agriculture news in marathi, agrowon agri exhibition ends, nagar,maharashtra | Agrowon

‘अॅग्रोवन कृषी प्रदर्शना’चा नगर येथे उत्साहात समारोप
टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018
‘सकाळ-अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी मी बीड जिल्ह्यातून आलो. येथे मला चांगली आणि शेतीसाठी फायदेशीर असणारी माहिती मिळाली. चांगली आणि किफायतशीर शेती करायची असेल, तर तंत्रज्ञान जाणून घेतले पाहिजे. प्रदर्शनातून बऱ्याच बाबी समजल्या.
- भगवानराव कुलथे, शेतकरी, पाडळी, ता. शिरुर कासार, जि. बीड
नगर ः येथील सावेडीतील जागिंग पार्क मैदानावर सुरु असलेल्या ‘सकाळ-अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनाचा रविवारी (ता. २५) उत्साहात समारोप झाला. या कृषी प्रदर्शनात नगर शहर, जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवत नवीन तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. 
 
नगर येथे आयोजित सकाळ-अॅग्रोवन कृषी प्रदर्शनाचे चितळे जिनस एबीएस (इंडिया) सहप्रायोजक होते. या तीनदिवसीय प्रदर्शनात विविध ५० स्टॉल्स होते. 
ट्रॅक्‍टर्स, हार्वेस्टिंग यंत्रे, विविध अवजारे, कापणी यंत्रे, जैविक कीडनाशके, विद्राव्य खते, ग्रीन हाउस टेक्‍नॉलॉजी, पॉलिहाउस, ठिबक तुषार संच, कृषी साहित्य प्रकाशन, रोपवाटिका, प्रक्रिया उद्योग, खते, अत्याधुनिक कडबाकुट्टी आदी स्टॉलचा यात समावेश होता.
 
चितळे दूधतर्फे मुक्‍त संचार गोठा व मुरघास निर्मिती, दुधाळ जनावराच्या प्रजाती, सेंद्रिय शेतीची गरज, मार्केटिंग व ब्रॅंडिंग व्यवस्थापन आदी महत्त्वपूर्ण विषयावर शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.
 
शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, डाळिंब निर्यात, किफायतशीर ऊस उत्पादन या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रदर्शनाला नगर, औरंगाबाद, बीड, सोलापूर, उस्मानाबाद भागांतील शेतकऱ्यांनी भेटी दिल्या. रविवारी प्रदर्शनाचा समारोप झाला. 

इतर ताज्या घडामोडी
सांगलीतील ९० टक्के द्राक्ष हंगाम उरकलासांगली : जिल्ह्यातील यंदाचा द्राक्ष हंगाम ९०...
फरारी द्राक्ष व्यापाऱ्यास शेतकऱ्यांनी...नाशिक  ः चालू वर्षाच्या हंगामात जिल्ह्यातील...
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील प्रचार...औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील...
सध्याचे सरकार म्हणजे लबाडाचे आवतन : पवारनगर : सध्याचे केंद्र सरकार म्हणजे लबाडाचे आवतन...
सिंचनाच्या पाण्याचे मोजमाप करण्याच्या...शेतीमध्ये पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून,...
परभणीत वांगी प्रतिक्विंटल १००० ते २५००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
मतदान केंद्रावरील रांगेपेक्षा...सोलापूर  : सोलापूर लोकसभा मतदारसंघात सर्वत्र...
अवकाळीचा सोलापूर जिल्ह्याला मोठा फटकासोलापूर : जिल्ह्याला गेल्या चार महिन्यांत अधून-...
मंठा तालुक्यात वादळी वाऱ्याने नुकसानमंठा, जि. जालना  : तालुक्यात मंगळवारी ( ता....
पुणे विभागातील दोन लाख हेक्टरवरील ऊस...पुणे  ः गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पुणे...
मराठवाड्यातील मतदान टक्केवारीत किंचित घटबीड, परभणी : मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद,...
सातारा जिल्‍ह्यातील ऊस उत्पादकांना...सातारा  ः जिल्ह्यातील सह्याद्री कारखान्याचा...
म्हैसाळ योजनेत २२ पंपांद्वारे उपसासांगली : म्हैसाळ योजनेच्या पंपांची संख्या विक्रमी...
दिग्गजांच्या सभांनी तापणार साताऱ्यातील...सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील राजकीय...
प्रभावी अपक्ष उमेदवारांमुळे लढती रंगतदारमुंबई : राज्यात तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील २१...
राज्यात काकडी प्रतिक्विंटल ४००ते २०००...नाशिकला काकडी प्रतिक्विंटल १२५० ते १७५० रुपये...
धनगर समाज भाजपच्याच पाठीशी ः महादेव...सांगली  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच...
ऊस गाळपात इंदापूर कारखान्याची आघाडी पुणे  : जिल्ह्यात सर्व १७ साखर कारखान्यांनी...
निवडणुकीमुळे चाराटंचाईकडे दुर्लक्ष;...पुणे  : निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना...
नाशिक जिल्ह्यात चारा छावण्यांसाठी...नाशिक  : जिल्ह्यातील टंचाईच्या झळा तीव्र होत...