agriculture news in Marathi, agrowon, Agriculture Department's eyes on the sale of glyphosate | Agrowon

ग्लायफॉसेटच्या विक्रीवर कृषी विभागाची करडी नजर
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 एप्रिल 2018

नागपूर ः कर्करोगाला निमित्त ठरत असल्याच्या कारणामुळे श्रीलंकेसह सहा देशात बंदी असलेल्या ग्लायफॉसेट या तणनाशकाच्या विक्रीवर महाराष्ट्रात तात्पुरत्या बंदीचा विचार केला जात आहे. हर्बीसाईड टॉलरंट (तणनाशक रोधक) बीटीच्या लागवडीला प्रोत्साहन मिळू नये, याकरिता ही उपाययोजना केली जाणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

नागपूर ः कर्करोगाला निमित्त ठरत असल्याच्या कारणामुळे श्रीलंकेसह सहा देशात बंदी असलेल्या ग्लायफॉसेट या तणनाशकाच्या विक्रीवर महाराष्ट्रात तात्पुरत्या बंदीचा विचार केला जात आहे. हर्बीसाईड टॉलरंट (तणनाशक रोधक) बीटीच्या लागवडीला प्रोत्साहन मिळू नये, याकरिता ही उपाययोजना केली जाणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

महिको-मोन्सॅटो कंपनीने हर्बीसाईड टॉलरंट (तणनाशक रोधक) जीन विकसित केला आहे. पिकात तणाचा प्रादुर्भाव झाल्यास त्यावर ग्लायफॉसेट हे तणनाशक मारल्यास कपाशी पिकाला कोणतीही बाधा न पोचता केवळ तण मरेल, अशी या जीनची कार्यपद्धती आहे. तण काढणीसाठी मजुरांवर होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत हे कमी खर्चाचे असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी हर्बीसाईड टॉलरंट तंत्रज्ञानाला मंजुरी देण्याच्या मागणीचा पाठपुरावा चालविला आहे. परंतु, हर्बीसाईड टॉलरंट वाण तसेच त्यावर फवारण्यात येणारे ग्लायफॉसेट हे तणनाशक या दोघांचे पर्यावरणाला धोके असल्याने केंद्र सरकारने त्याला अद्याप मंजुरी दिली नाही. त्यानंतरही तेलंगणा, गुजरात या राज्यांमध्ये अवैधरित्या तणनाशकरोधक कापूस वाणांचे बीजोत्पादन घेत त्याचा पुरवठा महाराष्ट्रात केला जात आहे.

ग्लायफॉसेटवर बंदीचा विचार
तणनाशकरोधक जीनचा समावेश असलेले वाण चोरुन लावले तरी तण नियंत्रणाकरीता ग्लायफॉसेट या औषधाची गरज पडते. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात ग्लायफॉसेटच्या विक्रीवर कृषी विभागाची करडी नजर राहणार आहे. विशेषतः यवतमाळ जिल्ह्यावर कृषी विभागाने सर्वाधिक लक्ष्य केंद्रीत केले आहे. विक्रेत्यांना दर आठवड्याला ग्लायफॉसेट विक्रीचा अहवाल कृषी विभागाला सादर करावा लागेल. जून, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यात ग्लॉयफॉसेटची विक्री वाढण्याची शक्‍यता गृहीत धरून गुणनियंत्रण शाखेला याकडे विशेष लक्ष्य देण्यास सांगण्यात आले आहे.

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यात उत्साहात मतदानसातारा  : जिल्ह्यात मंगळवारी लोकसभा...
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...