agriculture news in Marathi, agrowon, Agriculture Scheme without GST | Agrowon

उन्नत शेती समृद्ध शेती योजनेत जीएसटीचा भूर्दंड शेतकऱ्यांच्या माथी
राजकुमार चौगुले
सोमवार, 2 एप्रिल 2018

कोल्हापूर : उन्नत शेती समृद्ध शेती योजनेअंतर्गत अवजारांवर देण्यात येणारे अनुदान जीएसटी (सेवा आणि वस्तू कर) वगळूनच शेतकऱ्याला देण्यात यावे या नियमातील तरतुदीमुळे योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या माथ्यावर जीएसटीचा थेट भुर्दंड बसला आहे. अनुदान देताना अवजाराची मूळ किंमतच गृहीत धरून अनुदान जमा होत आहे. यामुळे अनुदान देतानाही जीएसटी वगळून देत असल्याने शासन मखलाशी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे.

कोल्हापूर : उन्नत शेती समृद्ध शेती योजनेअंतर्गत अवजारांवर देण्यात येणारे अनुदान जीएसटी (सेवा आणि वस्तू कर) वगळूनच शेतकऱ्याला देण्यात यावे या नियमातील तरतुदीमुळे योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या माथ्यावर जीएसटीचा थेट भुर्दंड बसला आहे. अनुदान देताना अवजाराची मूळ किंमतच गृहीत धरून अनुदान जमा होत आहे. यामुळे अनुदान देतानाही जीएसटी वगळून देत असल्याने शासन मखलाशी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे.

मूळ किंमत धरूनच अनुदान जमा करण्यात आले आहे. हे अनुदान जमा करताना त्यावरील जीएसटीची रक्कम शेतकऱ्यांच्या माथी मारल्याने यात शेतकऱ्याला फटका बसत आहे. या सगळ्या खेळात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खिशातून जादा पैसे जाणार असल्याने शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

उन्नत शेती समृद्ध शेती योजनेअंतर्गत यांत्रिकीकरणासाठी प्राप्त होणाऱ्या निधीपैकी ट्रॅक्‍टरकरिता चाळीस टक्के व इतर अवजारांकरिता साठ टक्के निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याकरिता सोडतीद्वारे शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. कृषी विभागाची पूर्वसंमती घेतल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांनी संबंधित अवजार खरेदी करून त्याची पावती कृषी विभागास सादर करावी. या पावतीच्या आधारे अवजारानुसार हे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावे असा या योजनेचा नियम आहे. 

कृषी आयुक्तालयाने डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात याबबातचे एक पत्र राज्यातील कृषी कार्यालयांना पाठवले आहे. यामध्ये अनुदान जमा करताना करविरहीत रकमेचा विचार होऊन यानुसार अनुदान जमा करावे, असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत अनुदान देय असणाऱ्या सर्व योजनांमध्ये अशीच कार्यवाही करण्याच्या सूचनाही या पत्रात आहेत.
 

इतर बातम्या
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
औरंगाबाद, जालना मतदारसंघांत शांततेत...औरंगाबाद, जालना ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
उद्रेकानंतर सोडलेले वांगीचे पाणी चार...वांगी, जि. सांगली ः दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...