agriculture news in Marathi, agrowon, allot to fund Zilla Parishad members in same manner | Agrowon

'जिल्हा परिषदेत निधीचे सदस्यांना समान वाटप करा'
टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 मार्च 2018

नगर : जिल्हा परिषद निवडणुकीला तेरा महिने होऊनही गेले, मात्र अजून एकाही जिल्हा परिषद सदस्याला त्यांच्या गटात विकासकाम करता आले नाही. आता हाती घेतलेली कामेही ठराविक गटातच आहेत. काही सदस्यांना कामाबाबत डावलले जात असल्याचा आरोप भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केला. जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांनी सहली काढण्यापेक्षा विकासकामांचे विकेंद्रीकरण करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. 

नगर : जिल्हा परिषद निवडणुकीला तेरा महिने होऊनही गेले, मात्र अजून एकाही जिल्हा परिषद सदस्याला त्यांच्या गटात विकासकाम करता आले नाही. आता हाती घेतलेली कामेही ठराविक गटातच आहेत. काही सदस्यांना कामाबाबत डावलले जात असल्याचा आरोप भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केला. जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांनी सहली काढण्यापेक्षा विकासकामांचे विकेंद्रीकरण करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. 

वाकचौरे म्हणाले, जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या प्रत्येक सदस्यांकडून गटातील मतदारांना कामाची अपेक्षा असते. जिल्हा परिषदेत मात्र ठराविक गटातच विकासकामांना कोट्यवधी रुपयांची प्रशासकीय मान्यता देत आहेत. पदाधिकारी म्हणून इतरांपेक्षा थोडी जास्त कामे घेतली तर हरकत नाही; परंतु काही सदस्यांना एक रस्ता, चार हायमॅक्‍स एवढा निधी, मात्र पदाधिकारी यांना कोट्यवधींची कामे असा दुजाभाव सध्या जिल्हा परिषदमध्ये चालू आहे. रस्ते, पर्यटन, बंधारे दुरुस्ती आदी कामांसाठी कोट्यवधी रुपये निधी दिला जातो, इतर सदस्यांना मात्र निधीपासून वंचित ठेवले जात आहे. भाजप सदस्यांशी दुजाभाव केला जाता असल्याचा आरोप वाकचौरे यांनी केला. 

आता जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य तेलंगणा राज्यातील योजना पाहण्यासाठी सहलीला जाणार आहेत. याआधी जयपूरला विमानाने सहलीला जाऊन आले. खरं तर सहलीपेक्षा विकासकामांना प्राधान्य देण्याची गरज आहे. त्याचा किती उपयोग या जिल्हा परिषदेला व जिल्ह्यातील लोकांना झाला हा खरा प्रश्न आहे. त्यापेक्षा तो खर्च विकासकामांवर केला तर त्याचा सदुपयोग होईल. गेल्या वर्षी ४९ कोटी अखर्चित निधी परत गेला, त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना वापरासाठी नव्या गाड्यांची भेट दिली. या वर्षी ५० कोटींच्या वर निधी परत जाणार आहे. निधी परत गेल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे वाकचौरे म्हणाले.

इतर बातम्या
'सकाळ'चे दिवाळी अंक अॅमेझॉनवर !पुणे : क्लिकवर चालणाऱया आजच्या जगात दिवाळी अंकही...
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
शेतीपूरक व्यवसायातून वर्षभर उत्पन्नाची...नांदेड  ः एकात्मिक शेती पद्धती अंतर्गत...
मराठवाड्यात हुमणीचा १७ हजार हेक्‍टरला...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोरील संकटे...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
कोल्हापुरात आठ हजार एकरांवर हुमणीचा...कोल्हापूर : पावसाने दिलेली दडी व प्रतिकूल...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
डॉ. हद्दाड आणि डाॅ. नॅबार्रो यांना २०१८...पुणे : जगभरातील कुपोषित माता आणि बालकांना...
संपूर्ण देशातून मॉन्सून परतलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (माॅन्सून) रविवारी (ता...
उन्हाचा चटका वाढलापुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर कमाल...
पाणीटंचाईने संत्राबागांची होरपळअमरावती ः विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या...
हुमणीग्रस्त ऊसक्षेत्र चार लाख हेक्टरवरपुणे ः राज्यात दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या...
द्राक्षपट्ट्याला दुष्काळाचे ग्रहणसांगली ः गेल्यावर्षीपेक्षा यंदा पाऊस कमी झालाय......
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...