‘ॲग्रोवन’ आमचा..! आम्ही ‘ॲग्रोवन’चे..!!

‘ॲग्रोवन’ आमचा..! आम्ही ‘ॲग्रोवन’चे..!!
‘ॲग्रोवन’ आमचा..! आम्ही ‘ॲग्रोवन’चे..!!

पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ बनलेल्या ॲग्रोवनला राज्यभरातून शेतकऱ्यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह वाचकांनी तेराव्या वर्धापन दिनासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. वर्धापन दिनानिमित्ताने प्रसिद्ध केलेल्या अॅग्रोवनच्या जमीन सुपीकता विशेषांकाचेही जोरदार स्वागत वाचकांनी केले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रगतीच्या नाना वाटा दाखवित व शेतशिवारातील सुखदुःखाच्या वळणावर सतत साथ देत अॅग्रोवनने शुक्रवारी (ता. २०) चौदाव्या वर्षात पदार्पण केले. बळिराजाचा सच्चा सोबती अशी प्रतिमा तयार झालेल्या अॅग्रोवनला यानिमित्ताने शेतकरी, शास्त्रज्ञ, शासकीय अधिकारी, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच कृषी उद्योगातील प्रतिनिधींकडून शुभेच्छा मिळत होत्या. अशातच  संजय मोरे पाटील  यांनी लिहून पाठविलेली ही प्रतिक्रिया अॅग्रोवनची उपयुक्तता संदेश देणारी होती, तशीच   ॲग्रोवन आमचा...! आम्ही ॲग्रोवनचे...!! हा सांगावा देणारीही... सलाम ॲग्रोवन ‘‘चला, यात ॲग्रोवनचे वाचक  कोण- कोण आहेत..? (सहसा हात वर होत नाहीत.) का बरं..? तुमच्यापर्यंत ॲग्रोवन येत नाही का? ठिक आहे..! पण तुम्ही तर रोज टेंभुर्णी, जाफराबाद, देऊळगाव राजा, राजूर, भोकरदनला असता.. मग तिथे तर ॲग्रोवन येतो ना...! अरे, बाबाहो.. ॲग्रोवन बाकी पेपरसारखा नाहीये.. तो कधीच शिळा होत नाही. एक वेळ कट्टा-पेटी घेऊ नका... फार तर एक वेळचा चहा पिऊ नका... पण ‘ॲग्रोवन’ लावाच.. तुमच्या गावात बाहेरून शिक्षक येतात.., ग्रामसेवक येतात... आरोग्याचे लोक येतात... किंवा तुमच्या गावातील काही मुले तिकडे शाळेत जातात... आपल्यापर्यंत ॲग्रोवन येण्यासाठी या सगळ्या लोकांची मदत घ्या...! किंवा तुम्ही शेजारच्या ज्या मोठ्या गावात जाता ना, तेथील एखाद्या ओळखीच्या दुकानावर, टपरीवर टाकायचा सांगा. तो दुकानदार तो ॲग्रोवन वाचेल.. त्याच्या दुकानावर येणारे त्याचे ग्राहक वाचतील..! तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही ज्या दिवशी त्या शहरात जासाल त्या दिवसापर्यंत जमा झालेले सगळे ॲग्रोवनचे अंक घेऊन या अऩ फुरसतीने शेतात जाऊन निवांत झाडाखाली बसून वाचून काढा.. बघा तुम्हाला शेती करण्याविषयी कसे वेगळेच वाटायला लागत ते... अरे बाबाहो, त्यात शेतीविषयक माहितीचा खूप मोठा खजिनाच दडलेला आहे.  तुम्हाला मोठा चांगला शेतकरी व्हायचे आहे ना... मग कसे का होत नाही, पण ॲग्रोवन लावाच..! हो साहेब..आता लावतोच..! हं... करा बरं आता आपलं सुरू ! हे पाहा मी ॲग्रोवनमुळेच आज तुमच्यापर्यंत पोचू शकलो बरं.. मग नक्की लावता ना ॲग्रोवन...! हो साहेब... आता तर नक्कीच लावतो.. ओके...’’  असा संवाद असतो ॲग्रोव्हिजन गटशेती संघाच्या कार्यक्रमातील...! आज ॲग्रोवनचा तेरावा वर्धापन दिन आहे... पाहता-पाहता ॲग्रोवन तेरा वर्षांचा झालाय... यात ॲग्रोवनचे फार खडतर परिश्रम आहेत.  ॲग्रोवनने कोलमडलेल्या कित्येक शेतकऱ्यांचे आख्खे जीवनच उभे करण्याचे काम केलेय...! एवढं नक्की म्हणता येईल, की ॲग्रोवन नसता तर शेतकरी आत्महत्येची आकडेवारी किती तरी मोठी फुगली असती...! ती कमी करण्यात ॲग्रोवन यशस्वी ठरलाय...!

कृषी क्षेत्रात आज देशाला दिशा देण्याचे काम ॲग्रोवन करतोय...! सलाम ॲग्रोवन...! ॲग्रोवन आमचा...! आम्ही ॲग्रोवनचे...!! ॲग्रोवनच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक-हार्दिक शुभकामना..! - संजय मोरे पाटील नळविहिरा, ता. जाफराबाद, जि. जालना  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com