agriculture news in marathi, agrowon agri exhibition starts in nagar, maharashtra | Agrowon

नगर येथे ‘अॅग्रोवन कृषी प्रदर्शना’स उत्साहात प्रारंभ
टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

नगर : नगर आणि शेजारच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नगरकरांना उत्सुकता असलेल्या ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनास शुक्रवारी (ता. २३) येथील जॉगिंग पार्क मैदानावर उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवसापासून शेतकऱ्यांचा प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. येथे उपलब्ध असलेल्या स्टॉलमधून शेतकरी विविध विषयांबाबत मार्गदर्शन घेत आहेत.

नगर : नगर आणि शेजारच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नगरकरांना उत्सुकता असलेल्या ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनास शुक्रवारी (ता. २३) येथील जॉगिंग पार्क मैदानावर उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवसापासून शेतकऱ्यांचा प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. येथे उपलब्ध असलेल्या स्टॉलमधून शेतकरी विविध विषयांबाबत मार्गदर्शन घेत आहेत.

नगरसह शेजारच्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना शेतीचे नवीन तंत्रज्ञान, विविध विषयांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘सकाळ-अॅग्रोवन’तर्फे कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता सावेडीतील जॉगिंग पार्क मैदानावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, केंद्रीय वस्तू व सेवाकर खात्याचे सहायक आयुक्त डॉ. गणेश पोटे, ‘सकाळ’चे निवासी संपादक अॅड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील, आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे, ‘कन्हैया अॅग्रो’चे कार्यकारी संचालक सुरेश पठारे, चितळे डेअरीचे विस्तार अधिकारी चंद्रशेखर कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
 
या वेळी चितळे डेअरीच्या विस्तार विभागाचे सुरेश सावंत, आर. बी. राजपुरे, ‘सकाळ’चे शाखा व्यवस्थापक घनश्‍याम घाणेकर, जाहिरात व्यवस्थापक दीपक देशमुख, वितरण व्यवस्थापक संजय चिकटे, ‘अॅग्रोवन’चे सुमीत पाटील, सचिन जोशी, अक्षय कांबळे, गणेश भंवर उपस्थित होते. 
या प्रदर्शनाचे चितळे जिनस एबीएस (इंडिया) सहप्रायोजक आहेत.
 
प्रदर्शनामध्ये एकूण ५० दालने असून, यामध्ये यांत्रिक अवजारे, जैविक कीटकनाशके, विद्राव्य खते, ग्रीनहाउस तंत्रज्ञान, शेडनेट, पॉलिहाउस तंत्रज्ञान, बियाणे, ठिबक, तुषार संच, पॅकेजिंग, कोल्ड स्टोरेज उद्योग, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, रोपवाटिका, कृषी प्रकाशने, पूरक उद्योग, मुरघास आदी दालनांचा समावेश आहे.

शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची सखोल माहिती ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करू लागले आहेत. पारंपरिक पद्धतीला फाटा देत नवीन तंत्रज्ञान अत्मसात करून शेती करीत आहे, असे मत केंद्रीय वस्तू व सेवाकर खात्याचे सहायक आयुक्त डॉ. गणेश पोटे यांनी या वेळी व्यक्त केले. 

 
या वेळी आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे म्हणाले, की जागतिक तापमानाचा शेतीवर परिणाम होत आहेत. जे बदल होतील त्याचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. त्याबाबत आता शेतकऱ्यांना संपूर्ण मार्गदर्शन ‘अॅग्रोवन’मधून मिळते ही अत्यंत चांगली बाब आहे. 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे म्हणाले, की पूर्वी शेतीची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने शेती केली जात होती; परंतु ‘अॅग्रोवन’च्या माध्यमातून आधुनिक शेतीची माहिती सहजपणे उपलब्ध झाली आहे. कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. 

‘सकाळ’चे निवासी संपादक अॅड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील म्हणाले, की ‘सकाळ-अॅग्रोवन’चे काम केवळ बातम्यांपुरते सीमित नाही, तर शेतकरी हितासाठी सतत काम सुरू आहे. सकाळ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सिंचनाची कामे केली. त्याचा शेतीला मोठा फायदा होत आहे. 

‘कन्हैया अॅग्रो’चे कार्यकारी संचालक सुरेश पठारे म्हणाले, की आतापर्यंत ग्रामीण भागाला फारसे मार्गदर्शन मिळायचे नाही. आता मात्र ‘अॅग्रोवन’चे कृषी प्रदर्शन चांगली माहिती देत आहे. दूध व्यवसायवाढीला यामुळे मोठा फायदा होणार आहे. 

चितळे डेअरीचे विस्तार अधिकारी चंद्रशेखर कुलकर्णी म्हणाले, की ‘अॅग्रोवन’ शेती-मातीचा खरा मार्गदर्शक आहे. शेतकऱ्यांना दूध व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्यासाठी लागणाऱ्या बाबींची माहिती ‘अॅग्रोवन’कडून मिळते ही आनंदाची बाब आहे. येथे आम्ही मुरघास, तंत्रज्ञानाची माहिती देत आहोत.

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...