agriculture news in Marathi, agrowon, The Agriculture Commissioner will talk to the government on agricultural examination issue | Agrowon

कृषिसेवक परीक्षाप्रकरणी कृषी आयुक्त शासनाशी बोलणार
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 मार्च 2018

पुणे : कृषिसेवक पदाच्या ९०३ जागांसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेत सामूहिक कॉपी झाल्याची तक्रार आल्यामुळे कृषी विभाग अस्वस्थ झाला आहे. ''परीक्षा प्रक्रियेतील संशयास्पद मुद्द्यांबाबत राज्य शासनाशी बोलणी करणार आहोत, असे आश्वासन कृषी आयुक्तांनी दिले आहे. 

पुणे : कृषिसेवक पदाच्या ९०३ जागांसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेत सामूहिक कॉपी झाल्याची तक्रार आल्यामुळे कृषी विभाग अस्वस्थ झाला आहे. ''परीक्षा प्रक्रियेतील संशयास्पद मुद्द्यांबाबत राज्य शासनाशी बोलणी करणार आहोत, असे आश्वासन कृषी आयुक्तांनी दिले आहे. 

राज्य शासनाच्या महापरीक्षा पोर्टलने  १३ ते १५ मार्चदरम्यान कृषिसेवक पदासाठी ऑनलाइन परीक्षा घेताना उमेदवारांची बोगस ऑफलाइन बायोमेट्रिक हजेरी घेतली गेली, तसेच सामूहिक कॉपीदेखील झाल्याचा गंभीर आरोप उमेदवारांनी केला होता. राज्यातील परीक्षार्थींच्या वतीने दत्ता वानखेडे कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्यासोबत चर्चा केली. "आधार संलग्न बायोमेट्रिक हजेरी न घेणे, परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला कोठेही बसण्यास परवानगी देणे आणि परीक्षा संपल्यानंतर हॉलतिकिट किंवा ओळखपत्रांच्या साक्षांकित प्रती उमेदवारांकडून जमा न करणे या सर्व संशयास्पद बाबींमुळे गुणवान विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे, असे श्री. वानखेडे यांनी नमूद केले. 

कृषिसेवक परीक्षेत झालेल्या गोंधळाबाबत आम्ही महापरीक्षा पोर्टलशी संपर्क साधला असून, त्यांना विद्यार्थ्यांच्या निश्चित कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले याची माहिती हवी आहे, असे कृषी विभागाच्या वतीने या वेळी सांगण्यात आले. 

"परीक्षा देणाऱ्या कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही, यासाठी आम्ही दक्षता घेऊ. मुळात महापरीक्षा पोर्टल ही खासगी संस्था नसून राज्य शासनाचाच तो एक भाग आहे. त्यामुळे पारदर्शकता व अचूकता अशा दोन्ही मुद्द्यांना पोर्टलकडून प्राधान्य दिले जाते. तथापि, याबाबत आम्ही राज्य शासनाशी सचिव स्तरावर संपर्क साधून सर्व माहिती देणार आहोत, असे आयुक्तांना स्पष्ट केले. परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थी गटाने बसले असल्यास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजची तपासणी केली जाईल, तसेच आधार संलग्न बायोमेट्रिक हजेरी का घेतली नाही, ओळखपत्राविना परीक्षेला प्रवेश कसा देण्यात आला, याचीदेखील चौकशी केली जाईल, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले. 

कृषिसेवक पदाच्या ९०३ जागांच्या ऑनलाइन परीक्षेत सामूहिक कॉपी झाल्यामुळे चौकशी करून कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन आपण जिल्हाधिकारी सौरभ राव यांना दिले असून, ते मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे, असे श्री. वानखेडे यांनी सांगितले. 

इतर बातम्या
साखरेच्या गोळ्याही करतील वेदना कमीवाढत्या स्थौल्यत्वासारख्या व त्या अनुषंगाने...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
कडधान्याची कमी दरात सर्रास खरेदीजळगाव ः जिल्ह्यातील जळगाव, चोपडा, पाचोरा,...
राज्यातील विकास सोसायट्यांना रिक्त...सांगली ः राज्यातील विकास सोसायट्यांची संख्या २१...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
पुण्यात एक ऑक्टोबरला ‘कृषी कल्चर’ ज्ञान...पुणे ः शेतीमधील बदलत्या तंत्रावर प्रकाश टाकणारा...
पावसाच्या तुरळक हजेरीने हलका दिलासापुणे: पावसाच्या दीर्घ खंडानंतर राज्यात दोन...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
पोटॅशचा मोठा तुटवडाजळगाव  ः रेल्वेकडून खत पुरवठादार किंवा खत...
कीडनाशकांबाबतच्या याचिकेची सर्वोच्च...नवी दिल्ली ः मानवी आरोग्याला धोकादायक व भारतात...
राज्यात उद्यापासून पावसाचे संकेतपुणे: बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
जळगाव जिल्ह्यात तुरळक पाऊसजळगाव ः जिल्ह्यात सोमवारी (ता. १७) सकाळी ८ पर्यंत...
महाराष्ट्रात भावांतर योजना लागू...परभणी ः शेती एवढ्या समस्या कुठेच नाहीच. सर्व...