agriculture news in marathi, Agrowon agro exhibition started from today in Jalna | Agrowon

प्रतीक्षा संपली... आजपासून जालन्यात ॲग्रोवनचे कृषी प्रदर्शन
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

जालना : सर्वांना उत्सुकता लागून असेलल्या सकाळ -ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला उद्योग नगरी म्हणून ख्याती असलेल्या जालना शहरात शुक्रवारी (ता.१९) प्रारंभ होत आहे. शेतकऱ्यांसह कृषी उद्योगासाठी हे प्रदर्शन सर्वात पर्वणी ठरणार आहे.

जालना : सर्वांना उत्सुकता लागून असेलल्या सकाळ -ॲग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला उद्योग नगरी म्हणून ख्याती असलेल्या जालना शहरात शुक्रवारी (ता.१९) प्रारंभ होत आहे. शेतकऱ्यांसह कृषी उद्योगासाठी हे प्रदर्शन सर्वात पर्वणी ठरणार आहे.

शेतकऱ्यांना शेती व पूरक क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाशी अवगत करत कृषी क्षेत्राला विकासाच्या दिशेने नेण्याच्या दृष्टीने सकाळ - ॲग्रोवनच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून जालन्यात कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मे. बी. जी. चितळे आणि चितळे जिनस एबीएस इंडिया तसेच कृषी विभाग जालना व आत्मा जालना या प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत. सतत दुसऱ्या वर्षी जालन्यातील आझाद  मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे  दुपारी १ वाजता उद्‌घाटन होणार आहे.

या वेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीष टोपे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, जालन्याचे अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, जालन्याचे आत्माचे  प्रकल्प संचालक संतोष आळसे आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.

या कृषी प्रदर्शनात आधुनिकतेकडे नेणाऱ्या तंत्रज्ञानाचा आविष्कार शेतकऱ्यांना पहायला मिळणार आहे. अॅग्रोवनचे कृषी प्रदर्शन म्हणजे शेतकऱ्यांसाठी ज्ञान व माहितीचा एकप्रकारे खजिनाच असणार आहे.

प्रदर्शनात या विषयांचा समावेश
या प्रदर्शनाच्या माध्यमातून तंत्रज्ञान व कृषीविषयक उत्पादनाच्या माध्यमातील विविध कंपन्या शेतकऱ्यांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये  ट्रॅक्‍टर्स, हार्वेस्टींग यंत्रे, विविध प्रकारची अवजारे व कापणी यंत्र उत्पादक कंपन्या, जैविक कीटकनाशके, विद्राव्य खते, ग्रीन हाउस टेक्‍नॉलॉजी आणि इंप्लिमेंट्‌स, बियाणे उत्पादक टिश्‍युकल्चर, ठिबक व तुषार सिंचन, पॅकेजिंग, ग्रेडिंग, वेईंग, सोर्टींग अवजारे उत्पादक कंपन्या, बॅंका, कृषी साहित्य प्रकाशन, कृषी संशोधन संस्था, शासनाच्या व कृषी विभागाचे महिला शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, सेंद्रिय शेतकरी गट, नर्सरी आणि कृषी विभागाचे व आत्माचे विविध गट सहभागी होत आहेत.

तीन दिवस चालणार प्रदर्शन
यंदा सलग दुसऱ्या वर्षी जालन्यातील नगरपालिकेच्या आझाद मैदानावर १९ ते २१ जानेवारी दरम्यान तीन दिवस हे प्रदर्शन होणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान हे प्रदर्शन शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी खुले राहणार आहे.

अशी असतील चर्चासत्रे

१९ जानेवारी २०१८
पहिले चर्चासत्र : वेळ : दुपारी १२ ते २
विषय : मोसंबी बहाराचे नियोजन
वक्‍ते : डॉ. एम. बी. पाटील, प्रमुख फळबाग संशोधन केंद्र हिमायतबाग, औरंगाबाद.
दुसरे चर्चासत्र : वेळ : दुपारी ३ ते ५
विषय : रेशीम शेती व्यवस्थापन व संधी
वक्‍ते : अजय मोहिते प्रकल्प अधिकारी जिल्हा रेशीम कार्यालय औरंगाबाद.

२० जानेवारी २०१८
पहिले चर्चासत्र : वेळ : दुपारी १२ ते २
विषय : आधुनिक व व्यावसायिक शेळीपालन
वक्‍ते : डॉ. श्रीकांत सटाले, पशुवैद्यक औरंगाबाद.
दुसरे चर्चासत्र : वेळ : दुपारी ३ ते ५
विषय : बोंड अळीचे संकट, त्यावरील उपाय व कीड नियंत्रण
वक्‍ते : डॉ. बी. बी. भोसले, माजी विस्तार शिक्षण संचालक वनामकृवी तथा प्राचार्य कृषी महाविद्यालय लातूर.

२१ जानेवारी २०१८
पहिले चर्चासत्र : वेळ : दुपारी १२ ते २
विषय : मुक्‍त संचार गोठा, मुरघास निर्मिती व दुधाळ जनावर प्रजाती
वक्‍ते : श्री. चंद्रशेखर वसंत कुलकर्णी  
दुसरे चर्चासत्र : वेळ : दुपारी ३ ते ५
विषय : सेंद्रिय शेतीची गरज -मार्केटिंग व ब्रॅंडिंग व्यवस्थापन
वक्‍ते : श्री. हेमंत चव्हाण.

 

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...