agriculture news in Marathi, agrowon, Agricultural graduates should serve in the spirit of humanity | Agrowon

कृषी पदवीधरांनी मानवतेच्या भावनेतून सेवा करावी : डॉ. महापात्रा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 मार्च 2018

पुणे : कृषी व्यवसाय व्यवस्थापनेतील पदव्युत्तर पदविका घेऊन तुम्ही आज बाहेर पडत आहात. जगात अनेक समस्या असल्या तरी तुमची देशाला आणि कृषी क्षेत्राला गरज आहे. शेतकऱ्यांबाबत आस्था आणि मानवतेला सर्वोच्च स्थान देऊन तुमचे 'करिअर' घडवा, असे आवाहन भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा यांनी केले. 

पुणे : कृषी व्यवसाय व्यवस्थापनेतील पदव्युत्तर पदविका घेऊन तुम्ही आज बाहेर पडत आहात. जगात अनेक समस्या असल्या तरी तुमची देशाला आणि कृषी क्षेत्राला गरज आहे. शेतकऱ्यांबाबत आस्था आणि मानवतेला सर्वोच्च स्थान देऊन तुमचे 'करिअर' घडवा, असे आवाहन भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा यांनी केले. 

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत (वॅमनीकॉम) कृषी व्यवसाय व्यवस्थापन शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या दीक्षान्त सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव श्रीमती उपमा श्रीवास्तव, राष्ट्रीय मध्यवर्ती सहकारी प्रशिक्षण केंद्राचे सचिव मोहन मिश्रा, वॅमनीकॉमचे संचालक डॉ. के. के. त्रिपाठी, निबंधक एस. वाय. देशपांडे यावेळी उपस्थित होते.  

"कृषीच्या विद्यार्थ्यांनी हे सतत लक्षात ठेवावे की केवळ सुखसुविधा मिळणार नसून कष्टाने आपल्याला देश आणि संस्कृतीची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. पैसा कमविणे हे आपल्या आयुष्याचे ध्येय असले तरी करियरमध्ये शेतकरी आणि समाज यांना स्थान देत आदर्श समाजासाठी प्रयत्न करावेत, असे डॉ. महापात्रा म्हणाले. कृषी शिक्षणातून आपण सामाजिक सेवेकडे आलो आहोत याची जाणीव ठेवत आपले ध्येय निश्चित करण्याचा आग्रह डॉ. महापात्रा यांनी धरला. 

यावेळी डॉ. महापात्रा यांनी पदविका प्रदान केली. तसेच, पॉल जोसे याला सुवर्ण आणि नवीन कुमार सिंग या विद्यार्थ्याला रौप्यपदक देऊन सन्मान केला.

इतर बातम्या
साखरेच्या गोळ्याही करतील वेदना कमीवाढत्या स्थौल्यत्वासारख्या व त्या अनुषंगाने...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
कडधान्याची कमी दरात सर्रास खरेदीजळगाव ः जिल्ह्यातील जळगाव, चोपडा, पाचोरा,...
राज्यातील विकास सोसायट्यांना रिक्त...सांगली ः राज्यातील विकास सोसायट्यांची संख्या २१...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
पुण्यात एक ऑक्टोबरला ‘कृषी कल्चर’ ज्ञान...पुणे ः शेतीमधील बदलत्या तंत्रावर प्रकाश टाकणारा...
पावसाच्या तुरळक हजेरीने हलका दिलासापुणे: पावसाच्या दीर्घ खंडानंतर राज्यात दोन...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
पोटॅशचा मोठा तुटवडाजळगाव  ः रेल्वेकडून खत पुरवठादार किंवा खत...
कीडनाशकांबाबतच्या याचिकेची सर्वोच्च...नवी दिल्ली ः मानवी आरोग्याला धोकादायक व भारतात...
राज्यात उद्यापासून पावसाचे संकेतपुणे: बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
जळगाव जिल्ह्यात तुरळक पाऊसजळगाव ः जिल्ह्यात सोमवारी (ता. १७) सकाळी ८ पर्यंत...
महाराष्ट्रात भावांतर योजना लागू...परभणी ः शेती एवढ्या समस्या कुठेच नाहीच. सर्व...