agriculture news in Marathi, agrowon, Agricultural tools, supply as on demand | Agrowon

पुणे जिल्ह्यात मागणीनुसार या पुढे कृषी साहित्य पुरवठा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 मार्च 2018

पुणे  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभासाठी देण्यात येणाऱ्या वस्तूमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे शेतकऱ्यांच्या मागणाीनुसार अनुदानावर सुधारित कृषी अवजारे आणि साहित्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती सुजाता पवार यांनी दिली. 

पुणे  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभासाठी देण्यात येणाऱ्या वस्तूमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे शेतकऱ्यांच्या मागणाीनुसार अनुदानावर सुधारित कृषी अवजारे आणि साहित्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सभापती सुजाता पवार यांनी दिली. 

पवार म्हणाल्या, वैयक्तिक लाभाच्या योजनांमधून शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे पाइप, ताडपत्री, मोटार, कडबाकुट्टी याच साहित्याचा पुरवठा करण्यात येतो. मुळशी भागात ताडपत्रीला तर जुन्नर, अांबेगाव, खेड तालुक्यांत सायकल कोळपे यंत्राला मागणी असते. इतर भागात या अवजारांना मागणी नसल्याने जिल्ह्याच्या सर्व भागांसाठी सर्रास योजना राबवून उपयोग नाही.

एखाद्या ठराविक वस्तूसाठी तरतूद केल्यास त्याची आवश्‍यकता नसली तरी वस्तू घेतली जाते. त्यासाठी तालुकास्तरावर साखळी कार्यरत असल्याने ठराविक लोक योजनेचा लाभ घेतात. त्यामुळे लाभार्थी निवडताना अडचणी येत असून, गरजू लाभार्थी वंचित राहतो. काही वस्तूंना मागणी नसली तरी त्यासाठी तरतूद असल्यामुळे त्याच वस्तू शेतकऱ्यांना द्याव्या लागतात.

यापुढे त्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मागणी तसा पुरवठा असावा अशी भूमिका आहे. त्यामुळे तालुकानिहाय आवश्‍यक असलेल्या कृषी अवजारे, साहित्यांची मागणी करण्याचा निर्णय शेतकऱ्यांना घेता येणार आहे. कडबाकुट्टी यंत्राचा पुरवठा योजना कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण या तीन विभागांमार्फत राबविण्यात येते. निधीचे विभाजन टाळण्यासाठी अशा साहित्य वाटपाच्या योजना एकाच विभागामार्फत राबवाव्यात, असेही नियोजन करण्यात येत अाहे. लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार करावा, आवश्‍यक अवजारे, साहित्याविषयी माहिती कळवावी, त्यानुसार नवीन वर्षामध्ये योजनांमध्ये बदल करता येईल, असेही सुजाता पवार यांनी सांगितले. 

५ कोटी ४० लाखांची तरतूद
शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानातून देण्यात येणारे प्लॅस्टिक क्रेट, कडबाकुट्टी यंत्र, ताडपत्री, पीक संरक्षक अवजारे, सिंचनासाठी पीव्हीसी पाइप, तणनाशक औषधे, आॅईल पंप संच, इलेक्ट्रिक मोटार आदी साहित्य वाटपासह ठिबक सिंचन प्रोत्साहन, शेतकरी समूह, बचत गटांना फवारणी यंत्रासाठी फिरता निधी, ५० टक्के अनुदानावर मोती शेती प्रक्रिया आदी योजनांसाठी असलेली तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार ७५ टक्के अनुदानातून सुधारित अवजारे आणि साहित्याचा पुरवठा करण्यासाठी सुमारे पाच कोटी चाळीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...