agriculture news in Marathi, Agrowon Agri expo starts form today, Maharashtra | Agrowon

नगरमध्ये आजपासून ‘ॲग्रोवन कृषी प्रदर्शन’
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

नगर : शेतकऱ्यांना उत्सुकता असलेल्या ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनाला नगरमधील सावेडीतल्या जॉगिंग पार्क मैदानावर आजपासून (ता. २३) प्रारंभ होत आहे. शेतकरी व संबंधित क्षेत्राला ज्ञानातून विकासाकडे आणि आधुनिकतेतून समृद्धीकडे नेण्याचा या प्रदर्शनातून प्रयत्न आणि मार्गदर्शन होणार आहे. तीन दिवस (रविवारपर्यंत) हे प्रदर्शन सुरू राहणार असून, सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

नगर : शेतकऱ्यांना उत्सुकता असलेल्या ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनाला नगरमधील सावेडीतल्या जॉगिंग पार्क मैदानावर आजपासून (ता. २३) प्रारंभ होत आहे. शेतकरी व संबंधित क्षेत्राला ज्ञानातून विकासाकडे आणि आधुनिकतेतून समृद्धीकडे नेण्याचा या प्रदर्शनातून प्रयत्न आणि मार्गदर्शन होणार आहे. तीन दिवस (रविवारपर्यंत) हे प्रदर्शन सुरू राहणार असून, सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

सकाळ-ॲग्रोवनच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला विकासाच्या दिशेने नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. शेतकऱ्यांना शेती व पूरक क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाशी अवगत करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून यंदापासून नगरध्ये सकाळ-ॲग्रोवनतर्फे कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे.
 
प्रदर्शनात ट्रॅक्‍टर्स, हार्वेस्टिंग यंत्रे, विविध प्रकारची अवजारे व कापणी यंत्र उत्पादक कंपन्या, जैविक कीटकनाशके, विद्राव्य खते, ग्रीन हाउस टेक्‍नॉलॉजी आणि इंप्लिमेंट्‌स, बियाणे उत्पादक टिश्‍युकल्चर, ठिबक व तुषार सिंचन, पॅकेजिंग आणि कोल्ड स्टोरेज इंडस्ट्रीज, ग्रेडिंग, वेइंग, सॉर्टिंग अवजारे उत्पादक कंपन्या, बॅंका व कृषी शिक्षण संस्था, कृषी साहित्य प्रकाशन, कृषी संशोधन संस्था सहभागी होत आहेत. शहर, उपनगरांच्या मध्यवस्तीत असलेल्या सावेडी जॉगिंग पार्क मैदानावर उद्या (शुक्रवारी) हे प्रदर्शन सुरू होणार असल्याने तीन दिवस (रविवारपर्यंत ता. २५) शेती शेतीशी नाळ असलेल्या लोकांची येथे मांदियाळी असणार आहे.

शेतकऱ्यांसाठी माहितीचा खजिना, अधुनिकतेकडे नेणाऱ्या तंत्रज्ञानाचा अविष्कार, कृषी क्षेत्रातील नामवंत कंपन्यांचा सहभाग आणि परिसंवादाच्या दालनात नामवंत तज्ज्ञांचे, प्रगतिशील शेतकऱ्यांचे दररोज मागदर्शन, हे हेतू घेऊनच हे प्रदर्शन होत आहेत. उद्या सकाळी दहा वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, "आत्मा''चे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे व "सकाळ''चे निवासी संपादक ॲड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. 

कृषी प्रदर्शनातील चर्चासत्रांचे नियोजन
शुक्रवार, २३ फेब्रुवारी २०१८

वेळ     विषय     वक्ते
११ ते १ आधुनिक व व्यावसायिक शेळीपालन  श्री. संजय मंडकमाले, सहयोगी प्राध्यापक, शेळी सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
    शनिवार, २४ फेब्रुवारी २०१८
 
१२ ते २    निर्यातक्षम डाळिंब उत्पादन  श्री. अंकुश पडवळे, डाळिंब निर्यातदार- ग्रीन होरायझन फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, अध्यक्ष, कृषिक्रांती फार्मर्स क्लब, मंगळवेढा
३ ते ५   उसाचे एकरी १५० टन किफायतशीर उत्पादन तंत्र   डॉ. ज्ञानदेव हापसे, ऊसतज्ज्ञ, माजी संचालक, वसंतदादा पाटील शुगर इन्टिट्यूट
    रविवार, २५ फेब्रुवारी २०१८
 
१२ ते २  मुक्त संचार गोठा आणि मुरघासनिर्मिती व दुधाळ जनावर प्रजाती  श्री. सी. व्ही. कुलकर्णी, पशु सहायक, चितळे दुध
 

       
  
  
     

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...