आहेत. या करारातील तरतुदीनुसार डॉ. पंदेकृवितील विद्यार्थ्यांना युनिवर्सिटी ऑफ डेब्रीसीन येथील प्रशिक्षण काळातील वास्तव्यादरम्यान शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. दोन्ही विद्यापीठांतर्फे अनेक शैक्षणिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. 

अकोला : हंगेरीतील युनिवर्सिटी ऑफ डेब्रीसीन या विद्यापीठासोबत डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणावर आधारित आदान प्रदान करार करण्यात आला. या कराराअंतर्गत भारतीय विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षणासोबतच व्यावसायिक संधी उपलब्ध होणार आहेत. या करारातील तरतुदीनुसार डॉ. पंदेकृवितील विद्यार्थ्यांना युनिवर्सिटी ऑफ डेब्रीसीन येथील प्रशिक्षण काळातील वास्तव्यादरम्यान शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. दोन्ही विद्यापीठांतर्फे अनेक शैक्षणिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. 

कुलगुरू कार्यालयातील सभागृहात झालेल्या या करारावर विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी तर युनिवर्सिटी ऑफ डेब्रीसीनच्या वतीने हंगेरी येथील कार्पोरेट कन्सल्टंट आशिष वेले यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे या भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार असून सेंद्रिय तथा एकात्मिक शेती पद्धतीतील नवनवीन प्रयोग व तंत्रज्ञान वैदर्भीय शेतीसाठी मोलाचे ठरेल असा विश्वास डॉ. भाले यांनी व्यक्त केला. 

या प्रसंगी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. व्ही. के. खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी. एम. मानकर, कुलसचिव डॉ. पी. आर. कडू, नियंत्रक विद्या पवार, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. बी. उंदीरवाडे, कुलगुरू कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. शशांक भराड व डॉ. के. जे. कुबडे,  कुलगुरूंचे तांत्रिक सचिव प्रा. एन. एस. गुप्ता, विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय करार समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल करुणाकर, सदस्य डॉ. मंगेश मोहरील, डॉ. उपेंद्र कुलकर्णी, डॉ. संदीप हाडोळे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांची उपस्थिती होती.

बदलत्या वातावरणाचा शेती क्षेत्रावर परिणाम होत असून आता पारंपरिक ऐवजी शास्त्रीय शेती काळाची गरज ठरत आहे. त्याअनुषंगाने कालसुसंगत कृषी शिक्षण शेती व्यवसायाला उभारी देण्यात खऱ्या अर्थाने सहायक ठरणार आहे. ही बाब लक्षात घेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कुलगुरू डॉ. भाले यांच्या मार्गदर्शनात कृषी पदविकेपासून तर पदव्युत्तर कृषी शिक्षणात प्रत्याक्षिताधारित शिक्षणावर अधिक भर दिला आहे. 

आंतरराष्ट्रीय धोरणानुसार विविध देशांतील विद्यार्थी या विद्यापीठात आपला अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे, तर या विद्यापीठाचे विद्यार्थीसुद्धा कोरोनेल विद्यापीठ अमेरिका, टेक्सास टेक विद्यापीठ अमेरिका, युनिव्हर्सिटी ऑफ बॉयोलॉजीकल सायन्स, उझ्बेकिस्तान सारख्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठात देशाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...
सभा मोदींची; प्रशासनाने घेतली...नाशिक : लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल...
नगर : पशुधन वाचविण्यासाठी इतर...नगर : जिल्ह्यात २८ लाख लहान-मोठे जनावरे आहेत....
सौर कृषिपंप योजना खोळंबलीजळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मराठवाड्यात पाणीपुरवठ्यासाठी २३५९ टँकरऔरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे होणारी...
नत्र ऱ्हास रोखण्यासोबत वाढवता येईल...शेतकरी आपल्या मक्याच्या उत्पादनांचा अंदाज...
खानदेशात पाणंद रस्त्यांची कामे ठप्पजळगाव : खानदेशात जानेवारीत मंजुरी मिळालेल्या,...
म्हैसाळची विस्तारित योजना पूर्ण करणार...जत, जि. सांगली : ‘‘जत तालुक्याच्या पूर्व भागाला...
पुणे विभागात रब्बी कांद्याचे ३६ लाख टन...पुणे   ः रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी...
गारपीट, वादळी पावसाने पुणे जिल्ह्याला...पुणे  : जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या...
जळगावात आले प्रतिक्विंटल २००० ते ६५००...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
अवकाळी पावसाने वऱ्हाडात दाणादाणअकोला   ः वऱ्हाडातील अनेक भागात...
नगर जिल्ह्यातील १२८ गावांत दूषित पाणीनगर  : ‘सर्वांना शुद्ध पाणी’ यासाठी सरकार...
आमच्या काळात एकही घोटाळा नाही :...सोलापूर : काँग्रेस आघाडी देशाला मजबूत करू...
सातारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सातारा : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ...
बहुपयोगी नत्रयुक्त खत `कॅल्शिअम...सावकाश उपलब्ध होण्याच्या क्षमतेमुळे कॅल्शियम...
जल, मृद्‌संधारणासाठी पूर्वमशागत...जमिनीमध्ये चांगले पीक उत्पादन येण्याकरिता भौतिक,...
कृषी सल्ला : भुईमूग, आंबा पीक भुईमूग शेंगा अवस्था भुईमूग पीक आऱ्या...