agriculture news in marathi, agrowon, agriculture college admission | Agrowon

कृषी पदविकाधारकांच्या थेट प्रवेशाच्या निर्णयावर वरवंटा
ज्ञानेश्‍वर रायते
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

बारामती, जि. पुणे : सरकारने मोठा गाजावाजा करत कृषी पदवीसाठी थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना सरकारच्याच एका आदेशानुसार आता पहिल्या वर्षाचे ११ पेपर सोडविल्याशिवाय पदवी मिळणार नाही, असे स्पष्ट केल्याने शेवटच्या वर्षाचे पेपर देण्याची तयारी केलेल्या राज्यातील १० हजार विद्यार्थ्यांच्या डोक्यावर आता पुन्हा पहिल्या वर्षाचे ओझे आले आहे. विशेष म्हणजे सरकारी यंत्रणेपासून ते प्रशासकीय यंत्रणेपर्यंत सर्वांनी हात वर केल्याने आता कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे. 

बारामती, जि. पुणे : सरकारने मोठा गाजावाजा करत कृषी पदवीसाठी थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना सरकारच्याच एका आदेशानुसार आता पहिल्या वर्षाचे ११ पेपर सोडविल्याशिवाय पदवी मिळणार नाही, असे स्पष्ट केल्याने शेवटच्या वर्षाचे पेपर देण्याची तयारी केलेल्या राज्यातील १० हजार विद्यार्थ्यांच्या डोक्यावर आता पुन्हा पहिल्या वर्षाचे ओझे आले आहे. विशेष म्हणजे सरकारी यंत्रणेपासून ते प्रशासकीय यंत्रणेपर्यंत सर्वांनी हात वर केल्याने आता कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे निर्माण झाला आहे. 

कृषी पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे कृषी शिक्षण व संशोधनाच्या नियमानुसार १६३ श्रेयांक भारांक होत नसल्याने कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश देण्याच्या सवलतीवर ‘वरवंटा’ फिरवला आहे.

२०१२ मध्ये राज्य सरकारने राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी तंत्रनिकेतन पदविकाधारकांना कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश देण्याची तरतूद केली होती.

राज्यभरातील कृषी महाविद्यालयांनी त्यानुसार अंमलबजावणी करत प्रवेश दिले; मात्र कृषी पदवी अभ्यासक्रम हा चार वर्षांचा असून, या वर्षात विद्यार्थ्यांचे १६३ क्रेडिट लोड (श्रेयांक भारांक) पूर्ण होणे आवश्यक असतात. पहिल्या वर्षाची सवलत दिल्याने हे भारांक पूर्ण होत नाहीत, असा चार वर्षांनंतर परिषदेने शोध लावला आणि पहिल्या वर्षाचे पेपर न सोडविल्याने हे भारांक पूर्ण होत नसल्याने पहिल्या वर्षाचे सर्व पेपर सोडवा, असा आदेश नव्याने दिला आहे. 

धक्कादायक म्हणजे, राज्यातील १० हजार विद्यार्थी असे आहेत, की ज्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळाला आणि ते आता शेवटच्या वर्षातील दुसऱ्या सत्रात कार्यानुभवाचा अनुभव घेत आहेत. त्यांच्यापैकी काहींना तिसऱ्या वर्षातील काही पेपर अद्याप द्यायचे आहेत. थोडक्यात तिसऱ्या वर्षाचे काही पेपर, चौथ्या वर्षातील संपूर्ण अभ्यासक्रम व पहिल्या वर्षाचा संपूर्ण अभ्यासक्रम असे सर्व पेपर द्यावे लागतील, त्यामुळे हे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. 

आदेश पोचलेच नाहीत... 
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनाही विद्यार्थी भेटले. फुंडकर यांनी यासंदर्भात कृषी संशोधन परिषदेच्या संचालकांना सूचना केल्याची माहिती दिली; मात्र संबंधित संचालकांपर्यंत अजून कसलेच आदेश पोचले नसल्याने पदवी मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेले विद्यार्थी चांगलेच हादरलेले आहेत.

इतर अॅग्रो विशेष
अवजार उद्योगाला अर्थसंकल्पात प्रोत्साहन...अवजार क्षेत्राबाबत अनेक महिन्यांपासून शासन...
दुग्ध व्यवसायासाठी हवा स्वतंत्र निधीगेल्या वर्षभरात दूध व्यवसाय मोठ्या संकटाला तोंड...
‘पोल्ट्री’च्या वाढीसाठी हवे ठोस सरकारी...दुष्काळी भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांना उद्योजकतेची...
पीकसंरक्षणातील खर्च कमी करायला हवायवतवाळ जिल्ह्यात कीडनाशक विषबाधेची जी गंभीर घटना...
राज्याचाही पिकांना दीडपट हमीभाव?मुंबई : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील...
केवळ विदर्भातच थंडीपुणे : हवेतील आर्द्रता कमी होऊ लागली आहे....
शेतीमाल मूल्यसाखळी मजबुतीसाठी ठोस धोरण...शेतीमालाचे उत्पादन, काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि...
पारंपरिक उत्साहात शिवजयंती साजरीपुणे : संपूर्ण महाराष्ट्रासह देश-विदेशात अनेक...
माजी आमदार जयंत ससाणे यांचे निधन नगर  :  कॉंगेसचे जिल्हाध्यक्ष माजी...
मराठवाड्याच्या तहानेवर इस्रायली उपाय!७००-८०० मि.मी पाऊस पडणाऱ्या मराठवाड्यात...
जगणे सुसह्य करण्यासाठी जागे व्हाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शेती,...
‘महामेष’ योजना ३४ जिल्ह्यांत राबविणार...औरंगाबाद : राजे यशवंतराव होळकर महामेष योजना...
शेतीतील यांत्रिकीकरणासाठी हवे शासनाचे...अकोला ः अाजच्या बदलत्या काळात शेती पद्धतीत...
मध्य प्रदेशात गारपीटग्रस्तांना हेक्टरी...नवी दिल्ली ः मध्य प्रदेश राज्यात नुकत्याच...
गारपीटग्रस्तांना भरीव मदतीचा प्रस्ताव...नागपूर ः गारपीटग्रस्तांना सरकारकडून जाहीर करण्यात...
शेतकरी कंपन्यांच्या धान्य खरेदीबाबत...पुणे : हमीभावाने धान्य खरेदीत शेतकरी उत्पादक...
महसूल मंडळातील सरासरी उत्पादकतेनुसार...परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
गारपीटग्रस्त क्षेत्र तीन लाख हेक्टरमुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या...
राजधानी दिल्लीत शेती क्षेत्रावर आज...नवी दिल्ली : देशाला नवे कृषी धोरण देण्यासाठी...
‘कापूस ते कापड’पासून आता ‘पिकणे ते...नाशिक : राज्यातील कापसावर प्रक्रिया होऊन...