agriculture news in Marathi, agrowon, Agricultural Servants "Recruit According to on January 29th ordinance | Agrowon

`कृषी सेवक भरती २९ जानेवारीच्या अध्यादेशानुसार राबवावी`
टीम अॅग्रोवन
बुधवार, 9 मे 2018

अकोला  ः शासनाच्या वतीने राज्यपालांच्या नावे २९ जानेवारीला प्रसिद्ध अधिसूचनेत कृषी सेवक भरती पात्रतेत पदविका व तत्सम असा बदल केल्यानंतर निर्माण झालेला संभ्रम शासनाच्या खुलाशाने काहीसा कमी झाला. मात्र राज्यात दरम्यानच्या काळात राबवली जात असलेली कृषी सेवक पदभरती प्रक्रिया ही २९ जानेवारीच्या अध्यादेशाचे पालन करूनच पूर्ण केली जावी, अशी मागणी पदविकाधारकांतर्फे भगवान मिसाळ यांनी कृषी आयुक्त तसेच नागपूर कृषी सहसंचालकांकडे केली आहे.

अकोला  ः शासनाच्या वतीने राज्यपालांच्या नावे २९ जानेवारीला प्रसिद्ध अधिसूचनेत कृषी सेवक भरती पात्रतेत पदविका व तत्सम असा बदल केल्यानंतर निर्माण झालेला संभ्रम शासनाच्या खुलाशाने काहीसा कमी झाला. मात्र राज्यात दरम्यानच्या काळात राबवली जात असलेली कृषी सेवक पदभरती प्रक्रिया ही २९ जानेवारीच्या अध्यादेशाचे पालन करूनच पूर्ण केली जावी, अशी मागणी पदविकाधारकांतर्फे भगवान मिसाळ यांनी कृषी आयुक्त तसेच नागपूर कृषी सहसंचालकांकडे केली आहे.

यासंदर्भात श्री. मिसाळ यांनी म्हटले की, कृषी विभागाअंतर्गत विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत कृषीसेवक पदासाठी जाहिरात देऊन ९०३ पदासाठी महापरीक्षा पोर्टलमार्फत पदभरती राबविण्यात आली. यासाठी २ फेब्रुवारीला कृषी सहसंचालक कार्यालयांनी जाहिराती दिल्या. त्यात शैक्षणिक पात्रता कृषी पदविका व पदविकेशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली इतर कोणतीही अर्हता धारण करणारे विद्यार्थी कृषी सेवक पदासाठी अर्ज करू शकतील असा स्पष्ट उल्लेख आहे.

२९ जानेवारी २०१८ रोजी काढलेल्या अधिसूचनेत पदविकेचा अर्थ संविधानिक विद्यापीठ किंवा मंडळाची कृषी पदविका किंवा शासनाने त्याच्या समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता असा आहे. मात्र प्रत्यक्षात अर्ज करताना पदवीधर विद्यार्थ्यांनी या पदासाठी अर्ज केले. त्यांना प्रवेशपत्र मिळाले आणि विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांनी जाहीर केलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीत पदवीधर उमेदवारांचा समावेश आहे. त्यामुळे स्पर्धा वाढून पदविकाधारक विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

शासन सेवेत कृषी पदविकाधारक विद्यार्थ्यांना एकमेव कृषीसेवक पदासाठी अर्ज करण्याची संधी आहे. १७ एप्रिल रोजी सर्व भरतीप्रक्रीया अंतिम टप्प्यात असताना शासनाने २९ जानेवारीच्या कृषी सहायक संवर्गाच्या सेवाप्रवेश नियम सुधारित केले. त्यात कृषी पदवीचा समावेश राहील असे पत्र काढले. प्रत्यक्षात पदभरती राबवत असताना अशी सूचना नव्हती. त्यामुळे ही सर्व पदभरती प्रक्रिया २९ जानेवारीच्या अध्यादेशानंतर आणि १७ एप्रिलपूर्वी राबवण्यात येत असल्याने अध्यादेशाचे पालन करून पूर्ण करावी, अशी मागणी पदविधारकांतर्फे श्री. मिसाळ यांनी केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...
अकोला जिल्ह्यात १७०० शेततळी पूर्णअकोला   ः शासनाच्या मागेल त्याला शेततळे...